Home शहरं मुंबई coronavirus : राज्यात ४४० नवे करोनाग्रस्त, १९ मृत्यू; रुग्णसंख्या ८ हजारांवर -...

coronavirus : राज्यात ४४० नवे करोनाग्रस्त, १९ मृत्यू; रुग्णसंख्या ८ हजारांवर – coronavirus in maharashtra tally of covid19 patients in state rises to 8068 with 440 new cases


मुंबई: राज्यातील करोनाबाधितांची संख्या वाढतच आहे. आज दिवसभरात ४४० नवे रुग्ण सापडले असून, १९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर एकूण रुग्णसंख्या ८, ०६८ झाली आहे. तर आतापर्यंत ३४२ बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आज राज्यात करोनाबाधित ४४० नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण रुग्ण संख्या ८०६८ झाली आहे. आज ११२ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ११८८ रुग्ण बरे झाले आहेत. तर एकूण ६५३८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १ लाख १६ हजार ३४५ नमुन्यांपैकी १ लाख ७ हजार ५१९ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोनाकरता निगेटिव्ह आले आहेत, तर ८०६८ जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १ लाख ३६ हजार ९२६ लोक होम क्वारंटाइनमध्ये असून, ९१६० लोक संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

आज राज्यात १९ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता ३४२ झाली आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई येथील १२, पुणे महानगरपालिका येथे ३, जळगाव येथे २, सोलापूर शहरात १, तर लातूर येथे १ मृत्यू झाला आहे.


आज झालेल्या मृत्यूंपैकी ११ पुरुष तर ८ महिला आहेत. आज झालेल्या १९ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ७ रुग्ण आहेत; तर १० रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. २ रुग्ण ४० वर्षांखालील आहेत. या १९ मृत्यूंपैकी ४ रुग्णांच्या इतर आजारांबाबत माहिती अद्याप मिळालेली नाही. उर्वरित १५ रुग्णांपैकी ११ जणांमध्ये (७३ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, क्षयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

आजचं राशीभविष्य… दिनांक २९ नोव्हेंबर २०२०

आजचं राशीभविष्य... दिनांक २९ नोव्हेंबर २०२० Source link

दीडदमडी : अवघी झाली गंमत…

गेल्या वर्षी २३ नोव्हेंबरला नेमकं काय झालं, यावर बरीच पुस्तकं येत आहेत. प्रत्येकाला दिसणारं सत्य वेगळं असतं, त्यामुळे या पुस्तकांमधून वेगवेगळं सत्य जगापुढे...

Recent Comments