Home शहरं पुणे corona positive: पुण्यात चोवीस तासांत २५८ जणांना करोना; ७ जण दगावले -...

corona positive: पुण्यात चोवीस तासांत २५८ जणांना करोना; ७ जण दगावले – 258 people of pune district have been found corona positive


पुणे: पुणे शहर आणि जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत २५८ जणांना करोनाची लागण झाली आहे. पुण्यासह पिंपरी- चिंचवडमध्येही रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. दिवसभरात सात जणांचा मृत्यू झाला. त्याशिवाय १७६ रुग्णांची प्रकृती गंभीर असून, ४७ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.

पुण्यात गेल्या २४ तासांत ६८१ जणांच्या चाचण्या घेण्यात आल्या. गंभीर रुग्णांची संख्या आज १७६ झाली असून, १२९ रुग्ण अतिगंभीर आहेत. ७७ रुग्ण नव्याने बरे होऊन घरी परतले. त्यामुळे आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या २,५५०पर्यंत पोहोचली आहे. पुण्यात रविवारी १८६ जणांना लागण झाली असून, पिंपरी-चिंचवडमध्ये ४६ जणांना लागण झाली आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात १८ आणि पुणे कँटोन्मेंट भागात ८ रुग्ण आढळले. पुणे शहर आणि जिल्ह्यात नव्याने २५८ जणांना लागण झाली असून, त्यामुळे रुग्णांची एकूण संख्या ५,६९४ पर्यंत पोहोचली आहे.

चाचण्यांची संख्या वाढत असल्याने त्याचा प्रयोगशाळांवर ताण येत आहे. त्यामुळे स्वॅबचे अहवाल येण्यास विलंब होत आहेत. परिणामी, मृतांचे स्वॅब आल्याशिवाय त्यांचा मृत्यू करोनाच्या संसर्गाने झाला की नाही, याचे निदान होत नाही. त्याचा परिणाम म्हणून दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी संबंधित मृताची नोंद केली जाते. ससून रुग्णालयात दोन दिवसांपूर्वी दाखल झालेल्या आणि त्याच दिवशी मृत्यू झालेल्या रुग्णाचा अहवाल शनिवारी उशिरा प्राप्त झाला. त्यात त्यांना करोनाची लागण झाल्याचे आढळले.

टेन्शन! राज्यात ३ हजार नवे करोनाबाधित सापडले; ५८ जणांचा मृत्यू

गुलटेकडी येथील २१ वर्षाच्या तरुणाचा मृत्यू झाला. त्याला न्यूमोनिया झाल्याचे निदान झाले. अन्य मृतांमध्ये भवानी पेठ, गणेश पेठ, सॅलिसबरी पार्क, गणेशनगर (येरवडा), नाना पेठ आदी भागांतील व्यक्तींचा समावेश आहे. मृतांमध्ये २१ वर्षांचा तरुण वगळता पन्नाशीच्या पुढील ज्येष्ठांचा समावेश आहे. नाना पेठेतील ६७ वर्षाच्या रुग्णाचा मृत्यू झाला. ही व्यक्ती सोलापूर येथील असल्याची नोंद करण्यात आली आहे. दिवसभरात सात जणांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली. त्यामुळे मृतांची संख्या २७६पर्यंत पोहोचली.

उद्यापासून मुंबईतूनही विमानसेवा सुरू; रोज २५ विमानांचे उड्डाण

फक्त गोरखपूरची ट्रेन ओडिशाला जावू देऊ नका; राऊतांचा गोयल यांना टोला

पुण्यातील आजची स्थिती

बरे होऊन घरी गेलेले पॉझिटिव्ह रुग्ण ९२

ससून रुग्णालयातील रुग्ण ७

नायडू रुग्णालयातील रुग्ण १२७

खासगी रुग्णालयातील रुग्ण ४५

गंभीर १७६

रविवारचे मृत्यू ७

एकूण पॉझिटिव्ह ५,६९४ (शहर ४,८५९, पिंपरी-चिंचवड ३४५, पुणे ग्रामीण १७२, पुणे कँटोन्मेंट आणि जिल्हा रुग्णालय ३१८ )Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

truck bike accident in aurangabad: ट्रकची धडक; दोन तरुण ठार – two young man died in truck and bike accident in aurangabad

ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास बीडबायपास रोडवरील नाईकनगर गेटसमोर घडली.  Source link

Sanjay Chavan: ‘ती’ जमीन सरकारकडे जमा करा – tehsildar shubham gupta has directed that land should be in the name of the government to...

म. टा. वृत्तसेवा, सटाणाबागलाणचे माजी आमदार संजय कांतीलाल चव्हाण हे आदिवासी नसल्याने त्यांना आदिवासींकडून खरेदी केलेल्या तालुक्यातील ठेंगोडा शिवारातील उमाजी नगर येथील सातबाऱ्यावरील...

more psu in pipeline for disinvestment: Budget 2021 आणखी सरकारी कंपन्यांचे खासगीकरण ; सोमवारी अर्थमंत्री करणार ‘बजेट’मध्ये घोषणा – finance minister unveil privatization plan...

हायलाइट्स: कॅबिनेटच्या बैठकीत खासगीकरण धोरणाला मंजुरी गेल्या वर्षी अर्थसंकल्पात २.१ लाख कोटींची निर्गुंतवणूक योजनाआगामी अर्थसंकल्पात किमान पाच कंपन्यांमध्ये निर्गुंतवणूकनवी दिल्ली : सार्वजनिक...

Recent Comments