Home शहरं मुंबई coronavirus: मुंबई: धारावीत ४२ नवे करोनाग्रस्त; एका महिन्याच्या बाळालाही लागण - coronavirus...

coronavirus: मुंबई: धारावीत ४२ नवे करोनाग्रस्त; एका महिन्याच्या बाळालाही लागण – coronavirus mumbai 42 more covid19 cases reported from dharavi today total reaches 632 which includes 20 deaths


मुंबई: करोना विषाणूचं ‘हॉटस्पॉट’ ठरलेल्या धारावीतील रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. या परिसरात आज, सोमवारी दिवसभरात ४२ नवे रुग्ण सापडले. त्यामुळं एकूण रुग्णांचा आकडा ६३२वर पोहोचला आहे. तर आतापर्यंत २० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे अवघ्या एका महिन्याच्या बाळालाही करोनाचा संसर्ग झाला आहे.

धारावीत आज नव्याने नोंद झालेल्या करोना रुग्णांमध्ये २२ महिला आणि २० पुरुष आहेत. त्यात एका महिन्याच्या बाळालाही करोनाचा संसर्ग झाला आहे. हे सर्व रुग्ण पिवळा बंगला, धारावी क्रॉस रोड, मुकुंद नगर, धारावी पीसी, गोपाळ मिस्त्री चाळ, माटुंगा लेबर कॅम्प , कुंभारवाडा, सबरिना बाई चाळ, शिवशक्ती नगर, अबु बकर चाळ, मुस्लीम नगर, ९० रोड, ६० रोड, आझाद नगर, जगजीवन नगर, कल्याणवाडी, जलिल कम्पाउंड, संत रोहिदास मार्ग, ट्रान्झिट कॅम्प, न्यू सिद्धार्थ कॉलनी, उदय सोसायटी, शास्त्री नगर, सोशल नगर, शहीद भगत सिंग नगर, सोना नगर आदी भागांत सापडले आहेत.

दादर, माहिममध्येही करोनाग्रस्तांची संख्या वाढतेय

दादर आणि माहिममध्ये आज दिवसभरात अनुक्रमे चार आणि तीन नव्या करोनाबाधितांची नोंद झाली आहे. दादरमधील एकूण करोनाग्रस्तांची संख्या ५४ वर पोहोचली आहे. तर माहिममधील एकूण करोना रुग्णांची संख्या ७१ वर पोहोचली आहे.

३१ मे पर्यंत महाराष्ट्र ग्रीन झोन?; मुख्यमंत्र्यांच्या कठोर सूचना

करोना रुग्ण वाढण्याची शक्यता; एक खिडकी योजना तयार करा: टोपे

पुण्यात करोनामुळे पोलिसासह पाच जणांचा मृत्यूSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments