Home शहरं मुंबई coronavirus : मुंबई: धारावीत ३० नवे करोना रुग्ण; आतापर्यंत ११ मृत्यू -...

coronavirus : मुंबई: धारावीत ३० नवे करोना रुग्ण; आतापर्यंत ११ मृत्यू – coronavirus mumbai dharavi reported 30 new covid 19 cases, total reaches 168


मुंबई: मुंबईतील धारावी परिसर करोना विषाणूचं देशातील प्रमुख हॉटस्पॉट बनू पाहत आहे. धारावीत आज, सोमवारी करोनाचे ३० नवे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळं करोनाबाधितांचा आकडा १६८वर पोहोचला आहे. तर एकूण मृतांची संख्या ११ झाली आहे.

आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीत सोमवारी करोनाचे ३० नवे रुग्ण सापडले. रविवारी २० करोनाग्रस्त सापडले होते. तर आतापर्यंत करोनानं मृत्यू झालेल्यांची संख्या ११वर पोहोचली आहे. आज सापडलेल्या ३० रुग्णांपैकी १७ जण हे ३५ वर्षे वयोगटाखालील आहेत. तर एका रुग्णाचं वय दोन वर्षे आहे. तर एक रुग्ण १५ वर्षांचा आहे. सोमवारी आढळलेल्या रुग्णांपैकी फक्त दोन जण हे ६० वर्षांपेक्षा अधिक वयाचे आहेत.

दादरमध्ये ३ नवे रुग्ण

मुंबईतील दादरमध्ये आज, सोमवारी करोनाचे तीन रुग्ण सापडले आहेत. त्यात एक २९ वर्षीय तरुण, ४६ वर्षीय व्यक्ती आणि २४ वर्षीय तरुणीचा समावेश आहे. या तीन रुग्णांसह दादरमधील करोनाबाधितांची एकूण संख्या २५ वर पोहोचली आहे.

राज्यात २८३ नवे करोनाग्रस्त; रुग्णसंख्या ४४८३वर

चिंता वाढली: मुंबईतील ५३ पत्रकारांना करोना

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

grant to marathwada farmers: बारा लाख शेतकऱ्यांना ५५३ कोटी वाटप – 553 crore rupees of grant distributed to farmers in mrathwada

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादजून ते ऑक्टोबर या कालावधीत राज्यभरात झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे बाधित शेतकऱ्यांना महाविकास आघाडी सरकारने मदतीच्या दुसऱ्या टप्प्याची घोषणा केली...

Maharashtra Gram Panchayat Nivadnuk Nikal 2021: गिरीश महाजनांनी गड राखला; ४५ ग्रामपंचायतींवर भाजपचा झेंडा – girish mahajan win in 45 seat gram panchayat elections

म. टा. प्रतिनिधी, जळगाव: जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात भाजप नेते व माजी मंत्री गिरीश महाजन यांचीच सरशी झाली आहे. तालुक्यातील ६८ पैकी तब्बल...

Tesla Motors Will Route Its India Investment Through Dutch Arm – टेस्ला भारतात; पण एलन मस्क यांनी टाकला हा मोठा डाव | Maharashtra Times

मुंबई : अमेरिकन ऑटोमोबाइल कंपनी टेस्लाने भारतात येण्यासाठी नेदरलँडचा कर सवलतीचा मार्ग शोधला आहे. टेस्ला अॅम्स्टरडॅम ही टेस्ला मोटर्स अँड एनर्जी इंडियाची मुख्य...

Recent Comments