Home महाराष्ट्र coronavirus: ग्रीन झोन ठरलेल्या सिंधुदुर्गात करोनाबाधितांची संख्या २१६वर - 216 corona positive...

coronavirus: ग्रीन झोन ठरलेल्या सिंधुदुर्गात करोनाबाधितांची संख्या २१६वर – 216 corona positive patient found in sindhudurg


सिंधुदुर्गः जिल्ह्यात करोना आटोक्यात येत असतानाच गेल्या आठवड्यापासून करोना रुग्णांची संख्या वाढत आहे. जिल्ह्यात आणखी एका करोना बाधीत रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत जिल्ह्यात मृत्यू झालेल्या कोरोना बाधीत रुग्णांची संख्या पाच झाली आहे. आज मयत झालेला रुग्ण हा कणकवली येथील आहे. ६० वर्षीय रुग्णास श्वास घेण्यास अडचण येत होती. त्यामुळं त्यांना इनव्हेजीव व्हेन्टीलेटरवर ठेवण्यात आले होते. १५ जून रोजी सदर रुग्ण मुंबई येथून आला होता. तर दिनांक २४ जून रोजी त्याचा स्वॅबचा अहवाल पॉजिटीव्हआला होता. सद्यस्थितीत जिह्यात करोनाच्या ५४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आणखी दोन रुग्णांना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण १५४ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील एकूण २१४ व्यक्तींचे करोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले असल्याची माहिती जिल्हातील शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर यांनी दिली आहे. (coronavirus in sindhudurg)

वाचाः राज्यात करोनामृत्यूंचा नवा उच्चांक; आज २४५ करोनाबळी, ४८७८ नवे रुग्ण

दरम्यान, राज्यात करोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारी पातळीवर आटोकाट प्रयत्न सुरू आहेत. मात्र, आज राज्यात करोनामृत्यूंच्या संख्येनं नवा उच्चांक गाठला आहे. आज दिवसभरात २४५ करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. तर, ४ हजार ८७८ नवे करोनारुग्ण वाढले आहेत. आज राज्यात २४५ जणांचा करोनामुळं मृत्यू झाला आहे. या पैकी ९५ मृत्यू मागील ४८ तासांमधील आहेत तर, उर्वरित १५० मृत्यू मागील कालाधीत आहेत. राज्यातील मृत्यूदर सध्या ४. ४९ इतका आहे. आज राज्यात ४८७८ नव्या करोना रुग्णांच निदान झालं असून एकूण रुग्णसंख्या १ लाख ७४ हजार ७६१ झाली आहे.

वाचाः ठाण्यात २ ते १२ जुलैपर्यंत कडेकोट लॉकडाऊन; ‘हे’ आहेत नवे नियम

पाठविण्यात आलेले एकूण नमुने- ३, ८२४
अहवाल प्राप्त झालेले नमुने- ३,६६३
आतापर्यंत पॉजिटीव्ह आलेले नमुने- २१४
निगेटीव्ह आलेले नमुने- ३,४४९
अहवाल प्राप्त झालेले नमुने- १६१
सध्यस्थितीत जिल्ह्यातील सक्रिय रुग्ण- ५४
इतर जिल्हे व इतर राज्यातील रुग्ण- १
(मुंबई) मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या- ५
डिसचार्ज देण्यात आलेले रुग्ण- १५४

आज तपासणी करण्यात आलेल्या व्यक्ती- ४, ४२५
१२ संस्थात्मक अलगीकरणातील एकूण व्यक्ती- १७, २५०
अ शासकीय संस्थांमधील अलगीकरणातील व्यक्ती- ५६
ब गाव पातळीवरील संस्थात्मक अलगीकरणातील व्यक्ती- १४, ८४६Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

sujay vikhe patil: ‘मी भाजपमध्ये नवीन आहे; खडसेंबद्दल काय बोलणार?’ – how can i comment on eknath khadse, says bjp mp sujay vikhe patil

अहमदनगर: 'भारतीय जनता पक्षात मी नवीन आहे. मला एकच वर्ष झालं आहे. त्यामुळं ४० वर्षे पक्षात असलेल्या व्यक्तीवर मी टीकाटिप्पणी काय करणार,' अशी...

Recent Comments