Home देश पैसा पैसा corona will impact two years: करोनाची पिडा दोन वर्षे; भारतासह जागतिक अर्थव्यवस्थेचे...

corona will impact two years: करोनाची पिडा दोन वर्षे; भारतासह जागतिक अर्थव्यवस्थेचे नुकसान – corona impact will cost world economy almost 12.5 trillion dollars


वृत्तसंस्था, नवी दिल्ली : कोविड-१९मुळे निर्माण झालेल्या बिकट आर्थिक परिस्थितीमुळे आगामी दोन वर्षात देशाच्या अर्थव्यवस्थेचे अंदाजे ३१.५ लाख कोटी रुपयांचे नुकसान होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. स्टेट बँकेच्या प्रकाशित करण्यात आलेल्या ‘इकोरॅप’ अहवालात ही बाब नमूद करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या अहवालात ‘२०२०मध्ये मोठी मंदी आणि २०२१मध्ये त्यामध्ये थोडी सुधारणा’ या अंदाजावरच स्टेट बँकेचा अहवाल बेतला आहे.

दरवाढ सुरूच ; जाणून घ्या आजचा पेट्रोल-डिझेलचा भाव
जागतिक उत्पादनात घट
स्टेट बँकेच्या इकोरॅप अहवालात नमूद केल्याप्रमाणे २०२०मध्ये जागतिक उत्पादनात ४.९ टक्के घट होण्याचाही अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र, तात्पुरती सुधारणा होऊन २०२१मध्ये जागतिक उत्पादनात ५.४ टक्क्यांची वाढ होईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. अहवालात नमूद केल्याप्रमाणे आगामी दोन वर्षे करोनाचा प्रभाव राहण्याची शक्यता असून, जागतिक अर्थव्यवस्थेचे १२.५ ट्रिलियन डॉलरचे नुकसान होण्याची शक्यता आहे. जागतिक अर्थव्यवस्थेत भारताचे योगदान ३.५ टक्के आहे. त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेचे ३१.५ लाख कोटी रुपयांचे (४३८ अब्ज डॉलर) नुकसान होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

अर्थव्यवस्थेत ४.५ टक्के घसरण?
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने बुधवारी देशाच्या अर्थव्यवस्थेत साडेचार टक्क्यांच्या घसरणीचा अंदाज वर्तवला आहे. कोविड-१९ मुळे ऐतिहासिक घसरण होण्याचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र, पुढील वर्षी अर्थव्यवस्था काही प्रमाणात का होईना पूर्वपदावर येण्याचा अंदाज वर्तवला आहे. २०२१मध्ये विकास दर सहा टक्के राहण्याचा अंदाज आहे. नाणेनिधीने २०२०मध्ये जागतिक विकास दर उणे ४.९ टक्के राहणार असल्याचेही म्हटले आहे.

चीनचा माल बंदरावरच अडकला; अमेरिकन कंपन्याही धास्तावल्या
जीडीपी ६.८ टक्क्यांनी घसरणार?
स्टेट बँकेतर्फे यापूर्वी जारी करण्यात आलेल्या इकोरॅप अहवालामध्ये आर्थिक वर्ष २०२१मध्ये देशाच्या जीडीपी दरात ६.८ टक्क्यांची घसरण होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला होता. अहवालात नमूद केल्यानुसार अनुकूल बेस इफेक्टमुळे आर्थिक वर्ष २०२२मध्ये देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये सुधारणा होण्याची शक्यता आहे. मात्र, हा इफेक्ट यशस्वी न ठरल्यास देशाची अर्थव्यवस्था पूर्वपदावर येण्यासाठी चार वर्षांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.

दरडोई उत्पन्नातही घसरण
इकोरॅपच्या अहवालानुसार कोव्हिड १९ संकटामुळे भारतातील प्रति व्यक्ती उत्पन्नातही (दरडोई) घसरण होण्याची शक्यता आहे. अहवालानुसार आर्थिक वर्ष २०२१मध्ये दरडोई उत्पन्नात ५.४ टक्क्यांची घसरण होण्याची शक्यता आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

tb hospital mumbai: रुग्णालयात शौचालयात रुग्णाचा कुजलेला मृतदेह – 27 years tb patient body was found in toilet in a tb hospital mumbai

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबईशिवडीच्या टीबी रुग्णालयातील शौचालयात रविवारी रुग्णाचा कुजलेला मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. रुग्णाचा मृत्यू कोणत्या कारणाने झाला, तसेच मृतदेह...

land acquisition cases: भूसंपादन प्रकरणांची चौकशी करण्याची मागणी – mns corporater salim shaikh demand for inquiry into land acquisition cases

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक महापालिकेच्या स्थायी समितीने प्राधान्यक्रम ठरवून मंजूर केलेल्या भूसंपादन प्रकरणांवर मनसेचे नगरसेवक सलिम शेख यांनी आक्षेप घेतला आहे. पहिल्या...

Recent Comments