Home महाराष्ट्र Corona death: खासगी रुग्णालयांना इशारा; करोना मृत्यूची माहिती दडवल्यास कारवाई - action...

Corona death: खासगी रुग्णालयांना इशारा; करोना मृत्यूची माहिती दडवल्यास कारवाई – action for withholding coronary death information


म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

रुग्णालयात करोनामुळे झालेल्या मृत्यूंची माहिती महापालिकेला देण्यासाठी खासगी रुग्णालयांना अंतिम संधी देण्यात आली आहे. २९ जून रोजी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत माहिती न कळविल्यास साथरोग नियंत्रण कायदा १८९७ अन्वये कठोर कारवाई करण्याचा इशारा पालिकेने दिला आहे.

करोना‌मुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींची माहिती पालिकेला ४८ तासांच्या आत कळविणे बंधनकारक असल्याचे आदेश ८ जून रोजी पालिका आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी दिले होते. त्यानंतर काही खासगी रुग्णालयांनी माहिती दिली असून काही रुग्णालयांनी दिलेली नाही. याबाबत शुक्रवारी पालिका आयुक्तांनी वैद्यकीय क्षेत्रातील ज्येष्ठ तज्ज्ञ मंडळी, पालिकेच्या प्रमुख रुग्णालयांचे अधिष्ठाता, डॉक्टर मंडळी यांच्यासोबत पालिकेचे अधिकारी यांची व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली.

औषध साठ्याबाबत सूचना

पालिकेच्या रुग्णालयांमध्ये व उपचार केंद्रांमध्ये दाखल असलेल्या रुग्णांसाठी दर महिन्याला आवश्यक असणाऱ्या औषधांची गरज लक्षात घ्यावी. टोसिलिझुमॅब, रेमेडेसिव्हिर यांसारख्या आवश्यक औषधांचा महिन्याभरासाठीचा पुरेसा साठा रुग्णालयांनी आपापल्या स्तरावर करावा. संबंधित औषधे तयार करणाऱ्या उत्पादक कंपन्यांशी संपर्क साधून औषधे थेट घेण्यासाठी आवश्यक प्रक्रिया व कार्यवाही करावी, असे निर्देश आयुक्तांनी बैठकीत दिले.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments