नये, म्हणून बऱ्याच संघटना आपल्या खेळाडूंना धरी सुरक्षित राहण्याचे आवाहन करत आहेत. त्यानुसार खेळाडूही सरावाला न जाता आपल्या घरातच आहेत. पण दुसरीकडे खेळाडूंना करोना होऊनही स्पर्धा खेळवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
एका स्पर्धेतील तीन खेळाडूंना करोना झाल्याचे शुक्रवारी म्हटले गेले होते. त्यानंतर आता ही स्पर्धा होणार की नाही, याबाबत संभ्रमाचे वातावरण होते. आपण आज, सोमवारी ही स्पर्धा खेळवण्यात यावी, असी इच्छा व्यक्त करण्यात येत आहे. त्यासाठी सरकारला आता गाऱ्हाणे घातले जाणार असल्याचे म्हटले जात आहे.
एका संघातील दोन खेळाडूंसह एका फिजिओला करोनाची बाधा झाली झाली होती. ही बाब गंभीर स्वरुपाची आहे. पण तरीही ही स्पर्धा खेळवण्याचा घाट घातला जात असून त्याला समर्थनही मिळत आहे. ही स्पर्धा खेळवायची की नाही, यावर अखेर बुधवारी निर्णय होणार आहे.
bundesliga
नेमके प्रकरण काय…
जर्मनीतील बुंदेसलीगा ही फुटबॉची एक लीग आहे. या लीगमधील कोलोन संघातील निकोलस हॉप्टमॅन आणि इस्माइल जेकब्स यांना करोनाची बाधा झाली होती. त्याचबरोबर या संघाच्या फिजिओलाही करोना झाला होता. त्यामुळे शुक्रवारी या लीगला मोठा झटका बसला होता. पण या संघातील अन्य खेळाडूंचे अहवाल आलेले आहेत. या संघातील अन्य खेळाडूंना करोनाची बाधा झालेली नसल्याचे समोर आले असून आता ही स्पर्धा खेळवण्याचे प्रयत्न सुरु झाले आहेत. यासाठी जर्मनीच्या पंतप्रधानांची परवानगी घेण्यात येणार आहे. या या लीगमधील तीन खेळाडूंना जरी करोना झाला असला तरी ही स्पर्धा खेळवण्यात यावी, याचे समर्थन जर्मनीच्या क्रीडा मंत्र्यांनीही केले आहे. आता पंतप्रधानांच्या होकारासाठी सर्व जण थांबलेले आहेत. पंतप्रधानांचा होकार आल्यावर ही लीग सुरु करण्यात येणार आहे. या लीगबाबतचा निर्णय बुधवारी येणे अपेक्षित आहे, असे म्हटले जात आहे.