Home शहरं अहमदनगर coronavirus: करोनाची साखळी तुटेना, नगरच्या दाटवस्तीत होतोय वेगानं फैलाव - 28 new...

coronavirus: करोनाची साखळी तुटेना, नगरच्या दाटवस्तीत होतोय वेगानं फैलाव – 28 new coronavirus patient found in aurangabad


म.टा.प्रतिनिधी, नगरः जिल्ह्यात आज एकाच दिवशी तब्बल २८ करोनाबाधित आढळले आहेत. यापैकी २२ रुग्ण हे तोफखाना, सिद्धार्थनगर व नालेगाव या दाटवस्तीच्या भागातीलच आहेत. त्यामुळे नगरच्या दाटवस्तीमध्ये आता करोनाचा वेगाने फैलाव सुरू झाल्याचे स्पष्ट झाले असून नगकरांच्या चिंतेत भर पडली आहे. दरम्यान, नगरच्या दाटवस्तीत सुरू झालेली करोनाची साखळी तोडण्याचे आव्हान प्रशासनासमोर उभे राहिले आहे.

करोना रुग्ण वाढीचा वेग वाढला असल्यामुळे तो नियंत्रित करण्यासाठी प्रशासनाकडून विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवल्या जात आहेत. मात्र, त्यानंतरही नगरमध्ये वेगाने करोनाचा फैलाव सुरू झाली असून करोना रुग्ण वाढीची साखळी तूटत नसल्याचे चित्र आहे.

वाचाः रोहित पवारांमुळे जळगावातील प्रस्तावित पोलीस प्रशिक्षण केंद्र जामखडला

नगरमध्ये आज पुन्हा तोफखाना परिसरात १२, सिद्धार्थनगर परिसरात ६ व नालेगाव भागात ४ व सिव्हिल हडको भागात २ करोनाबाधित आढळले आहेत. यापूर्वीच तोफखाना, सिद्धार्थनगर व नालेगाव हा भाग प्रशासनाने हॉटस्पॉट म्हणून घोषित केला आहे. तेथील अत्यावश्यक सेवेची दुकानेही बंद करण्यात आली आहेत. याभागात महापालिकेच्या मार्फत अत्यावश्यक सेवा दिल्या जात आहेत. मात्र, त्यानंतरही येथील रुग्ण वाढीचा वेग हा कमी झाला नसून उलट वाढतच आहे. त्यामुळे येथील करोनाची साखळी तोडण्याचे आव्हान प्रशासनासमोर उभे राहिले आहे.

वाचाः प्रवाशांच्या खिशाला कात्री; मुंबईत रिक्षा-टॅक्सी भाडेवाढीची शक्यता

दरम्यान, जिल्ह्यात आज सापडलेल्या २८ करोनाबाधितांमध्ये नगरचे २४ बाधित आहेत. तर, उर्वरीत ४ बाधितांमध्ये शिर्डी येथील एक, जामखेड तालुक्यातील जवळा येथील एक, कर्जत येथील दोन जणांचा समावेश आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

aurangabad News : ‘स्मार्ट सिटी’साठी आणखी दीडशे कोटी – rs 150 crore more for ‘smart city’

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादऔरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनसाठी केंद्र आणि राज्य शासनाने मिळून आणखीन १५० कोटींचा निधी मंजूर केला आहे. शासनाने दिलेल्या निधीच्या...

Pimpri Chinchwad: Pimpri chinchwad: बहिणीने प्रेमविवाह केला; चिडलेल्या भावानं तलवारी नाचवल्या, वाहनांची तोडफोड – pimpri chinchwad man vandalised vehicles after his sister love marriage

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी: बहिणीने प्रेमविवाह केला म्हणून अल्पवयीन भावाने १२ वाहनांची तोडफोड केली. तसेच हातात कोयता घेऊन परिसरात साथीदारांच्या मदतीने दहशत निर्माण...

Recent Comments