Home शहरं कोल्हापूर coronavirus: महापूर, करोना संकटातही सांगली जिल्ह्याचा सरकारी तिजोरीला हातभार - sangli district...

coronavirus: महापूर, करोना संकटातही सांगली जिल्ह्याचा सरकारी तिजोरीला हातभार – sangli district collect goods gst revenue


यंदा राज्यात महापूर आणि करोना विषाणूच्या संसर्गामुळे महसूल वसुलीमध्ये कमालीची घट झाली. महापुरातून सावरताच करोना संसर्गामुळे सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांचे अर्थकारण कोलमडून पडले. मात्र, यानंतरही सांगली जिल्ह्याने जीएसटी वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण केले. विशेष म्हणजे सांगली जिल्ह्याने उद्दिष्टापेक्षा साडेसात टक्के वसुली जास्त करून सरकारच्या तिजोरीला हातभार लावला.

देशाच्या विकासात जीएसटी वसुलीस अनन्यसाधारण महत्त्व आहे. यातही महाराष्ट्राचा मोठा वाटा आहे. देशात २०१८-१९ मध्ये ११ लाख ७३ हजार ३७० कोटी जीएसटीची रक्कम जमा झाली होती. २०१९-२० मध्ये १२ लाख २२ हजार १४१ कोटी एवढी रक्कम जमा झाली. राज्यात २०१८-१९ मध्ये एक लाख ७० हजार २८९ कोटी रुपये जमा झाले होते, तर २०१९-२० मध्ये एक लाख ८५ हजार ९१७ कोटी रुपये जमा झाले. गेल्या आर्थिक वर्षात सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात महापुराचा मोठा फटका बसला. कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. यातून सावरताच करोनाच्या संसर्गामुळे आर्थिक उलाढाल थांबली होती. यामुळे महसूल वसुली करण्याचे आव्हान सरकारी यंत्रणांसमोर होते. जीएसटी विभागाने मात्र यात आघाडी मारली. सांगली जिल्ह्यात जीएसटी विभानाने उद्दिष्टापेक्षा साडेसात टक्के अधिक वसुली केली.

सन २०१८-१९ मध्ये सांगलीत ७५५ कोटी ७१ लाख रुपये जमा झाले होते. २०१९-२० मध्ये ८१३ कोटी ४७ लाख रुपये जमा झाले. म्हणजेच उद्दिष्टापेक्षा ५९ कोटी रुपये जास्त जमा झाले. राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये उद्दिष्टापेक्षा २० ते २५ टक्के वसुली कमी झाली आहे. या तुलनेत सांगलीने बाजी मारत उद्दिष्टापेक्षा साडेसात टक्के अधिक जीएसटीची रक्कम भरली, अशी माहिती केंद्रीय जीएसटी विभागाचे कर अधिकारी राजेंद्र मेढेकर यांनी दिली. संकटातही सांगलीकरांनी भरलेली जीएसटीची रक्कम म्हणजे सांगलीकरांच्या प्रामाणिकपणाचे उत्तम उदाहरणच म्हणावे लागेल.
कोट – महापूर आणि करोना संसर्गाच्या संकटामुळे यंदा महसूल वसुली करणे जिकिरीचे होते. मात्र, करदात्यांच्या प्रामाणिकपणामुळे संकटातही जीएसटीची रक्कम योग्य पद्धतीने जमा झाली. मार्च ते मे या तीन महिन्यात वसुलीत घट असली तरी, एकूण वर्षभरात उद्दिष्टापेक्षा साडेसात टक्के अधिक रक्कम जमा झाली आहे. अशी माहिती सांगली जिल्ह्याच्या राज्य कर उपायुक्त शर्मिला मिस्किन यांनी दिली.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

शिवछत्रपती आणि नेताजी

यांच्या १२५व्या जयंतीचा समारोह पुढील वर्षी होणार असला, तरी तो आत्ताच गाजतो आहे. केंद्र सरकारने एक बहुपक्षीय बडी समिती राष्ट्रीय स्तरावर स्थापली...

robbery in domestic women worker house: मोलकरणीच्या घरात ८१ हजारांची चोरी – 81000 rupees thieves from house of domestic women worker in aurangabad

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादधुणी-भांडी करून कुटुंबाचा उदनिर्वाह चालविणाऱ्या महिलेचे घरफोडून मोबाइलसह रोख रक्‍कम असा सुमारे ८१ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरणाऱ्याला जिन्सी पोलिसांनी...

Recent Comments