Home शहरं मुंबई coronavirus: चिंता वाढली! धारावीत करोनाची सर्वाधिक लागण तरुणांना - coronavirus havoc did...

coronavirus: चिंता वाढली! धारावीत करोनाची सर्वाधिक लागण तरुणांना – coronavirus havoc did not stop in dharavi number of young people among patients


मुंबई: मुंबईत रविवारी करोनाचे ४४१ नवे रुग्ण सापडल्याने मुंबईतील करोना रुग्णांची संख्या ८६१३वर गेली आहे. तर एकट्या धारावीतीलच करोना रुग्णांची संख्या ५००वर गेली आहे. करोनाचा संसर्ग हा ज्येष्ठांना होत असल्याचं आजपर्यंत आढळून आलं असलं तरी धक्कादायक बाब म्हणजे धारावीत २१ ते ४० वयोगटातील तरुणांनाच करोनाची सर्वाधिक लागण झाल्याचं आढळून आल्याने आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे.

रविवारी धारावीत ९४ नवे रुग्ण सापडले असून दोघांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे धारावीतील करोनाबाधितांची संख्या ५९० झाली असून मृतांचा आकडा २० झाला आहे. आरोग्य प्रशासनाने १ मे रोजी जारी केलेल्या आकडेवारीनुसार धारावीत २१ ते ३९ वयोगट आणि ३१ ते ४० वयोगटातील प्रत्येकी ८६ जणांना करोनाची लागण झाली आहे. तसेच ४ ते ५० वयोगटातील ८५ लोकांना आणि ५१ ते ६० वयोगटातील ५३ जणांना करोनाची लागण झाली आहे. त्याशिवाय १० ते २० वयोगटातील ६ मुलांनाही करोनाची लागण झाली आहे. तरुण मुले सतत घराबाहेर पडत असल्याने त्यांना करोनाची लागण झाल्याचं सांगण्यात येतं.

रेल्वे मंत्रालयाचं घुमजाव, मजुरांकडून पैसे घेतलेच नसल्याचा दावा

तरुणांकडून लॉकडाऊनच्या नियमांचं पालन केलं जात नाही. त्यामुळे हे तरुण करोनाला बळी पडत आहेत. तरुणांनी घराबाहेर पडू नये आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन करावं याचं पालिकेकडून वारंवार आवाहन केलं जात आहे. तरीही तरुण वर्गाकडून त्याकडे दुर्लक्ष केलं जात असल्याने तरुणांना करोनाचा संसर्ग होत असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

तळीराम बाहेर पडले; वाईनशॉपसमोर तुफान गर्दी

करोना Live: देशातील करोनाबाधितांची संख्या ४२,५३३ वरSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Sushant Singh Rajput: सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरण : एनसीबीचे आरोपपत्र – sushant singh rajput death case : first charge sheet has filed in sushant...

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईअभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यूचा तपास सीबीआय करत असतानाच त्यात काही व्हॉट्सअॅप संभाषणांच्या माध्यमातून अंमली पदार्थांचे रॅकेट उजेडात आल्याने नार्कोटिक्स...

Recent Comments