Home शहरं मुंबई congress on coronil: Congress On Coronil 'कोरोनील' ही फसवणूक; रामदेव बाबांवर कलम...

congress on coronil: Congress On Coronil ‘कोरोनील’ ही फसवणूक; रामदेव बाबांवर कलम ४२० लावा: काँग्रेस – cheated through coronil impose section 420 on baba ramdev says congress


मुंबई: ‘ कोरोनील ’ औषधाने करोना बरा होतो, असा दावा करून ‘ पतंजली ‘ ने मोठी प्रसिद्धी मिळवली. परंतु, राजस्थान सरकार व उत्तराखंड सरकारने कारवाईचा बडगा उगारताच असे औषध निर्माण केलेच नाही, असा पवित्रा पतंजलीने घेतला आहे. कारवाईच्या भीतीने त्यांनी भूमिका बदलली असली तरी करोना बरा करणारे औषध निर्माण केल्याचा खोटा दावा करून जनतेची दिशाभूल, फसवणूक व बनवाबनवी केल्याबद्दल रामदेव बाबा, आचार्य बालकृष्ण, डॉ. बलबीर सिंह तोमर यांच्यासह त्यांच्या ६ सहकाऱ्यांवर ४२० कलमाखाली गुन्हा दाखल करावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने राज्य सरकारकडे केली आहे. ( Congress On Coronil )

वाचा: ‘कोरोनिल रोग प्रतिकारशक्ती वाढवणारे, पण ते करोनावरील औषध नाही’

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस रामकिशन ओझा यांनी यासंदर्भात राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना पत्र लिहिले आहे. करोनाच्या गंभीर संकटाचा सामना आपण सर्वजण करत असताना काही लोक या संकटातही गैरफायदा घेत असल्याचे दिसत आहे. पतंजली या आयुर्वैदिक औषध कंपनीने या संधीचा गैरफायदा घेण्यासाठी ‘कोरोनील’ नावाचे औषध आणल्याचा दावा केला होता. परंतु या औषधाची कोठेही चाचणी केलेली नव्हती. हा सर्व प्रकार जनतेची दिशाभूल, फसवणूक करणारा असल्याने नागपूरच्या कोराडी पोलीस स्टेशनमध्ये २४ जून २०२० रोजी रामदेवबाबा व त्यांच्या साथीदारांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा, यासाठी अर्ज दाखल केलेला आहे. परंतु आजपर्यंत एफआयआर दाखल करण्यात आलेला नाही, असे ओझा यांनी गृहमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले आहे.

वाचा: कोरोनिलवरून बाबा रामदेव भडकले; केला ‘हा’ खुलासा

पतंजलीने आता भूमिका बदलली असली तरी अशापद्धतीने जनतेची फसवणूक करणे हा एक गुन्हाच आहे. त्यामुळे या तक्रारीची तातडीने दखल घेऊन रामदेवबाबांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश संबंधित पोलीस स्टेशनला द्यावेत, अशी मागणी ओझा यांनी गृहमंत्री देशमुख यांच्याकडे केली आहे.

पतंजलीची पलटी

पतंजलीचं कोरोनील औषध कात्रीत सापडलं असलं तरी पतंजलीकडून मात्र वेगवेगळी विधानं करून त्याचं समर्थन करण्यात येत आहे. कोरोनील हे औषध विकण्यावर आयुष मंत्रालयाने बंदी घातलेली नाही, असे आज पतंजली आयुर्वेदने स्पष्ट केले आहे. कंपनीने काही दिवसांपूर्वी करोनावरील उपचारासाठी कोरोनील या नावाचे औषध आणले होते. मोठा गाजावाजा करत हे औषध लॉन्च करण्यात आले. मात्र, या औषधाच्या निर्मितीसाठी कोणतीच पूर्वपरवानगी घेण्यात आली नव्हती असे समोर आल्याने एकच खळबळ उडाली होती. आता तर कोरोनील हे औषध करोना या आजारावरील औषध नाही तर रोग प्रतिकारशक्ती वाढवणारे हे औषध आहे, अशी कोलांटउडी पतंजलीने मारली आहे. दुसरीकडे कोरोनीलच्या विक्रीस मान्यता मिळाली आहे मात्र करोनावरील औषध म्हणून त्याची विक्री करता येणार नाही.

वाचा: कोरोनील: बाबा रामदेव यांच्याविरोधात महाराष्ट्रातील ‘या’ कोर्टात तक्रारSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

public health service in nashik: सार्वजनिक सुटीतही ओपीडी सुरूच ठेवा – opd service in civil hospital and other government hospital should be continue even...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिकसिव्हिल हॉस्पिटलसह अन्य सर्व सरकारी हॉस्पिटल्समध्ये दुपारी १ ते ४ यावेळेत विशेष बाह्यरुग्ण विभाग कार्यान्वित करावा. तसेच योगा क्लासेससारखे...

tractor rally: शेतकऱ्यांनी दिल्ली पोलिसांना ‘ट्रॅक्टर रॅली’साठी मागितली लिखित परवानगी – tractor rally : farmers sought written permission from delhi police for republic day...

नवी दिल्ली : कृषी कायद्यांविरोधातील शेतकरी आंदोलन आज ६० व्या दिवशीही सुरूच आहे. याच दरम्यान शेतकऱ्यांनी २६ जानेवारी रोजी 'प्रजासत्ताक दिना'ला ट्रॅक्टर रॅली...

Recent Comments