Home देश congress attacks pm modi: मोदी चीनवर बोलायला विसरले वाटतं, काँग्रेसचा पंतप्रधानांवर पुन्हा...

congress attacks pm modi: मोदी चीनवर बोलायला विसरले वाटतं, काँग्रेसचा पंतप्रधानांवर पुन्हा निशाणा – forget condemning china, the pm is too afraid to even talk about it in his national address says congress


नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दुपारी ४ वाजता देशाला संबोधित केलं. करोना व्हायरसचे संकट आणि लॉकडाऊनमधील सूटबाबत माहिती दिली. पंतप्रधान मोदी आपल्या संबोधनात भारत-चीन तणावावर बोलतील असा कयास लावला जात होता. पण असं काही झालं नाही. संबोधनात चीनचा उल्लेख न झाल्याने काँग्रेसने पुन्हा पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. मोदी चीनचा निषेध करायला विसरले. देशाला संबोधित करताना मोदी चीन उल्लेख करण्यासही घाबरतात, अशी टीका काँग्रेसने केलीय. तसंच मोदींचं संबोधन म्हजणे एखादी सरकारी अधिसूचना वाटली, अशी टिप्पणीही काँग्रेसनं केली.

काँग्रेसने आपल्या ट्विटर हँडलवर एक फोटोही पोस्ट केलाय. ज्यावर चीनबद्दल लिहिलं गेलंय. चीन भारताच्या सीमेत ४२३ मीटर आतमध्ये घुसला आहे. २५ जूनपर्यंत चीनचे १६ तंबू आणि टरपॉलीस भारतीय सीमेत होते. चीनचे एक मोठे शेल्टरही आहे. तिथे जवळपास १४ गाड्या आहेत. हे सर्व खोटं आहे असं पंतप्रधान मोदी सांगू शकतील का? अपयशाला स्वीकार करू शकेल आणि त्यात सुधारणा करण्याची जागा असेल अशा नेत्याची भारताला आवश्यकता आहे. समस्यांना डावलणारा आणि त्यावर बोलण्यास घाबरणारा नेता नकोय, असं काँग्रेसनं म्हटलंय.

पंतप्रधान मोदींनी गरीबांना मोफत अन्न देण्याच्या योजनेला मुदतवाढ दिली. हा चांगला निर्णय आहे. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी ही मागणी केली होती. मोदींनी या मागणीकडे लक्ष दिलं हे पाहून बरं वाटलं, असं काँग्रेसने म्हटलंय.

पंतप्रधान मोदींच्या संबोधनापूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत-चीन तणाव आणि पेट्रोलच्या वाढत्या किमतीवरून सरकारला घेरलं होतं. गेल्या तीन महिन्यांत २२ वेळा पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. तर चिनी सैन्याला भारतीय भूमीतून कधी आणि कसं बाहेर करणार? याचं उत्तर मोदींनी द्यावं, असं राहुल गांधी म्हणाले होते.

करोनावर लस कधी तयार होणार? PM मोदींनी घेतली उच्च स्तरीय बैठक

मास्क न घातल्याने बॉस भडकला, दिव्यांग महिला कर्मचाऱ्याला मारहाण

राहुल गांधी यांनी यासंदर्भात ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्ट केला होता. गेल्या तीन महिन्यांत करोनाने देशाच्या अर्थव्यवस्थेचे मोठे नुकसान झाले आहे. याचा सर्वाधिक फटका गरीबांना बसला आहे. पण सरकारने गेल्या तीन महिन्यात २२ वेळा इंधनदरवाढ केली आहे. प्रत्येक गरीब कुटुंबाच्या खात्यात ७ हजार रुपये जमा करण्याची मागणी आपण सरकारला केली होती. पण ती फेटाळण्यात आली. चीनने देशाच्या सीमेवत चार ठिकाणी घुसखोरी केली आहे. हे आम्हाला माहिती आहे. आता चिनी सैन्याला तुम्ही भारतीय भूमीतून कसं आणि कधी बाहेर करणार, हे सांगा, असा सवाल राहुल गांधींनी केला होता.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

म. टा. वृत्तसेवा, सटाणा मागील काही वर्षात शेतात सततची नापिकी आणि वाढत्या कर्जाच्या ओझ्याखाली दबल्याने तळवाडे दिगर येथील शेतकऱ्याने शुक्रवारी (दि.२२) आपल्या शेतातील...

Bharat Arun: चौथी कसोटी जिंकण्यासाठी भारतीय संघाने घेतली होती मोठी रिस्क – aus vs ind indian cricket team bowling coach bharat arun reaction on...

नवी दिल्ली: ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिकेत भारतीय संघाने घेतलेल्या एका धाडसी निर्णयामुळे विजय मिळाल्याचे संघाचे गोलंदाजीचे कोच भरत अरुण ( bharat arun) यांनी सांगितले....

Anna Hazare: अण्णा हजारेंच्या आंदोलनाचे काय होणार? संभ्रम वाढला – no team this time, anna hazare will alone go on fast over farmers issue

अहमदनगर: ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या आंदोलनासाठी यावेळी ‘टीम अण्णा’ तयार करण्यात आलेली नाही. वेळ पडलीच तर हजारे एकटेच उपोषण सुरू करणार, हे...

Recent Comments