Home शहरं नाशिक coronavirus: मृतदेह थेट स्मशानभूमीतच; हॉस्पिटलचा सावध - the bodies are directly in...

coronavirus: मृतदेह थेट स्मशानभूमीतच; हॉस्पिटलचा सावध – the bodies are directly in the cemetery


म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महिलेचा मृतदेह थेट स्मशानभूमित घेऊन जा, असे सांगूनही नातेवाईकांनी तो घरी नेल्याच्या धक्कादायक प्रकारामुळे टीकेचे धनी ठरलेल्या सिव्हिल हॉस्पिटल प्रशासनाने आता सावध पवित्रा स्वीकारला आहे. बाधित किंवा करोना संशयित रुग्णाचा मृतदेह नातेवाइकांकडे सुपूर्द न करता थेट शववाहिकेतून स्मशानभूमीत नेला जाणार आहे. याकरिता सिव्हिल हॉस्पिटल प्रशासनाने महापालिकेकडून विशेष शववाहिका मागविली असून, ती उद्या, गुरुवारपर्यंत प्राप्त होईल, अशी माहिती सिव्हिल हॉस्पिटलमधील सूत्रांनी दिली आहे.

गेल्या काही दिवसांपासून करोनाबाधितांच्या मृत्यूचेही प्रमाण वाढले आहे. संसर्ग रोखण्यासाठी हा मृतदेह कसा हाताळावा याचे निर्देश केंद्र तसेच राज्य सरकारने दिले आहेत. बाधित किंवा करोना संशयित व्यक्तीचा मृतदेह अंत्यविधीला नेण्यापूर्वी प्राप्त मार्गदर्शक सूचनांनुसार त्याचे पॅकिंग करावे लागतो. असा पॅकिंग केलेला मृतदेह नातेवाईकांनी उघडू नये, त्यास स्पर्श करू नये असे स्पष्ट निर्देश दिले जातात. परंतु असे असतानाही फुले नगर येथील ६५ वर्षीय महिलेचा मृतदेह तिचे नातलग घरी घेऊन गेले. या मृतदेहाचे पॅकिंग खोलून तो तब्बल सात तास घरी ठेवला. या महिलेचा अहवाल मृत्यूपश्चात पॉझिटिव्ह आला. त्यामुळे नातलगांचे धाबे दणाणले. सिव्हिल हॉस्पिटल प्रशासनाच्या गलथानपणामुळे आम्हाला संसर्गाचा धोका बळावला असून आमचा जीव धोक्यात आल्याचा आरोप नातलगांनी केला, तर अंत्यविधीसाठी हा मृतदेह पुन्हा पॅकिंग करून देऊनही आरोप ऐकावे लागल्याने प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही मनस्तापाचा सामना करावा लागला. असे प्रकार यापुढील काळात घडू नयेत याकरिता आता सिव्हिल हॉस्पिटल प्रशासनानेच अधिक दक्षता घेण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढे बाधित किंवा संशयित मृत व्यक्तीचा मृतदेह घरी नेला जाऊ नये याकरिता तो नातेवाईकांच्या ताब्यात न देण्याचे धोरण अवलंबण्यात आले आहे.

पूर्णवेळ शववाहिका

केवळ अशा मृतदेहाला स्मशानभूमीपर्यंत घेऊन जाण्यासाठी विशेष आणि पूर्णतः याच व्यक्तिसाठी समर्पित शववाहिकेची व्यवस्था करण्यात येणार आहे. उद्यापर्यंत ही शववाहिका उपलब्ध होईल असे अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निखिल सैंदाणे यांनी सांगितले. ही शववाहिका सिव्हिल हॉस्पिटलच्या शवागार परिसरातच थांबविली जाईल. बाधित व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याची माहिती तात्काळ नातेवाईकांना दिली जाईल. या मृतदेहाचे पॅकिंग झाल्यानंतर तो शववाहिकेत ठेवला जाईल. या शववाहिकेत काही नातलगांनाही प्रवेश असेल. अशा मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशाभूमीत स्वतंत्र यंत्रणा असून मोजक्याच नातलग व निकटवर्तीयांच्या उपस्थितीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील असे सैंदाणे यांनी स्पष्ट केले आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

mumbai maximum temperature: मुंबईच्या तापमानात वाढ – mumbai weather : mumbai maximum temperature increases

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईमुंबईसह राज्याच्या काही शहरांत पहाटे अजूनही किंचितसा गारवा जाणवत असला तरी हळुहळू तापमान वाढत आहे. किमान आणि कमाल तापमान...

MNS-BJP alliance: Nashik: मनसेच्या ‘या’ दोन निर्णयांमुळं नव्या राजकीय समीकरणांची चर्चा – bjp mns may form alliance to fight nashik municipal election

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिकमहापौर निवडणुकीपाठोपाठ स्थायी समिती निवडणुकीतही मनसेने भाजपला साथ देण्याचा निर्णय घेतल्याने आगामी नाशिक महापालिका निवडणुकीत भाजप आणि मनसे एकत्र...

Recent Comments