Home शहरं अहमदनगर Coronavirus Ahmednagar: निम्मे नगर पुन्हा 'लॉकडाउन'... - now ahmednagar half town again...

Coronavirus Ahmednagar: निम्मे नगर पुन्हा ‘लॉकडाउन’… – now ahmednagar half town again lockdown


म.टा.प्रतिनिधी, नगर

गेल्या दोन दिवसांत करोना रुग्ण संख्येत झपाट्याने वाढली असून तब्बल ४४ नवे रुग्ण सापडले आहेत. यापैकी ३० रुग्ण नगर शहरातील असून शहरातील तोफखाना, सिद्धार्थनगर व नालेगाव हा परिसर कंटेन्मेंट झोन झाला आहे. त्यामुळे जवळपास निम्मे नगर शहर पुन्हा लॉकडाउन झाले आहे.

मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद अशा रेड झोनमधून नगरमध्ये येणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. बाहेरच्या जिल्ह्यातून येणाऱ्या या नागरिकांमुळे करोनाचे रुग्णही वेगाने वाढत आहेत. गेल्या दोन दिवसांमध्ये तर जिल्ह्यात सर्वात जास्त रुग्ण नगर शहरामध्येच आढळले आहेत. त्यामुळे अनलॉक नंतर सुरळीत झालेल्या नगर शहरातील बाजारपेठेतील व्यवहार पुन्हा विस्कळित झाले आहेत. शहरातील दाटवस्तीत करोनाचा शिरकाव झाल्यामुळे प्रशासन हादरले आहे. करोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी आवश्यक त्या विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत.

नगरमध्ये बुधवारी तोफखाना व सिद्धार्थनगर परिसरात करोनाचे अनुक्रमे सात व चार रुग्ण सापडले होते. या परिसरात दाटवस्ती असल्यामुळे येथे करोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्‍यता गृहीत धरून तेथे आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना तातडीने हाती घेण्यात आलेल्या आहेत. सिद्धार्थनगर, तोफखाना हा परिसर कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला होता. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी स्वतः बुधवारी या भागात जाऊन पाहणी केली होती. त्यातच गुरुवारी नगर शहराच्या मध्यवर्ती भागात असणाऱ्या नालेगाव येथे तब्बल बारा करोनाबाधित सापडले आहेत. त्यामुळे हा भाग सुद्धा महापालिकेने कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर केला आहे. विविध उपाययोजना करूनही रुग्ण संख्या आटोक्यात आली नाही तर वेळप्रसंगी नगर शहर बंद करण्याचा पर्याय देखील प्रशासनाने समोर ठेवला आहे. तसेच नगर शहरातील महत्त्वाचा म्हणून ओळखला जाणारा चितळे रोड गुरुवारी बंद करण्यात आला आहे. या रस्त्यावर भाजी विक्रेते बसत असल्यामुळे येथे खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. बाजारपेठेत येणाऱ्या नागरिकांचीही या रस्त्यावर गर्दी असते. वेळोवेळी सूचनाही देऊनही गर्दी कमी होत नसल्याने अखेर हा रस्त्याच बंद करण्यात आला आहे. नगर शहराच्या अंतर्गत भागात कंटेन्मेंट झोन जाहीर करण्यात आल्याने नगरची ऐतिहासिक दिल्लीगेट वेसही वाहतुकीसाठी बंद करण्यात आली आहे.

Bजिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावाB

शहरातील सिद्धार्थनगर, नालेगाव, तोफखाना अशा दाटवस्तीमध्येच करोनाचा शिरकाव झाल्याने धोका वाढला आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी गुरुवारी सायंकाळी नालेगाव भागात जाऊन करोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी प्रशासनाकडून राबवण्यात येत असलेल्या उपाययोजनांची पाहणी करून विविध यंत्रणांकडून आढावा घेतला. यावेळी पोलिस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह, महापालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार, शहर अभियंता सुरेश इथापे, महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ.अनिल बोरगे, पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके उपस्थित होते.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

pathardi leopard attack: Leopard Attack धक्कादायक: चिमुकला आईसोबत बसला होता; बिबट्याने झडप घातली अन्… – leopard attacks four year old boy in pathardi

नगर: आईजवळ बसलेल्या चार वर्षाच्या मुलाला बिबट्याने उचलून नेल्याची धक्कादायक घटना पाथर्डी तालुक्यातील शिरापूर येथे आज रात्री आठच्या सुमारास घडली आहे. सार्थक संजय...

Recent Comments