वॉशिंग्टन: जगभरात करोनाचे थैमान सुरू असून संसर्गामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या एक लाख ६० हजारांहून अधिक झाली आहे. अमोरिकेमध्ये करोनाने थैमान घातले असून मृतांची संख्या वाढत आहे. अमेरिकेत करोनाच्या संसर्गाने ४० हजारांचा मृत्यू झाला आहे. तर, बाधितांची संख्या ७ लाख ५० हजारांहून अधिक झाली आहे. जाणून घ्या करोनाबाबतच्या इतर महत्त्वाच्या जागतिक अपडेट्स
>> करोना अपडेट्स
> अमेरिकेत सात लाख ५० हजारांहून अधिकजणांना करोनाची बाधा
> स्पेनमध्ये करोनाबाधितांची संख्या दोन लाखांजवळ
> स्पेनमध्ये मृत्यूचे थैमान, करोनाने घेतले २० हजार बळी
> इटलीक करोनाचा कहर, एक लाख ७८ हजारजणांना बाधा
> इटलीत करोनाने घेतले २३ हजार बळी
> ब्रिटनमध्ये एक लाख २० हजारजणांना करोनाची बाधा
> इराणमध्ये करोनाबाधितांची संख्या ८० हजारांहून अधिक, पाच हजारजणांचा मृत्यू
> रशियात ४२ हजारांहून अधिकजणांना करोनाचा संसर्ग, ३६१ जणांचा मृत्यू