Home शहरं नागपूर coronavirus : नागपूर: 'त्या’ रुग्णाच्या संपर्कातील १९९ जणांना करोना संसर्गाची भीती -...

coronavirus : नागपूर: ‘त्या’ रुग्णाच्या संपर्कातील १९९ जणांना करोना संसर्गाची भीती – coronavirus in nagpur 199 persons fear to infection who contacted with that covid 19 patient


नागपूर: करोनामुळे मृत्यू झालेल्या सतरंजीपुऱ्यातील ‘त्या’ व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या १९९ जणांना करोनाचा संसर्ग होण्याची भीती आहे. या व्यक्तीच्या संपर्कातील बहुतेकांचे अहवाल पॉझिटिव्ह येत असल्याने ही भीती अधिकच बळावली आहे. त्यामुळे अशा संपर्कातील सर्वांना आधीच विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले असल्याचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सांगितले. या व्यक्तीच्या संपर्कातील ४४ जण आतापर्यंत करोना पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर, ११ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. अद्याप १४४ जणांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत. दरम्यान, पालिकेच्या सर्वेक्षण चमूला सहकार्य करून खरी माहिती देण्याचे आवाहन आयुक्तांनी केले आहे.

सोमवारी आणखी सहा करोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळल्याने नागपुरात चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळं खबरदारी घेण्याची गरज आहे. कोविड – १९ हा संसर्गजन्य आजार आहे. एका करोना पॉझिटिव्ह रुग्णामुळे ४०० ते एक हजार लोकांना संसर्ग होऊ शकतो, ही वैज्ञानिकदृष्ट्या महत्वाची बाब आहे. नागपूर शहरात करोना रुग्णांची संख्या वाढत आहे. ५ एप्रिलला शहरात करोनाचा पहिला मृत्यू झाला. या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या किंवा त्याच्या कुटुंबातील सदस्यांच्या संपर्कात आलेले सर्व पॉझिटिव्ह आहेत. ‘त्या’ वृद्धाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या कुटुंबातील तीन मुली, मुलगा, जावई, सून, नातवंडे अशा २२ सदस्यांचे मनपाच्या ‘करोना केअर सेंटर’मध्ये विलगीकरण करण्यात आले. याशिवाय किराणा सामान, डॉक्टर, औषध दुकान आणि यासह ज्या अन्य ठिकाणी ‘त्या’करोनाग्रस्त मृत रुग्णाचा व त्याच्या परिवारातील सदस्यांचा संपर्क आला, अशा सर्व ठिकाणच्या १९ लोकांचेही विलगीकरण करण्यात आले. या १९ जणांपैकी आठ जणांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला व एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तर १० अहवाल प्रतीक्षेत आहेत. या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या खासगी डॉक्टर आणि त्यांच्या दोन सहकाऱ्यांनाही विलगीकरण कक्षात ठेवले असून त्यांच्या सहकाऱ्यांचा पहिला अहवाल निगेटिव्ह आला होता. मात्र दुसऱ्या अहवालात एका सहकाऱ्याचा अहवाल करोना पॉझिटिव्ह आला आहे. आता डॉक्टरकडे मागील १४ दिवसांत येणाऱ्या रुग्णांची माहिती घेऊन त्यांनाही मनपाच्या विलगीकरण कक्षात आणण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.

भेटायला आलेल्यांचेही विलगीकरण

या व्यक्तीच्या आजारपणात अनेक नातलग आणि शेजारी भेटायला आले होते. त्यांची संख्या ४९ आहे. असे एकूण ‘त्या’ रुग्णाच्या थेट संपर्कात आलेल्या ८९ व्यक्ती शोधण्यात आल्या असून, त्यांना मनपाच्या विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. ८९ व्यक्तींपैकी ४२ व्यक्तींचा अहवाल करोना पॉझिटिव्ह आला आहे. तर ११ रुग्णांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. एकंदरीत नागपुरात एका रुग्णामुळे वेगाने करोनाचा संसर्ग वाढतो आहे. मनपाची पथकं घरोघरी जाऊन सर्व्हे करून लोकांची माहिती घेत आहे.

पत्रकारांची होणार करोना चाचणी

नागपुरातील पत्रकारांची करोना चाचणी करण्यासाठी महापौर संदीप जोशी यांनी पुढाकार घेतला आहे. शहरातील इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियाच्या प्रतिनिधींची करोना चाचणी २१ आणि २२ एप्रिलला इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात घेण्यात येणार आहे. मंगळवारी २१ एप्रिलला सकाळी साडेनऊ वाजता इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या प्रतिनिधींची, तर बुधवारी २२ एप्रिलला सकाळी साडेनऊ वाजल्यापासून प्रिंट मीडियाच्या फिल्डवर काम करणाऱ्या प्रतिनिधींची चाचणीही करण्यात येणार आहे.

करोना लढ्यासाठी मनपाला ‘फेस शिल्ड’ भेट

आरोग्य व अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी करोनाशी लढा देत आहेत. अशा योद्ध्यांना विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून ७ हजार फेस शिल्ड देण्यात येणार आहेत. महिंद्रा अॅण्ड महिंद्रा कंपनीने यासाठी पुढाकार घेतला आहे. सोमवारी, २० एप्रिलला उपमहापौर मनिषा कोठे यांच्याकडे महापौर कक्षात या फेस शिल्ड सुपूर्द करण्यात आल्या.

पालिका आयुक्त तुकाराम मुंढे साधणार फेसबुक लाईव्हद्वारे संवाद

करोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे मंगळवारी दुपारी १ वाजता फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधणार आहेत.

‘करोना’ची साखळी कशी तुटणार, या विषयावर ते अभ्यासपूर्ण विवेचन करतील. त्यानंतर यासंदर्भात नागरिकांनी काही शंका, अडचणी, तक्रारी अथवा प्रश्न विचारावे, असे आवाहन मनपातर्फे करण्यात येत आहेत. आयुक्तांशी फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधण्यासाठी @ShriTukaramMundhe या फेसबुक अकाउंटशी कनेक्ट होता येईल. यासोबतच @nmcngp या नागपूर महापालिकेच्या अधिकृत फेसबुक पेजवरून आणि @smartcitynagpur या स्मार्ट सिटीच्या फेसबुक पेजवरूनही संवाद साधता येईल.

करोनाचे मुंबईत ३०९० रुग्ण; आज ७ दगावले

करोना: पुण्यात रेड झोनमध्ये होणार ‘रॅपिड टेस्ट’

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

pm modi interacts with startups: नवीन स्टार्टअपसाठी १ हजार कोटींचा फंड; PM मोदी म्हणाले, ‘आमचा फोकस तरुणांवर’ – pm modi interacts with startups during...

नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे 'प्रारंभः स्टार्टअप इंडिया आंतरराष्ट्रीय समिट'ला संबोधित केले. वाणिज्य मंत्रालयाच्या उद्योग आणि अंतर्गत व्यापार संवर्धन...

Coronavirus vaccination: PM मोदींच्या इशाऱ्यानंतर मंत्र्याचा यू-टर्न, नाही घेतली करोनावरील लस – coronavirus vaccination telangana health minister etela rajender

हैदराबाद: सर्व प्रथम करोनावरील लस ( coronavirus vaccination ) आपण घेणार, अशी घोषणा तेलंगणचे आरोग्य मंत्री एटाला राजेंद्र यांनी केली होती. पण पंतप्रधान...

Recent Comments