Home देश corona cases per lakh population: भारतात एक लाखामागे ७.१, तर जगात ६०...

corona cases per lakh population: भारतात एक लाखामागे ७.१, तर जगात ६० केसेस – india’s covid cases per lakh population at 7.1 world at 60


नवी दिल्ली : देशात एक लाख लोकसंख्येमागे करोनाच्या ७.१ केसेस आहेत, तर जगात हाच आकडा जगासाठी ६० एवढा आहे. मोठ्या प्रमाणात करोनाचे रुग्ण आढळलेल्या देशांसोबत आरोग्य मंत्रालयाने आकडेवारीची तुलना करुन ही माहिती दिली. देशात सोमवारी करोनाबाधितांच्या संख्येत मोठा उद्रेक झाला. २४ तासात तब्बल ५२४२ प्रकरणे आढळून आली. आता देशातील आकडा एक लाखाच्याही पुढे गेला आहे. यात महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण आहेत.

महाराष्ट्रानंतर गुजरातचा क्रमांक लागतो. गुजरातमध्ये महाराष्ट्राच्या तुलनेत मृत्यूदर अधिक आहे. आकडेवारीनुसार, महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये मृत्यू दर राष्ट्रीय मृत्यूदराच्या तुलनेत अधिक आहे. अर्थतज्ञ शमिका रवी यांच्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्र आणि गुजरातमधील १० लाखांमागे मृत्यू दर हा राष्ट्रीय मृत्यूदराच्या चार पट जास्त होता. गुजरातमध्ये १० लाख लोकसंख्येमागे १०.३३ टक्के, तर महाराष्ट्रात ९.८१ एवढा मृत्यू दर आहे.

देशात करोनाबाधितांच्या संख्येनं एक लाखाचा टप्पा ओलांडला

देशात एक दिलासादायक बातमी म्हणजे रुग्ण बरे होण्याचं प्रमाण वाढलं आहे. गेल्या २४ तासात २७१५ रुग्ण बरे होऊन घरी गेल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली. रुग्ण बरे होण्याचा दर हा ३८.२९ टक्के एवढा आहे. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, स्पेनमध्ये एक लाख लोकसंख्येमागे ४९४ केसेस होत्या, जो सर्वात जास्त आहे. यानंतर अमेरिकेचा क्रमांक लागतो. अमेरिकेत एक लाख लोकसंख्येमागे ४३१ केसेस आहेत. इटलीमध्ये एक लाख लोकसंख्येमागे ३७२, तर ब्रिटनमध्ये ३६१ केसेस आहेत.

करोना संकटादरम्यान ५५ दिवसांच्या लॉकडाऊनंतरही संक्रमितांच्या आकड्यात सतत लक्षणीय वाढ होताना दिसून आली आहे. भारतात करोना संक्रमितांचा आकडा १ लाखांच्या पुढे गेला आहे. एक लाखांचा आकडा पार करणारा भारत हा जगातील ११ वा देश ठरला आहे. देशात एव्हाना ३ हजारांहून अधिक जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत, तर जवळपास ३६ हजारहून अधिक लोकांनी करोनावर यशस्वीरित्या मात केली.

क्वारंटाइन महिला पोलिसाने जे केले ते कुणालाच नाही जमले!

जगातील करोनाबाधितांच्या आकड्यावर नजर टाकली असता, सर्वाधिक रुग्णसंख्येच्या बाबतीत अमेरिका अजूनही आघाडीवर आहेत. अमेरिकेत आत्तापर्यंत १५ लाख ५० हजार २९४ रुग्ण आढळलेत, तर ९१ हजार ९८१ जणांचा मृत्यू झालाय. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या रशियात २ लाख ९० हजार ६७८ रुग्ण आहेत, तर २ हजार ७२२ रुग्णांचा मृत्यू झालाय. त्यानंतर स्पेन, ब्राझील, युनायटेड किंगडम, इटली, फ्रान्स, जर्मनी, तुर्की, इराण हे देश करोना संक्रमणाच्या बाबतीत भारताच्या पुढे आहेत.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Ahmednagar: ‘शासनाचा माणूस’ आहे सांगून ‘तो’ रुग्णांना घालायचा गंडा, पण… – ahmednagar man duped patients pretext of health policy

म. टा. प्रतिनिधी, नगर: गरीब रुग्णांना मोफत आरोग्य सेवा मिळावी, यासाठी सरकारतर्फे महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना सुरू करण्यात आली. मात्र, त्याच...

संमेलनाबाबत संभ्रम

म. टा. प्रतिनिधी, एकीकडे चाळीस समित्यांच्या रोजच्या उठाबशांनी सर्वत्र चर्चेत आलेल्या साहित्य संमेलनाच्या आयोजनाचा वाढत्या करोनापुढे निभाव लागणार का, असा सवाल आता साहित्य...

jalna khamgaon railway line: जालना खामगाव रेल्वे मार्गाचे सर्वेक्षणाचे काम अंतिम टप्प्यात – work of jalna khamgaon railway line is in final stage

औरंगाबाद: राज्यात ४८ रेल्वेमार्ग सर्वेक्षण घोषित करण्यात आलेले आहेत. यात आतापर्यंत फक्त तीन मार्गाचेच सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले आहे. त्याचा अहवाल अंतिम करण्याचे...

Recent Comments