Home विदेश coranavirus in animals: बकरीलाही करोना; करोना चाचणी किट्सवर प्रश्न! - coronavirus outbreak:...

coranavirus in animals: बकरीलाही करोना; करोना चाचणी किट्सवर प्रश्न! – coronavirus outbreak: goat, sheep and pawpaw samples test positive for covid-19


दोदोमा: करोनाची चाचणी करणाऱ्या किट्सवर काही देशांमध्ये प्रश्न निर्माण होत असताना आफ्रिका खंडात एक वेगळाच प्रकार समोर आला आहे. बकरी आणि एका फळाचीही करोना चाचणी पॉझिटीव्ह आल्यामुळे खळबळ उडाली. टाझांनिया देशात हा प्रकार उघडकीस आला. राष्ट्रपती जॉन मगुफुली यांनी या प्रकाराबाबत नाराजी व्यक्त करत चौकशीचे आदेश दिले आहेत.

टाझांनियामध्ये संशियत रुग्णांच्या तपासणीसाठी परदेशातून करोना चाचणी किट्स आल्या आहेत. टाझांनियामध्ये १६ मार्चपासून करोनाबाधित रुग्ण आढळत आहेत. ‘अल जझिरा’ने दिलेल्या माहितीनुसार, करोना किट्सची चाचणी करण्यासाठी बकरी, पॉपॉ फळ आणि मेंढराचे नमुने देण्यात आले होते. त्यानंतर आलेल्या रिपोर्टमध्ये बकरी आणि पॉपॉ फळात करोनाचा संसर्ग असल्याचे आढळले. राष्ट्रपती जॉन मगुफुली यांनी हा प्रकार तांत्रिक दोष असू शकतो अशी शक्यता वर्तवली आहे. या वृत्तानंतर नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. त्याआधी राष्ट्रपतींनी करोना संसर्गापासून वाचण्यासाठी प्रार्थना करण्याचे आवाहन केले होते. त्यावरही नागरिकांनी नाराजी व्यक्त केली होती.

वाचा: ‘साठेबाजीसाठी चीनने करोनाची माहिती गुप्त ठेवली’
वाचा: ‘ड’ जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे करोनाचा धोका!

दरम्यान, राष्ट्रपती जॉन मगुफुली यांनी मादागास्करच्या राष्ट्रपतींनी सुचवलेले हर्बल उपचार सुरू करणार असून ते औषध आणण्यासाठी एक खास विमान मादागास्करला पाठवणार असल्याचे त्यांनी शनिवारी सांगितले. वर्ल्डोमीटर या संकेतस्थळानुसार, टाझांनियामध्ये करोनाचे ४८० बाधित आढळले आहेत. तर १६ जणांचा मृत्यू झाला आहे.

आणखी वाचा:
‘भारतातील करोनामृत्यू अयोग्य आहारपद्धतीमुळे’
करोना: अमेरिकेतील ‘या’ शहरात प्रेतांचा खच आणि दुर्गंधSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Karnataka: मुलीशी मैत्री केल्याने मुलाची हत्या; हत्येपूर्वी नाक, गुप्तांग कापून मृतदेह नदीत फेकला – karnataka 14 year old boy killed over friendship with girl...

हायलाइट्स:१४ वर्षीय मुलाची निर्घृण हत्याहत्येपूर्वी मुलाचे नाक आणि गुप्तांग कापलेमृतदेह भीमा नदीपात्रात फेकलाकर्नाटकातील कलबुर्गीमधील धक्कादायक घटनाकलबुर्गी: मुलीसोबत मैत्री केली म्हणून एका १४ वर्षीय...

SBI Home Loan Interest Rate: कर्ज झालं स्वस्त; भारतीय स्टेट बँकेची ‘या’ ग्राहकांसाठी गृहकर्जावर विशेष सवलत – Sbi Reduce Home Loan Rate For Limited...

हायलाइट्स:'एसबीआय'चे गृहकर्ज दर सिबिलशी संलग्न आहेत. चांगला सिबिल असणाऱ्या ग्राहकांना सवलतीत मिळणार गृहकर्जआज बँकेने व्याजदरात केली ०.७० टक्के कपातमुंबई : तुम्ही जर गृहकर्ज...

'चांदीचे बंगले'.. जगण्याचा संघर्ष

मणिबेली, (ता. अक्कलकुवा, जि. नंदुरबार) : नर्मदा बचाव आंदोलनामुळे आणि सोशल मीडियामधून नर्मदेकाठचे हे गाव अनेकांपर्यंत पोहचले आहे. या मणिबेलीला निवडणुकांच्या निमित्ताने...

Recent Comments