Home शहरं मुंबई corona center: 'करोना केंद्र हे भ्रष्टाचाराचे कुरण' - corona center is a...

corona center: ‘करोना केंद्र हे भ्रष्टाचाराचे कुरण’ – corona center is a breeding ground for corruption


म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

करोनाच्या प्रतिबंधासाठी उभारण्यात आलेली विविध ठिकाणची करोना काळजी केंद्रे ही भ्रष्टाचाराचे कुरण ठरले असून, तेथे मुंबईकर करदात्या नागरिकांच्या पैशांची उधळपट्टीच नव्हे,तर लूट चालली आहे, असा आरोप भाजपने केले आहे. याप्रकरणी आयुक्तांना पत्र देऊन, लोकायुक्तांकडे दाद मागण्यात येणार आहे, असे भाजपचे पालिकेतील पक्षनेते विनोद मिश्रा यांनी सांगितले.

या केंद्राची माहिती देण्यासाठी भाजपतर्फे गुरुवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पत्रकार परिषद घेण्यात आली. त्यावेळी पक्षाचे गटनेते प्रभाकर शिंदे आणि मुलुंडचे आमदार मिहीर विनोद कोटेचा उपस्थित होते.

विनोद मिश्रा म्हणाले की, विविध ठिकाणी उभारलेली करोना केंद्रे निरुपयोगी ठरली आहेत. त्यांच्या बांधकामावर अमाप पैसा खर्च झाला आहे. बाजारात किरकोळ खरेदीत मिळणाऱ्या किमतीपेक्षाही कितीतरी जादा दराने साहित्य खरेदी तसेच कंत्राटदाराला भाड्यापोटी अधिक रक्कम देण्यात येत आहे. ऑक्सिजन सिलिंडरमध्येही मोठा भ्रष्टाचार असल्याचे मिश्रा म्हणाले.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

salon in western railway stations: रेल्वे स्थानकांमध्ये आता सलूनही – western railway has decided to start air-conditioned salon on mumbai central station with six...

म. टा. प्रतिनिधी, मुंबईघड्याळ्याच्या काट्याप्रमाणे धावणाऱ्या मुंबईकरांचा थकवा दूर करण्यासाठी रेल्वे स्थानकांतच काही आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. मुंबई सेंट्रलसह सहा...

Recent Comments