Home शहरं अहमदनगर coronavirus : नगर: जामखेड ठरतंय जिल्ह्याचं ‘करोना’ केंद्र; आणखी ३ बाधित -...

coronavirus : नगर: जामखेड ठरतंय जिल्ह्याचं ‘करोना’ केंद्र; आणखी ३ बाधित – coronavirus ahmednagar 3 new covid 19 cases reported in jamkhed


अहमदनगर: जामखेड येथील करोना रुग्णांच्या संख्येत आज आणखी तीन व्यक्तींची भर पडली. आज सापडलेल्या रुग्णांमध्ये दोन पुरुष व एका महिलेचा समावेश आहे. त्यामुळे एकट्या जामखेड शहरातील करोनाबाधित रुग्णांची संख्या आता १७ झाली आहे. तर जिल्ह्यातील बाधितांची संख्या ४३ झाली आहे.

गेल्या सहा दिवसांचा विचार करता २० ते २६ एप्रिल या काळात जिल्ह्यात एकूण १४ करोनाबाधित रुग्ण सापडले असून, त्यापैकी तब्बल १० रुग्ण हे जामखेडचे आहेत. त्यामुळे जामखेड हे जिल्ह्याचे करोना केंद्र ठरू लागले असून करोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखता यावा, यासाठी प्रशासन अधिकच सतर्क झाले आहे.

जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे काल ४१ व्यक्तींच्या घशातील स्त्राव चाचणीचे नमुने तपासणीसाठी पाठवले होते. त्यापैकी ३८ व्यक्तींचे अहवाल काल रात्री प्राप्त झाले. ते सर्व अहवाल निगेटिव्ह आले होते. उर्वरित तीन अहवालाची प्रतीक्षा होती. ते अहवाल आज दुपारी प्राप्त झाले असून ते सर्व पॉझिटिव्ह आले आहेत. हे सर्वजण जामखेड येथील असून या रुग्णांमध्ये ४५ आणि ५० वर्षीय पुरुष आणि ३५ वर्षीय महिलेचा समावेश आहे.

दरम्यान, जिल्ह्यातील करोनाबाधित व्यक्तींची संख्या आता ४३ झाली आहे. त्यापैकी २४ व्यक्तींना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर २ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. सध्या बूथ हॉस्पिटलमध्ये १४ रुग्ण उपचार घेत असून, आज सापडलेल्या तिन्ही करोनाबाधित रुग्णांना आता बूथ हॉस्पिटलमध्ये हलविण्यात येणार आहे.

“नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये. तसेच जिल्हा प्रशासनाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि नियमांचे पालन करून सहकार्य करावे.”-राहुल द्विवेदी, जिल्हाधिकारी

एका रुग्णामुळे दहा जणांना लागण

काही दिवसांपूर्वी मृत्यू पावलेल्या जामखेड येथील करोनाबाधिताच्या दोन्ही मुलांना करोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. या मुलांच्या संपर्कात आलेल्या दोन युवकांनाही लागण झाली. त्यानंतर यापैकी एका युवकाच्या वडिलांना तर नंतर या युवकाच्या दोन मित्रांना लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. आज पुन्हा त्यांच्याच संपर्कातील तीन व्यक्ती बाधित आढळून आल्या आहेत. त्यामुळे एका बाधित व्यक्तीमुळे दहा जणांना करोना झाल्याचे उघड झाले आहे.

Live: देवळं बंद, तरी देव आपल्यासोबत: CM

मुंबईत आणखी एका पोलिसाचा करोनामुळं मृत्यू

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

double cord stem cell transplant surgery: देशातील पहिली डबल कॉर्ड स्टेम सेल प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी – india’s first double cord stem cell transplant surgery...

देशातील पहिली डबल कॉर्ड स्टेम सेल प्रत्यारोपण शस्त्रक्रिया (नाळेचे प्रत्यारोपण) नाशिकच्या लोटस इन्स्टिट्यूट ऑफ हेमॅटोलॉजी, ऑन्कोलॉजी आणि अस्थिमज्जा सेंटर येथे यशस्वी रित्या करण्यात...

‘पदवीधर’वर ‘करोना’चे आव्हान

म. टा. प्रतिनिधी, करोना कालावधीमध्येच यावेळेस पदवीधर मतदारसंघासाठीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. गेल्या निवडणुकीत तुलनेत कमी मतदान झाले आले होते. जास्तीत जास्त...

इंडियन आइडल १२: इंडियन आयडलच्या सेटवर झाडू मारायचा स्पर्धक, आता आवाजाने जिंकलं मन – yuvraj medhe doing mopping on indian idol sets impresses neha...

मुंबई- डोळ्यांत स्वप्नं घेऊन एक तरुण 'इंडियन आयडॉल'च्या बाराव्या सीझनच्या मंचावर उभा होता. त्यानं स्वतःची ओळख करून दिली. परीक्षक नेहा कक्करनं सांगितलं, मी...

admission without maratha reservation: अकरावी, इंजिनीअरिंग प्रवेशाचा मार्ग मोकळा – fyjc online, engineering admission process to be conducted without maratha reservation

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईसर्वोच्च न्यायालयाने राज्यातील सामाजिक आणि शैक्षणिक मागास (एसईबीसी) आरक्षणास अंतरिम स्थगिती दिली आहे. यामुळे २०२०-२१ या शैक्षणिक वर्षातील अकरावी...

Recent Comments