Home शहरं मुंबई Corona death: corona death : धक्कादायक! मुंबईतील अनेक करोना रुग्णांचा मृत्यू रात्री...

Corona death: corona death : धक्कादायक! मुंबईतील अनेक करोना रुग्णांचा मृत्यू रात्री एक ते पहाटे ५च्या सुमारास – coronavirus: mumbai civic body bmc on corona death


मुंबई:मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात उपचार घेणाऱ्या बहुतेक करोना रुग्णांचा मृत्यू रात्री एक ते पहाटे ५च्या सुमारास झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे हा प्रकार थांबण्यासाठी महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी आरोग्य प्रशासनाला काही सूचनाही केल्या आहेत.

रात्री १ ते पहाटे ५ या कालावधीमध्ये रुग्ण प्रसाधनगृहामध्ये जाण्यासाठी ऑक्सिजन संयंत्र काढून जातात. नेमके त्यावेळी अनेक मृत्यू घडले आहेत, असं सांगतानाच प्रत्येक रुग्ण शय्येला( बेड) एक मलपात्र असणे आवश्यक आहे. किमान ४ बेड समवेत शौचकूप असावेत. कार्डबोर्डपासून बनवलेले मलपात्र देखील वापरले जाऊ शकते. याबाबत प्रत्येक सेवेकर्‍याने आपापली जबाबदारी पार पाडणे आवश्यक आहे. व्हिडिओ यंत्रणेच्या माध्यमातून प्रत्येक रुग्णावर विभाग प्रमुख आणि संस्था प्रमुख यांनी बारकाईने लक्ष ठेवावे आणि कुठेही विलंब होणार नाही, कोणतीही कमतरता राहणार नाही याची वेळोवेळी खात्री करावी. प्रत्येक मृत्यू प्रकरणाबाबत सविस्तर परीक्षण केले जावे आणि गरजेनुसार न्यायवैद्यकीय परीक्षणासाठी व्हिडिओ तयार ठेवावा, अशा सूचनाच पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी आज दिल्या आहेत.

महापालिकेने पालिकेच्या रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आलेल्या रुग्णांचे प्राण वाचावे म्हणून ‘प्राण वाचवा’ हा कृती कार्यक्रम हाती घेतला आहे. या अंतर्गत, मध्यम तीव्र आणि तीव्र स्वरूपाची बाधा असलेल्या प्रत्येक रुग्णांची संपूर्ण जबाबदारी स्वीकारून उपचार करण्यात यावेत. अशा प्रत्येक रुग्णाच्या बाबतीत वरिष्ठ आणि कनिष्ठ डॉक्टरांनी दिवसातून किमान दोन वेळा व्हिडिओ किंवा टेलिफोनच्या माध्यमातून संपर्कात राहणे बंधनकारक करण्यात आले आहे. सर्व रुग्ण हे डॉक्टर, परिचारिका आणि संबंधित आरोग्य कर्मचारी यांची सांघिक जबाबदारी असेल. अशा रुग्णाची करोना उपचारांसह संपूर्ण पूरक काळजीही घेतली गेली पाहिजे. निश्चित करून दिलेल्या वैद्यकीय कार्यपद्धतीनुसार प्रत्येक कागदपत्रे/दस्तावेज पडताळावीत, जेणेकरून प्रत्येक प्रक्रियेचे पालन केले जात असल्याची खातरजमा होवून कोणतीही बाब शिल्लक राहणार नाही. विषाणू रोधी (antiviral), IL6, स्टिरॉइड, प्लाझ्मा यासह औषधांचा पुरेसा साठा असल्याची खात्री करावी आणि त्यांचा योग्य उपयोग करावा, असे आदेशही चहल यांनी दिले आहेत.

चिनी अॅप्सवरील बंदीसाठी जवानांच्या बलिदानाची वाट पाहात होता का?: राऊत

दरम्यान, करोनाबाधितांमध्ये सौम्य किंवा लक्षणे नसलेल्या रुग्णांचे प्रमाण अत्याधिक आहे. उपचाराअंती हे रुग्ण बरे होतात आणि बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण हे आता उपचार घेत असलेल्या रुग्णांपेक्षा अधिक आहे. मध्यम व तीव्र बाधा असलेल्या रुग्णांसाठी ऑक्सिजन बेड, अतिदक्षता उपचार, जीवरक्षक प्रणाली (व्हेंटिलेटर) अशा सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. सोबत निरनिराळी परिणामकारक औषधी पुरवठा करून, प्लाझ्मा थेरपीसारख्या पद्धतीचा उपयोग करून रुग्णसेवा करण्यात येत आहे. रुग्णसेवा करताना रुग्णांचे प्राण वाचविणे, त्यांना यशस्वी औषधोपचार देऊन बरे करणे, ही महानगरपालिका प्रशासन व महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेची सर्वोच्च प्राथमिकता आहे, असं सांगतानाच मृत्यू दर नियंत्रणात आणताना त्यामध्ये अधिकाधिक प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी, महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये कोविड मृत्यूदर आणखी कमी व्हावा यासाठी प्रशासनाला ‘महापालिका सांघिक कृती कार्यक्रम’ (‘टीम बीएमसी स्ट्रॅटेजी’) आखून दिल्याचंही आयुक्तांनी स्पष्ट केलं आहे.

पोलिस दलावर करोनाचे संकट; २४ तासांत ६७ करोनाग्रस्तांची नोंद

गर्भधारणेत येतोय अडथळा? मग ‘ही’ काळजी घेणं आहे अत्यंत आवश्यक!Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

New Inflation Index For Employees Will Easy To Calculate Dearness Allowance – नोकरदारांसाठी नवा महागाई निर्देशांक; महागाई भत्त्याची सवलत ठरवणे होणार सोपे

वृत्तसंस्था, नवी दिल्ली : औद्योगिक आस्थापनांतून, कारखान्यांतून काम करणाऱ्या नोकरदारांसाठी केंद्र सरकारने गुरुवारी नवा महागाई निर्देशांक सुरू केला. सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणारा महागाई भत्ता...

Hingulambika Devi Temple: साडेतीनशे वर्षांचा इतिहास; देवीचे मूळ पाकिस्तानात – three and a half hundred years of history of the hingulambika devi temple

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादशहराच्या मध्यवस्तीतील म्हणजे रंगारगल्लीतील श्री हिंगुलांबिका देवीच्या मंदिराला ३५० वर्षांचा इतिहास आहे. यंदा करोना परिस्थितीमुळे प्रथमच देवीची मिरवणूक निघणार नाही.नवरात्रात...

Recent Comments