Home महाराष्ट्र coronavirus: लातूरमध्ये ६५ वर्षीय करोनाबाधित रुग्णाचा मृत्यू - coronavirus 65 year old...

coronavirus: लातूरमध्ये ६५ वर्षीय करोनाबाधित रुग्णाचा मृत्यू – coronavirus 65 year old covid 19 patient dies in latur


लातूर/ औरंगाबाद: लातूरमधील उदगीर उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या करोनाबाधित व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. आज रविवारी दुपारी १२.४५ वाजता या ६५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला.

६५ वर्षीय करोनाबाधित व्यक्तीला मधुमेह, न्युमोनिया हे आजारही होते, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय ढगे यांनी दिली. उदगीर उपजिल्हा रुग्णालयात ते उपचार घेत होते. आज दुपारी त्यांचा मृत्यू झाला, असेही त्यांनी सांगितले. करोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींची संख्या दोन झाली आहे.

हसनाबादेतील वृद्धेला करोना

भोकरदन तालुक्यातील हसनाबाद येथील ६० वर्षीय महिलेचा चाचणी अहवाल करोना पॉझिटिव्ह आला आहे. ही महिला लॉकडाउननंतर २२ मार्च रोजी हसनाबाद येथून औरंगाबाद येथे मकसूद कॉलनीत राहण्यासाठी गेली होती. अस्वस्थ वाटू लागल्याने तिला औरंगाबाद येथील सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथे तिचे स्वॅबचे नमुने प्रयोग शाळेकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. या महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, औरंगाबादमधील घाटी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या करोनाबाधित ६५ रुग्णांपैकी ३९ जणांची प्रकृती गंभीर असल्याचे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी सांगितले.

लॉकडाउन शिथिलतेबाबत १९ मे नंतरच निर्णय

शहरातील करोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी लॉकडाउनची कठोर अंमलबजावणी करण्यात येत असल्याचे सांगत १९ रोजी याबाबतचा संपूर्ण आढावा घेऊन लॉकडाउन शिथिलतेबाबत निर्णय घेणार असल्याचे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी सांगितले. या शिवाय शहरातील १०० पेक्षा जास्त खाटा असलेल्या मोठ्या रुग्णालयांतील २५ टक्के खाटा या कोविड रुग्णांसाठी राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

pm modi interacts with startups: नवीन स्टार्टअपसाठी १ हजार कोटींचा फंड; PM मोदी म्हणाले, ‘आमचा फोकस तरुणांवर’ – pm modi interacts with startups during...

नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे 'प्रारंभः स्टार्टअप इंडिया आंतरराष्ट्रीय समिट'ला संबोधित केले. वाणिज्य मंत्रालयाच्या उद्योग आणि अंतर्गत व्यापार संवर्धन...

Coronavirus vaccination: PM मोदींच्या इशाऱ्यानंतर मंत्र्याचा यू-टर्न, नाही घेतली करोनावरील लस – coronavirus vaccination telangana health minister etela rajender

हैदराबाद: सर्व प्रथम करोनावरील लस ( coronavirus vaccination ) आपण घेणार, अशी घोषणा तेलंगणचे आरोग्य मंत्री एटाला राजेंद्र यांनी केली होती. पण पंतप्रधान...

Recent Comments