Home शहरं मुंबई coronavirus: राज्यात करोना मृत्यू थांबेना! दिवसभरात १५२ बाधित दगावले; मुंबईत सर्वाधिक ९७...

coronavirus: राज्यात करोना मृत्यू थांबेना! दिवसभरात १५२ बाधित दगावले; मुंबईत सर्वाधिक ९७ बळी – with 3,607 new covid-19 cases, maharashtra’s tally crosses 97k-mark


मुंबई: राज्यातील करोना रुग्णांच्या मृतांचा आकडा दिवसागणिक वाढतच आहे. आज राज्यात दिवसभरात १५२ करोनाबाधित दगावले असून राज्यात मुंबईत सर्वाधिक ९७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील मृतांची संख्या ३ हजार ५९० झाली आहे. राज्यात आज ३ हजार ६०७ नवे रुग्ण सापडल्याने एकूण रुग्णसंख्या ९७ हजार ६४८वर गेली आहे. त्याशिवाय आज १ हजार ५६१ रुग्ण करोनामुक्त झाल्याने करोना आजारातून बरे झालेल्यांची संख्या ४६ हजार ७८ झाली आहे.

राज्यात आज दगावलेल्या १५२ रुग्णांपैकी ९७ रुग्ण हे एकट्या मुंबईतील आहेत. मिरा-भायंदर येथे ९, कल्याण-डोंबिवलीत ७, नवी मुंबईत ४, वसई-विरारमध्ये २, नाशिकमध्ये ५, औरंगाबादमध्ये ६, लातूरमध्ये २, पुणे आणि सोलापुरात प्रत्येकी ८, रत्नागिरी, हिंगोली, जालना आणि नांदेडमध्ये प्रत्येकी एक रुग्ण दगावला आहे. आज दगावलेल्या रुग्णांमध्ये १०२ पुरुष आणि ५० महिलांचा समावेश आहे. तसेच मृतांपैकी ६० वर्षांवरील ८५, ४० ते ५९ वयोगटातील ५४ आणि ४० वर्षांखालील १३ रुग्णांचा समावेश आहे. दगावलेल्या रुग्णांपैकी १०७ रुग्णांना मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग आदी आजार होते, असं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं.

आज दगावलेल्या १५२ मृतांपैकी ३५ रुग्णांचा दोन दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता. तर इतर रुग्णांचा मृत्यू १ एप्रिल ते ८ जून या कालावधीतील आहेत. या कालावधीत ११७जण दगावले. त्यात मुंबईतील ८७, मिरा भाईंदर येथील ८, कल्याण-डोंबिवली आणि सोलापूर येथील प्रत्येकी ७, नवी मुंबईतील ४, नाशिकमधील ३ आणि वसई-विरारमधील एकाचा समावेश आहे.

राज्यात आज १५६१ रुग्णांना घरी सोडण्यात आले. आतापर्यंत घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची एकूण संख्या ४६ हजार ७८ झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या ३६०७ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ४७ हजार ९६८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहितीही टोपे यांनी दिली.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

मास्क न लावणाऱ्यांमुळे वाढू शकतो करोनाचा धोका

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई संसर्गवाढीच्या (उच्चतम बिंदू) महत्त्वाच्या टप्प्यावर मुंबई आली असल्याचे निरीक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांकडून वारंवार व्यक्त केले जात असले तरीही ...

Recent Comments