Home संपादकीय corona Social ill effects: ‘करोना’चा सामाजिक दुष्परिणाम - the social ill effects...

corona Social ill effects: ‘करोना’चा सामाजिक दुष्परिणाम – the social ill effects of corona


डॉ. हर्षद भोसले

करोनाने जगामध्ये भय आणि क्लेशदायक परिस्थिती निर्माण केली व सबंध मानवी जीवनामध्ये एक प्रकारची गतिशून्यता आणली आहे. भारतही आज या आजाराशी मुकाबला करताना संघर्षमय परिस्थितीतून जातो आहे. आज भारतात करोनाग्रस्तांची संख्या लाखांत आहे. करोनाशी मुकाबला करण्यासाठी सरकार सर्व उपाययोजना करत आहे. लॉकडाउनही थोडे शिथिल करण्यात आले आहे. अशा संकटसमयी सार्वजनिक क्षेत्रामधील सामान्य जनतेच्या परहितकारक वृत्तीचीही कसोटी लागली आहे. करोनाग्रस्त रुग्णांकडे दया भावनेने पाहणे अपेक्षित होते; पण त्या ऐवजी समाजात तिटकारा अधिक प्रकर्षाने जाणवतो. करोना रुग्णांकडे लोक ज्या तिटकाऱ्याने पाहतात; त्यामुळे भारतीय समाजाचे सार्वजनिक क्षेत्र विवेकशून्य बनत चालले आहे. करोनामुळे व्यक्ती-व्यक्तींमधील नातेसंबंधाविषयी एक विवक्षित अन्वयार्थ लावण्याची संधी वैचारिक चार्चाविश्वाला दिली आहे.

करोनाची लागण झालेल्यांची संख्या एका बाजूला वाढत असताना, दुसऱ्या बाजूला त्यांच्या प्रती त्यांचेच शेजारी व नातेवाइक असंवेदनशील होताना दिसतात. करोनाची लागण झालेल्या व्यक्तीकडे कुत्सित दृष्टीने पाहिले जात आहेच; पण अनेक ठिकाणी त्या व्यक्तीला अक्षरशः वाळीत टाकण्याच्याही घटना घडत आहेत. मनुष्य हा सामाजिक प्राणी आहे. समाजामध्ये राहूनच त्याला मनुष्यत्व प्राप्त होते, हे प्राचीन ग्रीक विचारवंत अॅरिस्टॉटल याने सांगितले. त्याने मनुष्याचा विवेक व परहितकारक वृत्ती आपल्यापुढे ठेवून मूल्यलक्ष्यी विवेचन केले होते; परंतु करोनामुळे मनुष्याची वाटचाल एकमयतेतून तुटकपणाकडे होत आहे, माणूसपणाचा अध:पात होताना दिसतो आहे. मनुष्य अधिक आत्ममग्न झाला आहे, म्हणूनच करोनाच्या निमित्ताने सार्वजनिक विवेकाचा भारतीय समाजव्यवस्थेत सत्वभ्रंश झाल्यासारखी परिस्थिती ओढावली आहे.

प्रस्तुत लेख हा सार्वत्रिक नागरी वर्तनाच्या चर्चाविश्वात उद्गम पावलेल्या, मानवी व्यवहाराच्या कक्षेतील ज्या ‘अपकर्षण व्यवहाराचा’ उगम झाला आहे, त्याची समीक्षा करणारा आहे. हा ‘अपकर्षण व्यवहार’ करोना रुग्णांप्रती व या आजाराशी लढणाऱ्या डॉक्टर, पोलिस, निमवैद्यकीय सेवा देणारे कर्मचारी यांच्याप्रती द्वेषपूर्ण व्यवहार व त्यांना वाळीत टाकण्याची वृत्ती, असा सध्या आपल्या सार्वजनिक क्षेत्रात दिसून येते. ही क्लेशदायक बाब आहे; त्यामुळे भारतातील मूल्यात्मक सार्वजनिक विवेकच धोक्यात आला आहे.

सार्वत्रिक विवेकाचे आदर्श तत्त्व, भौतिक जगात व्यक्ती व्यक्तींमधील नैतिक व्यवहार, नागरी मूल्य, सार्वत्रिक हित यांची चिकित्सा करत असते. समाजाची नैतिक मूल्याधिष्ठित व्यवहाराची चिकित्सा करणारी ही एक मोजपट्टी आहे, असे मानले जाते. कोणताही समाज त्या त्या सामाजिक व्यवस्थेची काही मूलभूत श्रद्धा, मूल्ये इतिहासाच्या प्रत्येक टप्प्यावर विकसित करत असतो. विविध सामाजिक स्तर ही श्रद्धा, मूल्ये व्यापक पातळीवर आपल्याला सोयीची जाईल अशा पद्धतीने उभी करून, त्या दृष्टीने विवेकशील समाजभान जनमानसात स्वयंसिद्ध करण्यास मदत करतात. कधी कधी सदोष मानवी वर्तन ही श्रद्धा, मूल्ये प्रश्नांकित करतात. आज मानवी व्यवहारांतील ‘न्याय्य तत्त्वांच्या’ निष्ठेबद्दल संशयग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे.

भारतीय समाजव्यवस्था सांस्कृतिकदृष्ट्या एकजिनसी नाही. अनेक धार्मिक, वांशिक व भाषिक गटांचे अस्तित्व येथे आहे. त्याचबरोबर, आर्थिक क्षमतेच्या निकषावरही मोठ्या प्रमाणात विषमता सापडते. अशा बहुलवादी समाजरचना असलेल्या देशात जेव्हा मोठ्या प्रमाणात करोनाची लागण होते, तेव्हा त्या समाजाचे टीकात्मक परीक्षण ‘सार्वजनिक विवेकाच्या’ माध्यमातून होणे आवश्यक बनते. सार्वजनिक विवेकाचे तत्त्व सार्वत्रिक श्रद्धा, मूल्ये व नैतिक जीवनदृष्टीबरोबर, इतरांच्या नागरी हक्कांप्रती आदर भावना व्यक्त करत असते. प्रस्थापित व्यवस्थेतील अपूर्णता सांगताना फक्त दोष दिग्दर्शन न करता, नागरी आयुष्यात बंधुभाव कसा उतरेल, यावर भर देत असते.

करोनाच्या कठीण प्रसंगात एकमेकांविषयी संशय व अनादराची भावना समान जीवनात प्रकर्षाने दिसल्यामुळे ‘सार्वजनिक विवेकाचा’ लवलेशही शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये दिसला नाही. कठीण काळामध्ये मनुष्य एकमेकांना कशा पद्धतीने मदत करतो, या गुणाच्या आधारावर त्या समाजाच्या परहितलक्ष्यी व्यवहाराबरोबर, मनुष्यकेंद्री क्षमाशील दयाबुद्धी विकास पावते; कारण ती स्वहितलक्ष्यी नाही, तर परहितलक्ष्यी करुणार्द्र असते. अशा वैशिष्ट्यांमुळे सार्वजनिक हित हे समूहलक्ष्यी बनते. समूहलक्ष्यी असल्यामुळे ती करुणामय असते. आत्मनिष्ठ दुबळ्या मनाचा स्वार्थी भाव त्यात नसतो. सार्वजनिक विवेकाचे यशापयश त्या त्या समाजातील नागरिकांच्या परहितकेंद्री स्वभावातून प्रदर्शित होत असते. कठीण प्रसंगात असलेल्या समाजबांधवांना सर्व प्रकारचे मदतकार्य करणे, हा विवेकाचा भाग आहे.

आरोग्य, पोलिस व स्थानिक प्रशासनाचे कर्मचारी दिवस-रात्र करोनाशी झुंज देत, रुग्णांना बरे करण्यासाठी मेहनत घेत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून मात्र या करोनायोद्ध्यांना भेदभाव व सामाजिक बहिष्काराला सामोरे जावे लागले आहे. या संदर्भात एका पोलिस कर्मचाऱ्याची कहाणी खूप बोलकी आहे. धारावीमध्ये काम करणाऱ्या व कल्याणमध्ये राहणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याला, त्याच्याच घरामध्ये काही दिवसांपूर्वी सोसायटीमधील पदाधिकारी व रहिवाशांनी प्रवेश नाकारला. त्यांच्या मोटारीचीदेखील मोडतोड केली.

नाशिक स्थित एका डॉक्टरला लक्षणेविरहित करोना झाल्यावर, वैद्यकीय सल्ल्याप्रमाणे त्यांना रुग्णालयापेक्षा घरीच विलगीकरणाचा सल्ला देण्यात आला. सोसायटीमध्ये आल्यावर, त्यांना इतर रहिवाशांनी त्यांच्याच सदनिकेत प्रवेशाला मज्जाव केला. परिणामी डॉक्टरांना आपल्या रुग्णालयातील स्टोअररूममध्ये राहावे लागले. त्यांच्या अमेरिकेतील मुलाला शेवटी पोलिसांत तक्रार दाखल करावी लागली. ही कृती सामाजिक बहिष्कार दर्शविते. करोनाबाधित रुग्णांवरील सामाजिक बहिष्कारासारख्या वाढत्या घटनांमुळे, पोलिसांना अनेक हाउसिंग सोसायट्यांना कायदेशीर नोटिसा पाठवाव्या लागल्या आहेत. एका बाजूला सार्वजनिक विवेकच्या ऱ्हासाने भारतीय समाजात परात्मता आणि तुटकपणा आला असताना, दुसऱ्या बाजूला आरोग्य समस्येचे निराकरण करण्यासाठी, कायदा व सुव्यवस्थेच्या उपाययोजना करण्यावर राज्यसंस्थेने भर दिला आहे. लॉकडाउनची अंमलबजावणी करण्यासाठी पोलिस यंत्रणा कार्यरत आहे, म्हणजे आज करोना ही आरोग्य विषयक समस्या नसून, ती एक कायदा सुव्यवस्थेचा भाग असल्याची परिस्थिती आहे. सामाजिक स्थैर्य विस्कळीत करणाऱ्या अशा परिस्थितीत सामाजिक अंतर किंवा ‘फिजिकल डिस्टन्सिंग’ची संस्कृती शारीरिक अंतराऐवजी जाती जातीमध्ये व वर्गावर्गामध्ये कायमचे ‘सोशल डिस्टन्सिंग’ रुजवेल, अशी भीती अभ्यासक व्यक्त करत आहेत. ही भीती खरी व्हायची नसेल, तर करोना आपल्या नात्यांवर आणि सामाजिक संबंधांवर स्वार होता कामा नये.

(लेखक कीर्ती कॉलेजमध्ये सहयोगी प्राध्यापक आहेत.)Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

mohan delkar suicide case: ‘डेलकरांना मरण यातना देणारे अजून मोकाट कसे?’ – nana patole criticized bjp over mohan delkar suicide case

हायलाइट्स:नाना पटोले यांचा भाजपवर हल्लाबोलमोदी सरकारनं GDPची वाढ केली, असा टोलाही लगावला आहेमोहन डेलकर यांच्या आत्महत्या प्रकरणीही पटोले यांनी मागणी केली आहे. मुंबईः...

Jasprit Bumrah: इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघात नसणार हा मुख्य खेळाडू – ind vs eng pacer jasprit bumrah expected to miss odi series against...

हायलाइट्स:भारतीय संघ इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेनंतर वनडे मालिका खेळणार आहेटी-२० मालिकेसाठी जसप्रीत बुमराहला विश्रांती देण्यात आली आहेआता वनडे मालिकेसाठी देखील त्याला विश्रांती दिली जाण्याची...

मराठी सिनेसृष्टीचं नुकसान भरुन निघणार का? ८३ सिनेमे प्रदर्शनासाठी सज्ज – will the loss of marathi cinema be compensated? 83 movies ready for release

गेल्या वर्षभरात झालेलं नुकसान कसं भरुन काढायचं? हा प्रश्न सर्वच क्षेत्रातील व्यवसायांना पडला आहे. तसाच तो मराठी मनोरंजनसृष्टीला देखील पडला आहे. यापूर्वी सिनेसृष्टीचं...

एटीएम कार्डाची चोरी; मग दारूची खरेदी

म. टा. खास प्रतिनिधी, इंदिरानगरमधील महिला दुकानदाराचे लक्ष विचलित करीत त्यांच्या पर्समधील २० हजारांची रोकड आणि एटीएम कार्डवर डल्ला मारला. यानंतर तब्बल १७...

Recent Comments