Home शहरं मुंबई corona death in mumbai police : मुंबई पोलीस दलाला धक्का; आणखी एका...

corona death in mumbai police : मुंबई पोलीस दलाला धक्का; आणखी एका कॉन्स्टेबलचा मृत्यू – mumbai police’s 53-year-old head constable dies of covid-19


मुंबई: पोलीस दलात करोनाचा संसर्ग वाढतच असून आज एका ५३ वर्षीय हेड कॉन्स्टेबलचा करोनामुळं मृत्यू झाला. करोनानं घेतलेला हा दुसरा बळी असून त्यामुळं मुंबई पोलीस दल हादरलं आहे. कालच वाकोला पोसीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका हेड कॉन्स्टेबलचा करोनामुळं मृत्यू झाला होता.

नवी मुंबईतील कामोठे येथे राहणाऱ्या या हेड कॉन्स्टेबलला कोविड विषाणूचा संसर्ग झाल्याचं निदान २३ एप्रिल रोजी झालं होतं. त्यांच्यावर एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, आज पहाटे पावणे पाचच्या सुमारास उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. तीन वर्षांपूर्वी त्यांना कॅन्सरचं निदान झालं होतं. त्यांच्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आली होती. त्यानंतर ते पूर्वीप्रमाणेच कार्यरत होते.

मुंबई पोलीस आयुक्तांनी ट्विटरच्या माध्यमातून निधनाच्या वृत्तास दुजोरा दिला आहे. पोलीस दल त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी आहे, असं ट्विट पोलीस आयुक्तांनी केलं आहे.

…तरी ठाकरे सरकार पडणार नाही: राऊत

महाराष्ट्रात लॉकडाउनच्या काळात पोलीस दिवसरात्र डोळ्यांत तेल घालून पहारा देत आहेत. स्वत:च्या आरोग्याची पर्वा न करता पोलीस सेवा बजावत आहेत. त्यातच आता पोलिसांनाही करोनाने गाठले असून आतापर्यंत राज्यात ९६ पोलिसांना करोनाची लागण झाली आहे. त्यात १५ पोलिस अधिकारी आणि ८१ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments