मुंबई: करोना बाधितांचा आकडा राज्यात कमी होत असल्यामुळं समाधान व्यक्त होत असतानाच काल अचानक रुग्णांच्या संख्येत उच्चांकी वाढ झाली. रुग्णांच्या संख्येबरोबर मृतांचा आकडाही वाढत आहे. त्यामुळं प्रशासनाची चिंता काही प्रमाणात वाढली आहे. असं असलं तरी आजपासून राज्याच्या काही भागांत निवडक उद्योगधंदे सुरू होत आहेत. अर्थात, लॉकडाऊनचे नियम पाळून हे अर्थचक्र सुरू होणार आहे. जाणून घेऊन आजच्या दिवसभरातील ताज्या घडामोडी…
लाइव्ह अपडेट्स:
>> महाराष्ट्रात आतापर्यंत ५०७ रुग्ण करोनामुक्त
करोनाशी लढा: मुंबईतील ‘नायर’ आता ‘करोना’ रुग्णालय
राज्यात लॉकडाउन उल्लंघनाचे ५५ हजार गुन्हे दाखल
राज्यात आज 552 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व एकूण संख्या आता 4200 अशी झाली आहे. यापैकी 507 कोरोना बाधित रुग्ण ब… https://t.co/3vxQmIyrlK
— Rajesh Tope (@rajeshtope11) 1587311130000
>> राज्यातील करोनाबाधितांचा आकडा ४२०० वर, तर आतापर्यंत २२३ जणांचे बळी