Home शहरं मुंबई coronavirus : राज्यात आज करोनाचे ४६६ नवे रुग्ण; ९ मृत्यू, एकूण आकडा...

coronavirus : राज्यात आज करोनाचे ४६६ नवे रुग्ण; ९ मृत्यू, एकूण आकडा ४६६६वर – coronavirus 466 new covid-19 cases and 9 deaths reported in maharashtra total number of cases to 4666


मुंबई: महाराष्ट्रात करोनाबाधित रुग्णांची संख्या सोमवारीही वाढली असून, दिवसभरात ४६६ नवीन करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळे राज्यातील एकूण रुग्ण संख्या आता ४ हजार ६६६वर पोहोचली आहे. आज राज्यात नऊ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यात सात जण मुंबईतील असून, नाशिक जिल्ह्यातील मालेगाव शहरात दोन रुग्णांचा समावेश आहे. राज्यातील एकूण करोनाबाधितांच्या मृत्यूची संख्या २३२ झाली आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

आज ६५ रुग्ण बरे होऊन घरी परतले असून, आजपर्यंत एकूण ५७२ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ७६ हजार ०९२ नमुन्यांपैकी ७१ हजार ६११ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोनाकरिता निगेटिव्ह आले असून, ४ हजार ६६६ जणांचे नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ९३ हजार ६५५ लोक होम क्वारंटाइनमध्ये असून, ६ हजार ८७९ लोक संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत. त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेन्मेंट कृती योजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या ३६४ कंटेन्मेंट झोन क्रियाशील असून आज एकूण ५ हजार ६४८ सर्वेक्षण पथकांनी २१ लाख ८५ हजार इतक्या लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.

मुंबई, पुण्यात स्थिती गंभीर; केंद्राची पथकं दाखल

चिंता वाढली: मुंबईतील ५३ पत्रकारांना करोना

करोना रुग्णांच्या विश्लेषणातून काही बाबी समोर आल्या आहेत. राज्यातील २ हजार ३३६ रुग्णांचे विश्लेषण केले असता, त्यापैकी १ हजार ८९० म्हणजे ८१ टक्के रुग्ण हे लक्षणरहित आहेत. तर ३९३ रुग्णांना म्हणजे १७ टक्के रुग्णांना लक्षणे असून, या रुग्णांपैकी ५३ रुग्ण म्हणजेच दोन टक्के रुग्ण हे अतिदक्षता विभागात भरती आहेत, असेही आरोग्यमंत्री टोपे यांनी सांगितले.

मुंबई: धारावीत ३० नवे करोनाग्रस्त; एकूण ११ मृत्यू

‘विदर्भातील करोना प्रयोगशाळांची माहिती द्या’

आज झालेल्या नऊ मृत्यूपैकी सहा पुरुष आणि तीन महिला आहेत. ६० वर्षे किंवा त्यावरील वयोगटातील पाच रुग्ण, तर ४० ते ६० वयोगटातील एक रुग्ण आणि ४० वर्षाखालील एका रुग्णाचा मृत्यू झाला. मालेगाव शहरातील मृत्यूमुखी पडलेल्या दोन रुग्णांना इतर काही आजार आहेत का याची माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही. उर्वरित सात जणांमध्ये पाच रुग्णांना मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार असल्याचे समोर आले आहे, असेही टोपे यांनी सांगितले.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

mumbai maximum temperature: मुंबईच्या तापमानात वाढ – mumbai weather : mumbai maximum temperature increases

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईमुंबईसह राज्याच्या काही शहरांत पहाटे अजूनही किंचितसा गारवा जाणवत असला तरी हळुहळू तापमान वाढत आहे. किमान आणि कमाल तापमान...

MNS-BJP alliance: Nashik: मनसेच्या ‘या’ दोन निर्णयांमुळं नव्या राजकीय समीकरणांची चर्चा – bjp mns may form alliance to fight nashik municipal election

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिकमहापौर निवडणुकीपाठोपाठ स्थायी समिती निवडणुकीतही मनसेने भाजपला साथ देण्याचा निर्णय घेतल्याने आगामी नाशिक महापालिका निवडणुकीत भाजप आणि मनसे एकत्र...

Recent Comments