Home क्रीडा Corona virus: धक्कादायक! करोनाबाबत चीनने लपवली ही मोठी गोष्ट... - china hiding...

Corona virus: धक्कादायक! करोनाबाबत चीनने लपवली ही मोठी गोष्ट… – china hiding big things related to corona virus. corona virus starts spreading in china from month of october not november


सध्याच्या घडीला एक धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. करोना व्हायरसचा प्रसार हा चीनमधून झाला. पण करोना व्हायरसबाबत चीनने एक मोठी गोष्ट लपवली आहे. हा धक्कादायक प्रकार आता समोर आला आहे.

करोना व्हायरस चीनमधून जगभरात पसरला. सध्याच्या घडीला जगभरात चिंतेचे वातावरण आहे. संपूर्ण जग या करोना व्हायरसमुळे ठप्पा झालेले आहे. त्याचबरोबर या करोना व्हायरसमुळे बऱ्याच लोकांचे बळीही गेलेले आहेत. त्यामुळे या वातावरणातून बाहेर कसे पडायचे, याचा विचार आता केला जात आहे. पण अजूनही करोनावर कोणतेही औषध सापडलेले नाही त्यामुळे सध्याच्या घडीला तरी यामधून पूर्णपणे बाहेर येऊ शकत नाही, असे म्हटले जात आहे.

वाचा-करोनाशी तब्बल महिनाभर लढला, पण अखेर अपयशी ठरला

नोव्हेंबर महिन्यात करोना व्हायरस पसरायला सुरुवात झाली आणि त्यानंतर लॉकडाऊन करण्यात आले, असे चीनने यापूर्वी म्हटले आहे. पण चीन जगाशी खोटं बोलत आहे. कारण याबाबतची पुरावा आता समोर आला आहे. चीनमध्ये करोना व्हायरस हा नोव्हेंबर नाही तर ऑक्टोबर महिन्यामध्येच पसरलेला होता आणि ही धक्कादायक गोष्ट आता सर्वांपुढे आली आहे.

चीनमध्ये ऑक्टोबर महिन्यात मिलिटरी स्पर्धा भरवण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत १०० देशांतील जवळपास १० हजार खेळाडू सहभागी झाले होते. त्यावेळी या स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंनाही करोना झाल्याचे निष्पन्न झाले होते. याचा अर्थ हा करोना व्हायरस त्यापूर्वीपासून चीनमध्येच होता आणि त्यानंतर तो ऑक्टोबरमध्ये सर्वत्र पसरला.

वाचा-तबलिगी जमातशी आहे शाहिद आफ्रिदीचे ‘हे’ कनेक्शन

याबाबत इटलीची खेळाडू मॅटेओ तॅलिओरियोलने याबाबत म्हटले आहे की, ” ऑक्टोबरमध्ये स्पर्धेसाठी मी चीनमध्ये गेली होती. तेव्हा मला जबरदस्त ताप आला होता, असा ताप मला आयुष्यात कधीही आलेला नव्हता. त्यावेळी मला करोना झाल्याचे निष्पन्न झाले होते. करोनामधून बाहेर येण्यासाठी मला तीन आठवे उपचार घ्यावे लागले. माझ्याबरोबरच मुलाल आणि नवऱ्यालासुद्दा करोना झाला होता. त्यांच्यावरही उपचार करण्यात आले. त्यानंतर काही दिवसांत करोना जगभरात पसरल्याचे पाहायला मिळाले.”

वाचा- ‘भीक मागून जगणाऱ्या पाकिस्तानने काश्मीरबद्दल बोलूच नये’
ऑलिव्हर जॉर्ज या खेळाडूने सांगितले की, ” ऑक्टोबर महिन्यात आम्ही जेव्हा चीनमध्ये गेलो होतो, त्यावेळी त्यांच्याकडे लॉकडाऊन सुरु होते. चीनमधील रस्त्यांवर शुकशुकाट दिसत होता. भर दिवसा आम्हाला रस्ते सुने वाटत होते. आम्ही नक्कीच चीनमध्येच आहोत ना, यावर आम्हाला विश्वात बसत नव्हता.”Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

'सुपर संभाजीनगर'च्या परवानगीची चौकशी

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या माध्यमातून शहरात '' चे डिस्प्ले लावण्याची परवानगी देण्यात आली आहे का याची चौकशी केली जाईल,...

virat kohli: IND vs ENG : विराट कोहलीला मिळाले जीवदान, पाहा कोणी सोडला सोपा झेल… – ind vs eng : indian captain virat kohli’s...

अहमदाबाद, IND vs ENG : भारताचा कर्णधार विराट कोहलीला पहिल्याच दिवशीच जीवदान मिळाल्याचे पाहायला मिळाले. विराटचा सोपा झेल यावेळी इंग्लंडच्या खेळाडूने सोडल्याचे पाहायला...

प्रियांका चोप्रा: पलटवार असावा तर असा! लोकांनी उडवली ड्रेसची थट्टा, पाहा प्रियांका चोप्राचं उत्तर – priyanka chopra tweet her viral memes on her dress...

हायलाइट्स:प्रियांका चोप्रा आणि फॅशन याजणू एकाच नाण्याच्या दोन बाजूप्रियांकाच्या ड्रेसवर व्हायरल होत आहेत मीम्सस्वतः प्रियांकानेही घेतला या मीम्सचा आनंदमुंबई- प्रियांका चोप्राचा हात फॅशन...

kapil sibal congress leader: ‘उत्तर-दक्षिण’ वक्तव्यावरून राहुल गांधी वादात; कपिल सिब्बलांनी दिला सल्ला, म्हणाले… – congress leader kapil sibal speaks on rahul gandhis statement...

नवी दिल्लीः कॉंग्रेस नेते राहुल गांधी ( rahul gandhi ) यांनी उत्तर व दक्षिण भारतातील राजकारणावर केलेल्या वक्तव्यावरून आता त्यांना आपल्याच पक्षाचे ज्येष्ठ...

Recent Comments