Home शहरं नागपूर coronavirus: नागपुरात एका करोनाबाधिताचा मृत्यू; १५ नवे रुग्ण - coronavirus one covid...

coronavirus: नागपुरात एका करोनाबाधिताचा मृत्यू; १५ नवे रुग्ण – coronavirus one covid 19 patient death and 15 new cases reported in nagpur today


म. टा. प्रतिनिधी, नागपूर

करोनाविरुद्धच्या लढाईत आघाडीवर लढणाऱ्या तीन पोलिसांना शनिवारी करोनाचा विळखा पडल्याच्या धक्क्यातून सावरतही नाही तोच, रविवारी आणखी एका करोनाबाधिताचा मृत्यू झाला. तर नवीन १५ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे आतापर्यंत बाधितांची संख्या ३५६ वर गेली आहे. तर मृतांची संख्या सहा झाली आहे.

रविवारी दिवसभरात करोनाचा विळखा पडलेल्यांमध्ये एकूण १६ जणांचा समावेश आहे. त्यातील एकाचा अहवाल मृत्यूपश्चात पॉझिटिव्ह आला आहे. शनिवारी रात्री या रुग्णाचा मेयोत आणण्यापूर्वीच मृत्यू झाला होता. त्यानंतर घशातील स्त्राव नमुना तपासला असता, त्यात तो पॉझिटिव्ह आला. करोनामुळे दगावलेली व्यक्ती ही शांतीनगरातील रहिवासी होती.

लातूरमध्ये ६५ वर्षीय करोनाबाधित रुग्णाचा मृत्यू

नागपुरात करोनाचा पाचवा बळी; ३३८ पैकी १९८ रुग्ण झाले पूर्ण बरे

करोनाची नव्याने लागण झालेल्यांमध्ये ६ जण हॉटस्पॉट ठरलेल्या सतरंजीपुरा येथील रहिवासी आहेत. पूर्वीच्या पॉझिटिव्ह रुग्णांच्या सहवासात आल्याने करोना लागण झालेल्या सहापैकी ४ जणांना चिचभवन, तर दोन जणांना आमदार निवासातल्या विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या विषाणू प्रयोगशाळेत पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये अमरावती येथील करोनाबाधित पोलिसाचा मुलगा आहे. तर दुसऱ्या एका प्रसुती झालेल्या महिलेचा समावेश आहे.

नियंत्रण कक्ष हवा २४ बाय ७

याशिवाय पाचपावली विलगीकरण कक्षातील चार जणांच्या घशातील स्त्राव नमुन्यांत करोनाचा अंश आढळला. या चारही जणांचे नमुने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या विषाणू प्रयोगशाळेत तपासले गेले. हे चारही जण मोमिमपुरा येथील रहिवासी आहेत. सोबतच सायंकाळच्या सुमारास पर्यावरण अभियांत्रिक संस्थेच्या (निरी) प्रयोगशाळेत मोमिनपुरा येथील आणखी दोघांच्या घशातील स्त्राव नमुन्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Pune Crime: अमोल कोल्हेंच्या नावाने बिल्डरकडे मागितले पैसे; पुढे काय घडले पाहा – money demanded from builder in the name of amol kolhe

पुणे:लॉकडाऊन काळात एका बिल्डरला खासदार अमोल कोल्हे बोलत असल्याची बतावणी करून फसविण्याचा प्रयत्न करणाऱ्याला खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे. त्याच्या विरोधात वानवडी...

Recent Comments