Home शहरं औरंगाबाद coronavirus: औरंगाबादेत करोनाची धास्ती वाढली; नवे २८ रुग्ण सापडले - coronavirus 28...

coronavirus: औरंगाबादेत करोनाची धास्ती वाढली; नवे २८ रुग्ण सापडले – coronavirus 28 new covid19 cases reported in aurangabad on sunday


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद: जिल्ह्यात नवे २८ करोनाबाधित आढळून आल्याने करोनाबाधितांची एकूण संख्या १२७६ झाली आहे. त्यामुळे औरंगाबादवासियांची चिंता आणखी वाढली आहे.

जिल्ह्यात नव्याने आढळलेल्या बाधितांमध्ये शहरातील न्याय नगर, गारखेडा येथील २, टाऊन हॉल १, सईदा कॉलनी, जटवाडा रोड ३, कैलास नगर ४, राम नगर, एन- २, सिडको ४, नारळीबाग १, गौतम नगर, जालना रोड १, संभाजी कॉलनी, सिडको १, महेश नगर १, जुना बाजार १, एमजीएम परिसर १, भवानी नगर, जुना मोंढा १, शंकुतला नगर, शहानूरवाडी १, औरंगपुरा २, आशियाद कॉलनी, बीड बायपास १, वडगाव कोल्हाटी २, अब्दाशहा नगर, सिल्लोड १ या भागातील रहिवाशांचा समावेश आहे. यामध्ये १३ महिला आणि १५ पुरूषांचा समावेश आहे.

उस्मानाबादमध्ये आणखी दोघांना करोना

उस्मानाबाद जिल्ह्यातील आणखी दोन जण करोनाबाधित असल्याचा अहवाल शनिवारी रात्री उशिरा प्राप्त झाला. त्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यातील करोनाबाधित रुग्णांची संख्या २९ वर पोहोचली आहे. शनिवारी पॉझिटिव्ह आलेल्या नवीन दोन रुग्णांमध्ये कोथळी (ता. उमरगा) येथे पुण्याहून परतलेला तरुण तर शिराढोण (ता. कळंब) येथील वृद्धेचा समावेश आहे.

Live: राज्यात कुठे-किती करोनाबाधित रुग्ण? वाचा!

शुक्रवारी रात्रीपर्यंत जिल्ह्यातील करोनाबाधितांचा आकडा २७ होता. यातील चार जण उपचार घेऊन घरी परतले आहेत. दरम्यान, शनिवारी तपासणीसाठी पाठविलेल्या ४१ रुग्णांच्या स्वॅबचे अहवाल प्राप्त व्हायचे होते. हे अहवाल शनिवारी रात्री प्राप्त झाले. यामध्ये कोथळी येथील तरुणासह शिराढोणच्या ७० वर्षीय वृद्धेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. उर्वरीत अहवालात ३६ जणांचे अहवाल निगेटिव्ह, २ अहवाल इनक्लुझिव्ह तर एक स्वॅब नाकारण्यात आल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजाभाऊ गलांडे यांनी सांगितले.

मुंबईत करोनाचा कहर! २४ तासांत ४० बळी, १५६६ नवे रुग्णSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

health workers in nashik: आरोग्य कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाचा टक्का वाढणार – nashik local health system has decided to increase corona vaccination for heath workers

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिकजिल्ह्यातील सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांचे कोविड प्रतिबंधक लसीकरण ११ फेब्रुवारीपूर्वी पूर्ण करवून घेण्याचे निर्देश आरोग्य सेवा संचालनालयाने दिले आहेत. त्यामुळे...

raksha khadse vs eknath khadse in raver: Raksha Khadse: एकनाथ खडसेंना आता सूनेचेच आव्हान; रक्षा खडसेंनी केला ‘हा’ निर्धार – raksha khadse challenges eknath...

जळगाव: माझ्या भूमिकेबाबत अनेकांच्या मनात शंका असली तरी कुठल्याही परिस्थितीत मी पक्ष सोडणार नाही व भाजपातच राहणार असल्याचे सांगत भाजप खासदार रक्षा खडसे...

Kaushal Inamdar: गाण्याचे लयतत्व हेच त्याचे प्राणतत्व – संगीतकार कौशल इनामदार – indian musical composer kaushal inamdar present various poems at marathi language conservation...

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादकवितेत म्हणण्यासारखे काही असावे. कधी कधी मुक्तछंदालाही आपली लय असते. ती लय संगीतकाराला सापडली तर गाणे होते. कुठल्याही गाण्याचे लयतत्व...

Recent Comments