Home शहरं मुंबई coroanvirus positive in maharashtra: दिवसभरात २९३३ करोना रुग्णांची भर; १२३ करोनाबाधितांचा मृत्यू...

coroanvirus positive in maharashtra: दिवसभरात २९३३ करोना रुग्णांची भर; १२३ करोनाबाधितांचा मृत्यू – 2933 more coroanvirus positive found in maharashtra


मुंबईः राज्यातील करोनामुळे दगावणाऱ्यांची संख्या काही कमी होताना दिसत नाही. राज्यात आज १२३ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुळे राज्यातील करोनाबळींची संख्या २७१०वर पोहोचली आहे. तर राज्यात २९३३ नवे करोनाबाधित सापडल्याने राज्यातील करोनाबाधितांची संख्याही ७७ हजार ७९३वर पोहोचली आहे. दिलासादायक बाब म्हणजे आज राज्यात एकूण १३५२ रुग्ण करोनामुक्त झाल्याने राज्यातील करोनामुक्त झालेल्या रुग्णांचा आकडा ३३ हजार ६८१वर पोहोचला आहे.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ५ लाख १० हजार १७६ नमुन्यांपैकी ७७ हजार ७९३ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ५ लाख ६० हजार ३०३ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात संस्थात्मक क्वारंटाईन सुविधांमध्ये ७३ हजार ०४९ खाटा उपलब्ध असून सध्या ३० हजार ६२३ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ४३. २९ टक्के आहे तर राज्यातील मृत्यू दर ३.४८ टक्के आहे.

निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा; रायगडमध्ये लाखो घरांचे नुकसान

आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ८५ पुरुष तर ३८ महिला आहेत. आज नोंद झालेल्या १२३ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ७१ रुग्ण आहेत तर ४४ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ८ जण ४० वर्षांखालील आहे. या १२३ रुग्णांपैकी ९२ जणांमध्ये ( ७५ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता २७१० झाली आहे. आज नोंद झालेल्या एकूण मृत्यूपैकी ३० मृत्यू हे मागील दोन दिवसांतील आहेत तर उर्वरित मृत्यू ३० एप्रिल ते १ जून या कालावधीतील आहेत.

करोनाच्या भीतीने दांड्या मारणाऱ्या BMC कर्मचाऱ्यांची नोकरी जाणारSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Rohit Pawar Welcome Eknath Khadse – खडसे राष्ट्रवादीत! रोहित पवारांनी सांगितला निसर्गाचा नियम

अहमदनगर:एकनाथ खडसे यांनी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याची घोषणा केल्यानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहेत. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार...

aurangabad News : ‘सफारी पार्क’च्या जादा जागेचा प्रस्ताव धूळखात – the proposal for extra space for a ‘safari park’ is in the dust

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद'सफारी पार्क'च्या जादा जागेचा प्रस्ताव गेल्या काही महिन्यांपासून मंत्रालयात धूळखात पडून आले. त्यावर निर्णय न झाल्यामुळे 'लायन सफारी' आणि 'टायगर...

LIVE : अखेर एकनाथ खडसे यांनी भाजपला ठोकला रामराम

कोरोनाचे अपडेट्स आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडींचे अपडेट्स Source link

Recent Comments