Home शहरं औरंगाबाद coronavirus: औरंगाबादमध्ये करोनाचा आणखी एक बळी; ९ नवे रुग्ण - coronavirus 55...

coronavirus: औरंगाबादमध्ये करोनाचा आणखी एक बळी; ९ नवे रुग्ण – coronavirus 55 year old covid 19 patient dies in aurangabad


औरंगाबाद: शहरातील बीड बाह्यवळण रस्त्यावरील देवळाई परिसरातील करोनाबाधित असलेल्या ५५ वर्षीय रुग्णाचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) रविवारी, रात्री ११ वाजताच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाला. आतापर्यंत १० करोनाबाधितांचा मृत्यू झाल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी दिली.

तीन दिवसांपासून रुग्णाला खोकला, चक्कर येण्याचा त्रास होत होता. अतिशय गंभीर स्थितीत त्यांना घाटीमध्ये दाखल करण्यात आले होते. ऑक्सिजनचे प्रमाण केवळ ५४ टक्के होते. अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांना दोन्ही फुफ्फुसांचा न्युमोनिया, मधुमेहाचा आजार होता, असेही डॉ. येळीकर यांनी सांगितले.

आज सकाळपर्यंत आणखी नऊ करोनाबाधित सापडल्यानं आता जिल्ह्यातील रुग्णांची संख्या २९१ झाली आहे. त्यात पंचशील दरवाजा, किलेअर्कमधील १, सावित्री नगर, चिकलठाणामध्ये १, देवळाईत १ , पुंडलिक नगर – २, नंदनवन कॉलनी – १ , जय भीमनगरमध्ये ३ रुग्ण आहेत, अशी माहितीही डॉ. येळीकर यांनी दिली.

LIVE: राज्यात १० हजाराहून अधिक रुग्णांवर उपचार सुरू

करोनारुग्णाशी डॉक्टरचे अश्लील चाळे

१२७ जवानांचे करोना चाचणी अहवाल निगेटिव्ह

मुंबईहून परतलेल्या जालना येथील राज्य राखीव दलाच्या १२७ जवानांचे करोना चाचणी अहवाल दुसऱ्यांदा नकारात्मक आले आहेत. त्यामुळं सोमवारी जालनावासियांना दिलासा मिळाला. मुंबईत बंदोबस्तासाठी जालना येथील राज्य राखीव दलाच्या तुकडीला पाचारण करण्यात आले होते.
या १२७ जवानांपैकी १० जवानांना जिल्हा सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करून घेण्यात आले होते, तर उर्वरित जवानांना पोलीस प्रशिक्षण केंद्रात विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. त्यांच्या पहिल्या तपासणीचा अहवाल नकारात्मक आला होता. तर दुसऱ्यांदा त्यांचे स्वॅबचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्याचा अहवाल रविवारी रात्री उशिरा प्राप्त झाला.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

खोट्या कारणांचा विनाकारण आधार…

: केलंय म्हणजे मूल जन्माला घालायलाच हवं, हा समज खोडून काढत गेल्या काही वर्षांमध्ये अनेक महिलांनी जाणीवपूर्वक मूल न होऊ देण्याचा...

water of sewage treatment plant: ‘एसटीपी’चे पाणी होणार आणखी शुद्ध – water of sewage treatment plant will be further purified by aurangabad municipal corporation

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादमहापालिकेकडून येत्या काळात सीवरेज ट्रीटमेंट प्लांटचे (एसटीपी) पाणी अधिक शुद्ध करण्याची प्रक्रिया केली जाणार आहे. या कामासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार...

konkan vidarbha gramin bank: बँक लुटण्यासाठी अर्ध्या रात्री खिडकीतून आत घुसले, अचानक सायरन वाजला अन्… – robber tried to rob vidarbha konkan gramin bank...

हायलाइट्स:विदर्भ कोकण ग्रामीण बँकेच्या शाखेत चोरीचा प्रयत्नभंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील घटनासंपूर्ण चोरीची घटना सीसीटीव्हीत कैदभंडारा: विदर्भ कोकण ग्रामीण बँकेच्या शाखेत चोरीचा प्रयत्न झाला....

Recent Comments