Home शहरं मुंबई coronavirus: मुंबईत आज ३८ करोनाबळी; १५७१ नवे रुग्ण - coronavirus 1571 new...

coronavirus: मुंबईत आज ३८ करोनाबळी; १५७१ नवे रुग्ण – coronavirus 1571 new covid19 cases and 38 deaths reported in mumbai today


मुंबई: करोना विषाणूच्या साखळीनं मुंबईभोवती आणखी घट्ट विळखा घातल्याचं आजच्या करोनाबाधितांच्या आकडेवारीवरून दिसून येतं. आज दिवसभरात ३८ रुग्णांना मृत्यू झाला आहे. तर तब्बल १५७१ नवीन बाधितांची नोंद झाली आहे. त्यामुळे एकूण करोनाबाधितांची संख्या १९,९६७वर पोहोचली आहे.

मुंबईत आज दिवसभरात २०६ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. या आजारातून बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या आता ५०१२ इतकी झाली आहे. तर आज दिवसभरात १५७१ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. त्यातील ५९० रुग्णांचे चाचणी अहवाल आज प्राप्त झाले असून, ते पॉझिटिव्ह आले आहेत. त्यांच्या स्वॅबचे नमुने १० ते १४ मे या कालावधीत तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. तर आज ३८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळं मृत्यूची एकूण संख्या ७३४ झाली आहे.

चिंताजनक! राज्यात आज २३४७ नवे करोनाग्रस्त; ६३ रुग्णांचा मृत्यू

मृत्यू झालेल्या ३८ रुग्णांपैकी १३ रुग्णांचा मृत्यू हा ८ ते १५ मे या कालावधीत झाला होता. ती संख्या आजच्या अहवालात समाविष्ट करण्यात आली आहे. मृतांपैकी २३ जणांना विविध अतिजोखमीचे आजार होते. मृतांमध्ये २८ पुरुष आणि १० महिला आहेत. तीन जण हे ४० वर्षांखालील होते. २० जण हे ६० वर्षांवरील होते. तर १५ जण हे ४० ते ४० वयोगटातील होते.

पिंपरी-चिंचवडमधील दीड महिन्यांच्या बाळाची करोनावर मात

धारावीत ४४ नवे बाधित, एकूण रुग्णसंख्या १२४२ वर

धारावीत आज दिवसभरात ४४ नवीन रुग्ण सापडले. त्यामुळं एकूण बाधितांची संख्या ही १२४२ झाली असून, आतापर्यंत ५६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर माहीममध्ये ६ नवे रुग्ण आढळले असून, एकूण संख्या १९३ वर पोहोचली आहे. मृत्यूची एकूण संख्या ८ वर पोहोचली आहे. दादरमध्येही ५ नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळं रुग्णसंख्या १५९ झाली आहे. तर आतापर्यंत ७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

दिलासा! मुंबईतील रूग्णांच्या दुपटीचा कालावधी १५ दिवसांवरSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Tim Paine: IND vs AUS : भारताविरुद्धच्या पराभवानंतर ऑस्ट्रेलियाच्या कर्णधारावर आली ही वाईट वेळ, जगासमोर लाज गेली… – ind vs aus : australia captain...

नवी दिल्ली, IND vs AUS : भारताविरुद्धच्या पराभवानंतर ऑस्ट्रेलियाच्या कर्णधार टीम पेनवर वाईट वेळ आली आहे. या एका गोष्टीमुळे संपूर्ण क्रिकेट विश्वासमोर पेनची...

Recent Comments