Home देश Corona Symptoms in India: पाठदुखी, अतिसार आणि उलट्याही, करोनाची नवीन लक्षणं -...

Corona Symptoms in India: पाठदुखी, अतिसार आणि उलट्याही, करोनाची नवीन लक्षणं – Corona Symptoms Backache Nausea Rashes Could Be Covid Red Flags


नवी दिल्ली : अगोदर कोरडा खोकला, ताप इत्यादी करोनाची लक्षणं समजली जात होती. परंतु, त्यात यात तब्बल ११ लक्षणांचा समावेश करण्यात आलाय. उल्लेखनीय म्हणजे, पाठीचं दुखणं हेदेखील करोनाचं लक्षण असू शकतं, असंही समोर येतंय.

ताप, कोरडा खोकला, श्वासोच्छवासास अडथळा, थकवा, शरीरदुखी, डोकं दुखी, स्वाद किंवा गंधाची क्षमता नष्ट होणं आणि घश्यात त्रास अशी एकूण नऊ करोना संक्रमणाची लक्षणं जाहीर करण्यात आली होती. त्यात आता आणखीन तीन लक्षणंही जोडण्यात आली आहेत. अमेरिकन सेंटर फॉर डिसीज कंट्रोल (CDC) नं या तीन लक्षणांचा करोनाची लक्षणं म्हणून समावेश केलाय. यामध्ये वाहतं नाक, उलटी आणि अतिसार यांचा समावेश आहे.

वाचा :कोरोनिलवर पतंजलीचा यू-टर्न; नोटिशीला दिले ‘हे’ उत्तर
वाचा :निष्काळजीपणा चिंतेचं कारण, काळजी घ्या : पंतप्रधान मोदी
वाचा :करोनावर लस कधी तयार होणार? PM मोदींनी घेतली महत्वाची बैठक
पाठदुखीही ठरू शकते धोकादायक

उल्लेखनीय म्हणजे, पाठीच्या दुखण्याची तक्रार घेऊन आलेले अनेक लोक टेस्टिंगमध्ये करोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. जर तुमची कंबर दुखतेय, पोटात दुखतंय किंवा पायाच्या पोटऱ्या दुखत असतील, तर ही करोनाची लक्षणंही असू शकतात, असं मुंबईच्या सीनियर डॉक्टर जलील पारकर यांचं म्हणणं आहे. गेल्या काही दिवसांपासून करोनाच्या रुग्णावर उपचार करत आहेत. त्यांनी आत्तापर्यंत जवळपास २०० रुग्णांवर उपचार केले आहेत. त्यानंतर त्या स्वत: करोना पॉझिटिव्ह आढळल्या. जलील यांच्या म्हणण्यानुसार, पाठीचं दुखणं हे त्यांच्यात आढळलेलं पहिलं लक्षणं होतं.

रक्तातील शर्करेचं प्रमाण अचानक वाढणं

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, सध्या त्यांना असेही काही रुग्ण आढळत आहेत ज्यांना अगोदर डायबेटीजचा त्रास नव्हता. परंतु, आता मात्र त्यांची शुगर लेव्हल अचानक ४०० चा टप्पा सहज पार करते. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, करोना रुग्णांमध्ये शुगर लेव्हल अचानक वाढत असल्याचं दिसून येतंय.

करोनाची आकडेवारी

दरम्यान, देशातील करोनाबाधित रुग्णांची संख्या ५ लाख ८५ हजार ४९३ वर पोहचलीय. यातील ३ लाख ४७ हजार ९७९ जण करोनामुक्त झालेत. तर अद्याप २ लाख २० हजार ११४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. करोना संक्रमणामुळे आत्तापर्यंत १७ हजार ४०० जणांनी आपले प्राण गमावलेत.

वाचा :गुड न्यूज! भारतात करोनावर पहिली लस तयार, जुलैपासून मानवी चाचणी वाचा :मोदींचे देशाला उद्देशून संबोधन, नागरिकांसाठी केली ‘ही’ मोठी घोषणा
वाचा :विवाहाच्या दुसऱ्या दिवशी वराचा मृत्यू, १११ जणांना करोना संक्रमणSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Devendra Fadnavis writes to CM Thackeray: Metro Carshed: मेट्रो कारशेड प्रश्नी फडणवीसांनी केले उद्धव ठाकरेंना सावध – opposition leader devendra fadnavis has written letter...

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईमेट्रो-३च्या कारशेडची जागा बदलण्यासाठीचा घाट आधीच घालण्यात आला असून, त्यासाठी अहवाल तयार करून नवीन समितीचा निव्वळ फार्स करण्यात येत...

Digilocker Service at Central Railway Station: रेल्वे प्रवाशांसाठी मध्य रेल्वे सुरू करणार ‘डिजीलॉकर’ – central railway has decided to start digilocker service in csmt...

म. टा. प्रतिनिधी, मुंबईछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससह लोकमान्य टिळक टर्मिनस आणि दादर रेल्वे स्थानकात डिजीलॉकर सुरू करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. 'प्रथम...

Recent Comments