Home शहरं मुंबई coronavirus: टेन्शन! राज्यात ३ हजार नवे करोनाबाधित सापडले; ५८ जणांचा मृत्यू -...

coronavirus: टेन्शन! राज्यात ३ हजार नवे करोनाबाधित सापडले; ५८ जणांचा मृत्यू – coronavirus: maharashtra reports record surge of over 3,000 cases in a day


मुंबई: राज्यातील करोना रुग्णांची संख्या अजूनही थांबताना दिसत नाही. राज्यात आज दिवसभरात ३०४१ करोना रुग्ण सापडले असून ५८ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आज ३ हजाराहून अधिक करोना रुग्ण सापडल्याने राज्यातील करोना रुग्णांची संख्या ५० हजार २३१ झाली आहे.

राज्यात आज ११९६ करोना रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे राज्यातील करोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या १४ हजार ६०० एवढी झाली आहे. त्यामुळे राज्यात ३३ हजार ९८८ करोना रुग्ण अद्याप उपचार घेत आहेत. आज दगावलेल्या रुग्णांमध्ये मुंबईत ३९, पुण्यात ६, सोलापूर ६, औरंगाबाद ४, लातूर, मीरा भाईंदर आणि ठाण्यातील प्रत्येकी एकाचा समाववेश आहे. मृतांमध्ये ३४ पुरूष आणि २४ महिलांचा समावेश आहे.

उद्यापासून मुंबईतूनही विमानसेवा सुरू; रोज २५ विमानांचे उड्डाण

मुंबईतील करोना रुग्णांची संख्या ३० हजार ५४२ असून मृतांची एकूण संख्या ९८८ झाली आहे. ठाण्यात आतापर्यंत ४२० रुग्णांची नोंद झाली असून ४जण दगावले आहेत. ठाणे महापालिका क्षेत्रात २५९० रुग्णांची नोंद झाली असून ३६ जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. नवी मुंबईमध्येही करोनाबाधितांची संख्या २ हजार ७ झाली असून मृतांची संख्या २९ झाली आहे. कल्याण-डोंबिवलीतील करोना रुग्णांची संख्या ८८९ झाली असून मृतांचा आकडा ७वर गेला असून उल्हासनगरमधील करोना रुग्णांची संख्या १६९वर गेली असून तीन जण दगावले आहेत.

राज्यात १४ हजार ६०० रुग्णांना बरे करून घरी सोडण्यात आले आहे. तसेच राज्यात ४ लाख ९९ हजार ३८७ लोकांना होम क्वॉरंटाइन करण्यात आले असून ३५ हजार १०७ संस्थात्मक क्वॉरंटाइन करण्यात आलं आहे.

Live: राज्यात ३०४१ नवे करोनाबाधित सापडले; ५८ रुग्णांचा मृत्यूSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Coronavirus vaccination: PM मोदींच्या इशाऱ्यानंतर मंत्र्याचा यू-टर्न, नाही घेतली करोनावरील लस – coronavirus vaccination telangana health minister etela rajender

हैदराबाद: सर्व प्रथम करोनावरील लस ( coronavirus vaccination ) आपण घेणार, अशी घोषणा तेलंगणचे आरोग्य मंत्री एटाला राजेंद्र यांनी केली होती. पण पंतप्रधान...

Rahul Gandhi: राजस्थानमधील काँग्रेस अधिवेशनात राहुल गांधी पुन्हा होणार अध्यक्ष? – congress conclave may be held in rajasthan to reinstall rahul gandhi as congress...

नवी दिल्लीः नेतृत्वाच्या संकटाचा सामना करत असलेल्या काँग्रेस पक्षाची सूत्रे पुन्हा एकदा राहुल गांधी ( rahul gandhi ) यांच्या हाती जातील. राजस्थानमध्ये फेब्रुवारी...

Recent Comments