Home महाराष्ट्र coronavirus: आज ३ हजार ६६१ रुग्णांनी जिंकली करोनाची लढाई; राज्यात रुग्ण बरे...

coronavirus: आज ३ हजार ६६१ रुग्णांनी जिंकली करोनाची लढाई; राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले – 3661 coronavirus patient recovered today in maharashtra


मुंबईः राज्यात आता कोरोना व्हायरसपासून बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सलग दुसऱ्या दिवशी विक्रमी संख्येनं रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आज एकाच दिवशी विविध रुग्णालयांतून ३ हजार ६६१ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. मुंबई मंडळातील मुंबई मनपा, ठाणे, पालघर, रायगड या चार जिल्ह्यात सर्वाधिक २ हजार ८४४ रुग्णांना घरी सोडण्यात आलं. आतापर्यंत ७७ हजार ४५३ रुग्ण बरे झाले आहेत. अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

वाचाः मुंबईत रुग्णालयाबाहेरचे १००० करोनामृत्यू का दडवले?; फडणवीसांचा सवाल

राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर सुमारे ५२ टक्के एवढा असून राज्यात सध्या उपचार सुरू असलेल्या एकूण (ॲक्टीव्ह) रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे. आज सोडण्यात आलेल्या ३६६१ रुग्णांमध्ये मुंबई मंडळात २८४४ (आतापर्यंत एकूण ५४ हजार ५८१) तर त्यापाठोपाठ पुणे मंडळात ४०१ (आतापर्यंत एकूण ११ हजार ७००), नाशिक मंडळात १४२ (आतापर्यंत एकूण ३७९४), औरंगाबाद मंडळ ७७ (आतापर्यंत एकूण २६३९), कोल्हापूर मंडळ ३२ (आतापर्यंत एकूण १४१५), लातूर मंडळ ६८ (आतापर्यंत एकूण ६००), अकोला मंडळ ६८ (आतापर्यंत एकूण १५१६), नागपूर मंडळ २९ (आतापर्यंत एकूण १२०८) रुग्ण घरी सोडण्यात आले आहेत.

वाचाः आशा सेविकांच्या मानधनात वाढ; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

दरम्यान, संपूर्ण मुंबईतील रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी आणखी वाढून आता तब्बल ३९ दिवसांवर पोहोचला आहे. हा कालावधी ५० दिवसांवर नेण्याचे लक्ष्य पालिकेने ठेवले असून, त्यासाठी विविध प्रकारच्या उपाययोजना वाढवल्या आहेत. तसेच मुंबईचा रुग्णवाढीचा सरासरी दरही आणखी कमी होऊन आता १.८१ टक्के इतका झाला आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

येथे जाड सुईने 'टुचुक' केले जाईल…

एक मार्च हा दिवस काळाच्या दंडावर कायमस्वरूपी अन् करकचून टोचून ठेवला गेला आहे, याबाबत आमच्या मनात किंचितही शंका नाही. साक्षात पंतप्रधान नमोजींनी या...

Recent Comments