Home महाराष्ट्र coronavirus: गणेशोत्सव होणारच, पण साधेपणाने! सार्वजनिक गणेशोत्सव समितीचा निर्णय - sarvajanik ganesh...

coronavirus: गणेशोत्सव होणारच, पण साधेपणाने! सार्वजनिक गणेशोत्सव समितीचा निर्णय – sarvajanik ganesh utsav committee decides ganeshotsav is going to happen but in simply way


म. टा. प्रतिनिधी, मुंबई

करोनामुळे आगामी गणेशोत्सवावर अनिश्चिततेचे सावट असले,तरी उत्सव होणारच याबाबत बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती ठाम आहे. मात्र,अनेक वर्षांपूर्वी राज्यात सर्वत्र प्लेगची साथ असताना,लोकांनी अक्षरशः घरातील गणरायाच्या छोट्या मूर्ती, फोटो पुजल्याच्या आठवणींना उजळा देत मुंबईकरांनी विशेषतः सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनीदेखील यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याबाबत मानसिक तयारी करावी,असे आवाहन बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष नरेश दहिबावकर यांनी केले आहे. या आवाहनाला अनेक मोठ्या मंडळांनीदेखील सहमती दर्शवली आहे.

मुंबईतील परिस्थिती सध्या दिवसेंदिवस बिकट होत असून,तिचा समावेश रेड झोनमध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईतील संचारबंदी कधी शिथिल होईल,याबाबत गणेशोत्सव मंडळांमध्ये चलबिचल सुरू आहे. मुंबईच्या गणेशोत्सवाची चर्चा जगभर होते हे सर्वश्रुत आहे. प्लेगची साथवगळता गणेशोत्सव काळात अनेक नैसर्गिक आपत्ती आल्या. मात्र, मुंबईचा गणेशोत्सव नेहमीच थाटामाटात साजरा झालेला पाहायला मिळाला आहे. मात्र, यंदा करोनाने जगभर घातलेला धुमाकूळ पाहता, एकूणच मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सवावर अनिश्चिततेचे सावट आहे. अनेक नामांकित मंडळांनी ‘वेट अँड वॉच’ची भूमिका घेतली असली, तरी अनेक छोट्या मंडळांकडून, काही अतिउत्साही कार्यकर्त्यांकडून मूर्तीबाबत विचारणा केली जात असल्याचे मूर्तिकारांनी सांगितले. मात्र, शहरात संचारबंदी लागू असल्यामुळे मूर्तिकारांच्या कार्यशाळांतील लगबग देखील सध्या शांत आहे.

गणेशोत्सवाच्या आयोजनाबाबत बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीकडे वारंवार विचारणा होत असून, समितीस्तरावर मोठ्या प्रमाणात खलबते सुरू आहेत. या चर्चांअंती, ‘मुंबईवर ओढवलेले संकट पाहता यंदाचा गणेशोत्सव अगदी साधेपणाने साजरा करण्याबाबत आम्ही सकारात्मक आहोत. गणेशोत्सव हा गर्दीचा सण असून, गर्दीमुळे करोनाचा संसर्ग लक्षात घेत भाविकांसह, कार्यकर्त्यांचे जीव धोक्यात घालणे योग्य नाही. यापूर्वीदेखील मुंबईतील गणेशोत्सवाने अनेक कठीण प्रसंगांमध्ये सामाजिक भान जपले आहे. गतवर्षीची अतिवृष्टी असो वा २६ जुलैचा महापूर, मुंबईतील गणेशोत्सव मंडळांनी नेहमीच यंत्रणांच्या खांद्याला खांदा लावून काम केले आहे. यंदाही ही परंपरा मंडळांनी कायम राखली आहे. मागील काही दिवसांत पालिका, पोलिस यंत्रणेवर अधिक ताण आहे. अशावेळी ऐन गणेशोत्सवात याच सामाजिक जाणिवेतून गर्दी टाळण्याचे आवाहन आम्ही करणार आहोत,’ असे समितीचे अध्यक्ष अॅड. नरेश दहिबावकर यांनी सांगितले. तसेच परिस्थिती सुधारल्यास, शासनाच्या मान्यतेनेसर्व नियमांचे पालन करीत निश्चितच सण थाटामाटात साजरा करू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Aditya Roy Kapur: एका कॉलवर आदित्य रॉय कपूरच्या मदतीला धावून आले रामदास आणि सत्यजित पाध्ये – Aditya Roy Kapur Becomes Bollywoods First Actor Get...

मुंबई- अनुराग बसू यांनी दिग्दर्शित केलेला 'लुडो' हा चित्रपट एका ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. अभिनेता आदित्य रॉय-कपूरनं या चित्रपटात एका शब्दभ्रमकाराची भूमिका...

सटाण्यातील व्यावसायिक माखिजा यांची आत्महत्या

म. टा. वृत्तसेवा, सटाणा सटाणा शहरातील बागलाण ब्रॅण्डी हाऊसचे संचालक (वय ६२) यांनी रविवारी सायंकाळी लोहणेर येथील पुलावरून गिरणा नदीपात्रात उडी मारून ...

व्यापारी सासूरवाडीला गेला होता, फ्लॅटवर परतल्यानंतर दृश्य बघून हादरलाच

म. टा. प्रतिनिधी, : सासूरवाडीला गेलेल्या कापड व्यवसायिकाचे घर फोडून चोराने दोन लाखांची रोकड आणि दोन तोळ्याचे दागिने लांबविल्याची घटना सोमवारी (२३ नोव्हेंबर)...

Recent Comments