धांदरफळ (ता. संगमनेर) येथे ८ मे रोजी करोनाबाधित रुग्ण सापडले होते. त्यानंतर त्यांना उपचारासाठी बूथ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मागील दहा दिवसांत त्यांच्यावर योग्य ते उपचार करण्यात आले. या व्यक्तींमध्ये आता आजाराची कोणतीही लक्षणे दिसून येत नसल्याने केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आरोग्य तपासणी करून त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आला. आता या सर्वांना पुढील दहा दिवस संगमनेर येथे संस्थात्मक विलगीकरणामध्ये देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे.
‘या’ औषधाच्या वापराने ४ दिवसांत ६० रुग्णांची करोनावर मात
दरम्यान, जिल्ह्यातील नागरिकांनीही करोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या सकारात्मक प्रयत्नांना प्रतिसाद दिला आहे. मात्र, अद्यापही करोनाचा धोका संपला नसल्याने नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये. घराबाहेर पडताना तोंडावर मास्क लावावा, आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे. घरातील वृद्ध, आजारी आणि लहान मुलांची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले आहे.
मटा ब्लॉग: ‘ती’ वेळ लोकांवर येऊ नये!
दृष्टीक्षेपात नगर जिल्ह्यातील स्थिती:
जिल्ह्यात आढळलेले एकूण ‘करोना’बाधित रुग्ण : ६३
एकूण रुग्णांपैकी ‘करोना’मुक्त झालेल्यांची संख्या : ४९
‘करोना’मुळे झालेले मृत्यू : ४ (कोपरगाव, जामखेड, पारनेर व संगमनेर तालुक्यातील प्रत्येकी एक जण)
सध्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असलेले रुग्ण : १० (जिल्ह्यातील – ९ व परजिल्ह्यातील १ )
महिन्याभरात ४०० टक्के मुंबईकर झाले क्वॉरंटाइन