Home देश coronavirus: हाताचं चुंबन घेणाऱ्या तांत्रिकामुळे २३ जणांचा जीव धोक्यात - baba who...

coronavirus: हाताचं चुंबन घेणाऱ्या तांत्रिकामुळे २३ जणांचा जीव धोक्यात – baba who treated coronavirus by kissing peoples’ hand, dies in ratlam, madhya pradesh


रतलाम, मध्य प्रदेश : कोविड १९ मुळे मध्य प्रदेशच्या रतलाममध्ये एका तांत्रिकाचा मृत्यू झालाय. हा बाबा लोकांच्या हाताचं चुंबन घेऊन त्यांच्यावर उपचार करण्याचा दावा करत होता. त्यामुळे, त्याच्या मृत्यूनंतर संपर्कात आलेल्या लोकांचा तपास करून त्यांचीही करोना चाचणी करण्यात आली तेव्हा आणखीन २३ जण करोना पॉझिटिव्ह आढळलेत.

रतलामच्या नयापुरा भागात ही घटना घडल्याचं उघडकीस आलंय. लोकांना तावीज देऊन तसंच तंत्र-मंत्राच्या सहाय्यानं लोकांवर उपचार करण्याचा दावा मृत तांत्रिक करत होता. अस्लम बाबा म्हणून तो या भागात प्रचलित होता. यावेळी तो अनेक लोकांच्या हातांचं चुंबन घेत होता. या अंधश्रद्धेवर श्रद्धा असणाऱ्या स्थानिकांची त्याच्याकडे करोना काळातही गर्दी पाहायला मिळत होती.

४ जून रोजी या तांत्रिक बाबाचा मृत्यू झाला. त्याची करोना चाचणी पॉझिटिव्ह होती. नियमानुसार प्रशासनानं त्याची कॉन्टॅक्ट हिस्ट्री तपासली. तेव्हा मृत्यूपूर्वी बाबामुळे २३ जणांना करोना संक्रमणानं गाठल्याचं समोर आलं.

वाचा :अमानुष! व्यक्तीचा मृतदेह कचऱ्याच्या गाडीत टाकून नेला
वाचा :करोना कॉलर ट्यूनला आहे ‘या’ महिलेचा आवाज
वाचा :अनलॉक-१.० चे नियम पाळा, अन्यथा होऊ शकतात ‘अशा’ शिक्षा

करोना पॉझिटिव्ह आढळलेल्या इतर २३ जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हे सर्व नयापुरा भागाचे रहिवासी आहेत. उल्लेखनीय म्हणजे, करोनापासून सुटका मिळवण्यासाठी यातील काही जणांनी बाबाशी संपर्क केला होता.

या घटनेनंतर खाडकन डोळे उघडलेल्या प्रशासनानं खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील जवळपास २९ बाबांना क्वारंटीन केलंय. करोना चाचणीसाठी त्यांचेही नमुने घेण्यात आलेत.

मध्य प्रदेशातील इंदोर शहरात बुधवारी करोना व्हायरसचे ४१ नवीन करोनाबाधित रुग्ण आढळले होते. त्यानंतर इंदोरमधील करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ३९२२ वर पोहचलीय. यातील २६१८ रुग्णांना उपचारानंतर रुग्णालयातून सुटी देण्यात आलीय. तर १६३ जणांचा मृत्यू झालाय.

वाचा :मदतीची ‘ऑफर’; भारतानं पाकिस्तानला आरसा दाखवला!
वाचा :करोना संकटाला संधीत रुपांतरित करण्याची हीच वेळ; मोदींचे आवाहन
वाचा :करोना : खुशखबर! भारत ‘या’ बाबतीत जगात अव्वलSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

PM Modi: PM मोदींनी सांगितलं, त्यांच्या कुठल्या निर्णयाने होतेय करोना रुग्णसंख्येत घट – india has one of the highest recovery rates of 88 percent...

नवी दिल्ली: भारतात सध्या करोना संसर्गाच्या ( coronavirus india ) रुग्णांमध्ये घट झाली आहे आणि करोनातून बरे ( covid 19 india ) होण्याचे...

Recent Comments