Home संपादकीय corona let's help each other: खबर राज्याची : उत्तर महाराष्ट्र- एकमेका साह्य...

corona let’s help each other: खबर राज्याची : उत्तर महाराष्ट्र- एकमेका साह्य करू… – uttar maharashtra coronavirus pandemic let’s help each other


संपत थेटे
sampat.thete@timesgroup.com

मुंबई, पुण्यापाठोपाठ हॉटस्पॉट बनलेल्या मालेगावचा करोनामुक्तीच्या दिशेने प्रवास सुरू झाल्याने, नाशिकसह उत्तर महाराष्ट्राने सुटकेचा नि:श्वास सोडला खरा; परंतु आता नाशिक आणि जळगावमध्ये करोना पॉझिटिव्ह रुग्णांचे रोजचे उच्चांक काळजात धडकी भरवत आहेत. या दोन जिल्ह्यांमधील बाधितांचा आकडा साडेपाच हजारांच्या घरात पोहोचल्याने, गेले तीन महिने झुंजणारी शासकीय यंत्रणा गांगरून गेल्यासारखी स्थिती आहे. अर्थात, तब्बल साडेतीन हजार रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी गेल्याने ते खचलेले नाहीत; त्यामुळेच शेवटचा रुग्ण बरा होईपर्यंत हार न मानण्याच्या या यंत्रणेच्या निर्धाराचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे. यासोबतच आजवर चारशेपेक्षा अधिक रुग्णांना प्राण गमवावे लागल्याने, उत्तर महाराष्ट्रावरील चिंतेचे मळभ आणखी गडद झाले आहे.

आधीच ‘लॉक’ झालेल्या अर्थचक्रामुळे बेजार झालेल्या नागरिकांची नाही म्हटले, तरी सीमेवरील चिनी संकटामुळेही धडधड वाढलेली आहे; त्यामुळे आपणच आता आपले तारणहार, या वृत्तीने नाशिकमध्ये विविध व्यावसायिक, संघटना, नागरिक पहिल्यांदा घरातल्या करोना संकटाच्या पाडावासाठी सक्रिय झाले आहेत. शहराचा मध्यवर्ती भाग, तसेच उपनगरांत करोनाचा फैलाव आटोक्यात आणण्यासाठी, विविध व्यावसायिकांनी स्वयंस्फूर्तीने पाच ते दहा दिवसांचा ‘जनता कर्फ्यू’ लागू केला आहे. काही दिवसांपूर्वी ‘दुकाने उघडू द्या, वेळ वाढवून द्या’ अशी मागणी करणाऱ्या याच वर्गाने, आता स्वत:चे लॉकडाउन करून घेतले आहे. महाराष्ट्रात करोना विषाणूचा फैलाव मध्यावर असल्याने आणि एव्हाना या संसर्गाचा आवाका आल्याने, खासगी डॉक्टर मंडळीही अंमळ उशिराने का होईना; पण सक्रिय झाली आहेत. मालेगावमध्ये युनानी डॉक्टरांनी करोनाची साखळी तोडण्यात महत्त्वपूर्ण भूमिका वठविल्यानंतर, नाशिकमध्येही काही भागांत युनानी क्लिनिक सुरू झाली. त्याचबरोबर इंडियन मेडिकल असोसिएशनचे काही डॉक्टर्स जिल्हा रुग्णालयात रुग्णांसाठी सेवा देत आहेत. काही खासगी रुग्णालयांतही ओपीडीचा श्रीगणेशा झाल्याने, इतके दिवस खो‌ळंबलेल्या इतर रुग्णांनी सुस्कारा सोडला आहे. महापालिका आणि जिल्हा रुग्णालयांची दमणूक व त्यांच्यावरील वाढता ताण लक्षात घेत, पन्नास जनरल फिजिशियन्सची फौज मैदानात उतरणार आहे, हेदेखील शुभवर्तमानच आहे. पहिल्या टप्प्यात त्यांनी जुने नाशिक या सर्वाधिक करोनाबाधित क्षेत्रावर लक्ष केंद्रित केले आहे. त्यांच्या खांद्याला खांदा लावून काही सामाजिक संघटनाही जनजागृतीसह मदतकार्यात खारीचा वाटा उचलत आहेत.

जळगावमधील वाढत्या मृत्यूदराने राज्यासह दिल्लीचेही लक्ष वेधून घेतल्यानंतर, सरकारने मृत्यूची नेमकी कारणे जाणून घेण्यासाठी ‘डेथ ऑडिट’ केले. या कामात शहरातील काही खासगी डॉक्टरांनी मोलाची मदत केली. करोनामुळे होणाऱ्या मृत्यूंवर मात करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या ‘टास्क फोर्स’मध्येही, स्थानिक डॉक्टर्स मार्गदर्शकाच्या भूमिकेत आहेत. बाधित रुग्णांवर उपचारांसाठी कोव्हिड रुग्णालयांत जाऊन ते विनामोबदला सेवा देत आहेत. सुरुवातीपासूनच गरजूंना औषधे, कपडे, अन्नधान्य पुरविणाऱ्या दातृत्वाचा ओघ आजही अविरत सुरू आहे. भोवतालच्या नैराश्याच्या वातावरणातही, समाजात असे असंख्य करोनायोद्धे केवळ सामाजिक बांधिलकीपोटी कुठल्या ना कुठल्या रूपात, प्रसिद्धीचा बागुलबुवा न करता, भरघोस योगदान देत आहेत. झुंडीने येणाऱ्या संकटांच्या काळात असे समाजघटक एकत्र झाले आणि फूल ना फुलाची पाकळी देण्याच्या वृत्तीतून त्यांची विशाल साखळी तयार झाली, तर अशा संकटांच्या मालिका आपण सहज रोखू शकतो. किंबहुना, करोनाला इष्टापत्ती समजून, दातृत्वाच्या परंपरेला उजळा देऊ शकतो. चला तर मग, एकमेकांना साह्य करण्यासाठी दिव्याने दिवा पेटवून, करोनारूपी राक्षसाला भस्मसात करून, वर्तमान आणि भावी पिढीही सुरक्षित करू या. करोनामुक्तीचा कुठल्या तरी शहराच्या पॅटर्नचा दाखला देण्यापेक्षा, दातृत्वाचा, सामाजिक बांधिलकीचा हा पॅटर्न सर्वदूर पोहोचवू या!Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Rajesh Srivastava Death: छत्तीसगडच्या बड्या अधिकाऱ्याचा नागपुरात संशयास्पद मृत्यू; बदली होताच… – senior officer from chhattisgarh found dead in nagpur

हायलाइट्स:छत्तीसगडमधील बड्या अधिकाऱ्याचा नागपुरात संशयास्पद मृत्यू.पत्नीला १ मार्च रोजी बिलासपूर येथे सोडून आले होते नागपुरात.बदली झाल्याने तणावाखाली येऊन आत्महत्या केल्याचा संशय.नागपूर:छत्तीसगड मंत्रालयातील कोषागार...

jalyukt shivar latest news: Jalyukt Shivar Probe: ‘जलयुक्त शिवार’ची माहिती कोण लपवतंय?; ‘या’ जिल्ह्यात अधिकाऱ्यांची झाडाझडती – jalyukt shivar inquiry committee warned the officers

हायलाइट्स:फडणवीसांच्या काळातील जलयुक्त शिवार योजनेच्या चौकशीला वेग.चौकशी समिती नगर जिल्ह्यात घेत आहे कामांची माहिती.प्रशासनातील अनागोंदी समोर आल्याने समिती अध्यक्ष संतापले.नगर:देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील...

Recent Comments