Home शहरं औरंगाबाद coronavirus: औरंगाबादेत ५९ बाधितांची भर; रुग्णसंख्या हजाराच्या पार - aurangabad covid-19 tally...

coronavirus: औरंगाबादेत ५९ बाधितांची भर; रुग्णसंख्या हजाराच्या पार – aurangabad covid-19 tally crosses 1,000-mark


औरंगाबाद: औरंगाबादमध्ये आजही ५९ नवे रुग्ण सापडल्याने जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या १०२१ झाली आहे. औरंगाबादमध्ये करोनाच्या रुग्णांनी हजाराचा पल्ला गाठल्याने एकच खळबळ उडाली आहे. तसेच जिल्ह्यात आतापर्यंत ३१ करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, तर ३१२ करोनाबाधित करोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.

औरंगाबादमध्ये आज आढळलेल्या रुग्णांमध्ये पैठण गेट, सब्जी मंडी, किराडपुरा, सेव्हन हिल कॉलनी, एन-६ सिडको, बायजीपुरा, रोशन नगर, हनुमान नगर, संजय नगर, गल्ली नं. पाच, हिमायत बाग, एन-१३ ‍सिडको, सादाफ कॉलनी आणि बेगमपुरा येथे प्रत्येकी एक, पुंडलिकनगर आणि मदनी चौक येथे प्रत्येकी २, न्याय नगर, हिमायत बाग आणि जलाल कॉलनी येथे प्रत्येकी ३, बहादूरपुरा, बंजारा कॉलनी, गल्ली नं.दोन आणि हुसेन कॉलनी येथे प्रत्येकी ४, भवानी नगर ५, मकसूद कॉलनी ६, सिल्कमिल कॉलनी ८ आणि जुना मोंढा येथे ११ रुग्ण सापडले आहेत. यामध्ये २७ महिला व ३२ पुरुषांचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या १०२१ झाली आहे. तसेच आतापर्यंत ३१ करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, तर ३१२ करोनाबाधित हे करोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.

LIVE : देशात ९६,१६९ करोनाबाधित, ३०२९ मृत्यू

दरम्यान, आज जुना मोंढा, सिल्कमिल कॉलनी आणि मकसूद कॉलनीत मोठ्या प्रमाणावर रुग्ण सापडत असल्याने आरोग्य यंत्रणेची डोकेदुखी वाढली आहे. तसेच औरंगाबादमधील करोना रुग्णांचा आकडा हजाराच्या पुढे गेल्यानेही यंत्रणेसमोर आव्हान उभे ठाकले आहेत. नागरिक सोशल डिस्टन्सिंगचं पालन काटेकोरपणे करत नाहीत. शिवाय तोंडाला मास्क लावत नसल्याने रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

लॉकडाऊन ४.० मध्ये कोणत्या गोष्टींत मिळाली सूट, पाहा…



Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Anna Hazare: अण्णा हजारेंचं आंदोलन रोखण्यासाठी भाजपचे आटोकाट प्रयत्न; उचललं ‘हे’ पाऊल – bjp trying hard to stop anna hazare from agitation

अहमदनगर: ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आपण आंदोलनावर ठाम असल्याचे सांगितल्याने त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी आता भाजपने पुढचे पाऊल टाकले आहे. कोणत्याही परिस्थितीत अण्णांचे...

Anthony Stuart: गोलंदाजांमध्ये अशी कामगिरी करणारा जगातील एकमेव खेळाडू; पाहा व्हिडिओ – australian cricketer anthony stuart only bowler to take a hat trick in...

नवी दिल्ली: वनडे क्रिकेटच्या इतिहासात आतापर्यंत चार असे गोलंदाज झाले आहेत ज्यांनी पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक घेतली आहे. पण करिअरमधील अखेरच्या सामन्यात हॅटट्रिक घेण्याची...

bmc health officers: रात्रभर जागले पालिकेचे अधिकारी – bmc officers was facing stress due to not receiving the cowin app’s message regarding covid-19 vaccination...

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईकोवीन अॅपवर नोंदणी झालेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरणासंदर्भात मेसेज पाठवण्यात येणार होते. मात्र शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत अॅप आणि मेसेज न...

Recent Comments