Home शहरं नागपूर coronavirus: नागपुरात करोनाबाधित महिलेची प्रसुती; बाळाला दिला जन्म - coronavirus covid-19 positive...

coronavirus: नागपुरात करोनाबाधित महिलेची प्रसुती; बाळाला दिला जन्म – coronavirus covid-19 positive pregnant woman gives birth to baby in hospital in nagpur


म. टा. प्रतिनिधी, नागपूर: सतरंजीपुरा येथील करोनाबाधितांच्या संपर्कात आल्याने विषाणूचा संसर्ग झालेल्या आणखी एका गर्भवती महिलेनं रविवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात एका गोंडस बाळाला जन्म दिला. करोनाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर नागपुरात आतापर्यंत झालेली ही दुसरी प्रसुती आहे. यापूर्वी इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात एका करोनाबाधित गरोदर महिलेनं कन्यारत्नाला जन्म दिला होता.

मेडिकलमध्ये रविवारी प्रसुती झालेल्या करोनाबाधित महिलेचं वय २८ वर्षे आहे. सतरंजीपुरा येथील ही महिला ९ महिन्यांची गरोदर असताना ती करोनाबाधित नातेवाईकांच्या संपर्कात आली होती. काही दिवसांपूर्वी या बाधित रुग्णाच्या सहवासातील साखळीची तपासणी केली असता, त्यात तिच्या घशातील स्त्राव नमुन्यात करोनाचा अंश आढळला होता. त्यानंतर या गरोदर महिलेला मेडिकलच्या कोव्हीड -१९ मधील वॉर्ड क्रमांक २५ मध्ये दाखल करण्यात आले होते. शनिवारी मध्यरात्री तिला प्रसुती वेदना सुरू झाल्यानंतर मेडिकलच्या स्त्री-रोग प्रसुती विभागात तिची प्रसुती करण्यात आली. एका गोंडस बाळाला तिनं जन्म दिला असून, दोघांचीही प्रकृती सध्या धोक्याबाहेर आहे. प्रसुतीपूर्वी तिच्या घशातील स्त्राव नमुन्यांची पुन्हा तपासणी करण्यात आली होती. यात तिचा अहवाल निगेटिव्ह आला.

या घडामोडीत शनिवारी रात्री उशीरा अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या प्रयोगशाळेतून प्राप्त अहवालात एका ४८ वर्षीय महिलेला करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. सतरंजीपुरा येथील या महिलेला पुढील उपचारासाठी इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या करोना वॉर्डात दाखल करण्यात आले. त्यामुळे आतापर्यंत नागपुरात करोनाची लागण झालेल्यांची संख्या १५१ वर गेली आहे.

करोनावर आतापर्यंत ५० रुग्णांची मात

करोना विषाणूची लागण झाल्यानंतर त्याच्याशी झुंज देत आजाराला परतवून लावणाऱ्या नागपुरातील लढवय्या रुग्णांच्या संख्येनेही आता अर्धशतकाचा आकडा गाठला आहे. करोना विषाणूने शिरकाव केल्यापासून आतापर्यंत नागपुरात ४८ जणांनी या आजारावर यशस्वी मात केली होती. त्या साखळीतील ४९ आणि ५० व्या रुग्णाला मेयोतून सुटी देऊन घरी पाठविण्यात आले. सतरंजीपुरा येथील या रुग्णाच्या घशातील स्त्राव नमुन्यांचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना रुग्णालयातून सुटी देऊन घरी पाठविण्यात आले. मेयोतून सूटी देऊन घरी रवाना करण्यात आलेल्या रुग्णांमध्ये मोमिनपुरा येथील ४२ वर्षीय पुरुष आणि सतरंजीपुरा येथील ३० वर्षीय तरुणाचा समावेश आहे. या दोघांनाही १८ एप्रिलला करोनाचे निदान झाल्यानंतर आमदार निवासातील एकांतवास कक्षातून मेयोत उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

दैनिक संशयित : १३४
एकूण संशयित : २४६१
सध्या भरती संशयित : १११
एकूण भरती संशयित : १६१०
एकूण भरती पॉझिटिव्ह रुग्ण: ९९
दैनिक तपासणी नमुने: १९४
एकूण तपासणी नमुने: ३७३८
आतापर्यंत पॉझिटिव्ह नमुने: १५१
घरी सोडलेले पॉझिटिव्ह रुग्ण: ५०
घरी सोडलेले संशयित: १४९७
आज अलगीकरण केलेले संशयित: ९६
अलगीकरण कक्षात भरती संशयित: १८८३
अलगीकरण कक्षातून घरी पाठविलेले संशयित: १९
अलगीकरणातून रुग्णालयात पाठविलेले संशयित : ११
पाठपुरावा सुरु असलेले एकूण संशयित: ४६६

मुंबई: धारावीत धास्ती वाढली! ९४ नवे करोनाबाधित; दोघांचा मृत्यू
LIVE: अकोल्यात करोनामुळे दोन महिलांचा मृत्यू
मुंबई पालिका कर्मचाऱ्यांची ‘ताज’मध्ये व्यवस्थाSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Thane News : Jameel Sheikh: मनसे पदाधिकाऱ्याची भररस्त्यात हत्या; ठाणे शहर हादरले – mns leader jameel sheikh shot dead in thane

ठाणे:ठाणे शहरातील राबोडी भागात मनसे पदाधिकारी जमील शेख यांची भररस्त्यात गोळी झाडून हत्या करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. जमील हे बाइकवरून निघाले...

Recent Comments