Home विदेश coronavirus and cold: खरंच की काय...सर्दीमुळे तुम्ही राहू शकता करोनापासून सुरक्षित? -...

coronavirus and cold: खरंच की काय…सर्दीमुळे तुम्ही राहू शकता करोनापासून सुरक्षित? – coronavirus updates: common cold might help give protection from covid-19


सिंगापूर: करोनाच्या संसर्गावर संशोधन करणाऱ्या एका वैज्ञानिकांच्या पथकाने मोठा दावा केला आहे. माणसांना होणारी सर्दी करोनापासून सुरक्षित ठेवू शकतो. सर्दीमुळे निर्माण होणारी प्रतिकार शक्ती जवळपास १७ वर्ष करोनाच्या विषाणूपासून बचाव करू शकते असा दावा करण्यात आला आहे. त्याशिवाय ज्या व्यक्तींना सर्दी झाली आहे, त्यांना करोनाची बाधा होण्याचा धोका कमी असल्याचाही दावा करण्यात आला आहे.

‘डेली मेल’ने दिलेल्या वृत्तानुसार, सिंगापूरच्या ड्युक-एनयुएस मेडिकल स्कूलच्या इम्युनोलॉजी विभागाचे प्रमुख प्रा. अंतोनियो ब्रेतोलेती यांच्या नेतृत्वात हे संशोधन करण्यात आले. त्यांच्या टीमने दावा केला की, सर्दी झाल्यानंतर शरीरात प्रतिकार शक्ती निर्माण होते. ही प्रतिकार शक्ती करोनापासून बचाव करण्यासाठी अथवा त्याचा प्रभाव कमी करण्यासाठी फायदेशीर असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. या संशोधनात सर्दीच्या आजारापासून लढण्यासाठी शरीरात तयार होणाऱ्या टी-सेल्स यादेखील करोनाविरोधात प्रभावी ठरत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. बीटा-करोना व्हायरस OC43 आणि HKU1 माणसांमध्ये सर्दी आणि चेस्ट-इन्फेक्शन निर्माण करतात. हे सगळे विषाणू आणि करोनाचे विषाणू , मर्स आणि सार्स यांची जनुकीय संरचना एकसारखी असते. त्याशिवाय हे विषाणू प्राण्यांमधून माणसांमध्ये पसरतात.

वाचा: काय सांगता…मांजरीवरील औषधाने केला करोनाचा खात्मा!

करोना गटातील विषाणू सर्दीचा आजार देण्यास ३० टक्के कारणीभूत असतात. त्याशिवाय हे व्हायरस सर्दीसारख्या आजारांशिवाय इतरवेळीही घातक ठरू शकतात. या विषाणूंमुळे होणाऱ्या सर्दीविरोधात टी-सेल्स पेशी सुरक्षा देतात. हे विषाणू शरीरात आल्यानंतर टी-सेल्स सक्रिय होतात आणि त्यांचा प्रभाव कमी करतात अथवा संपुष्टात आणतात. कोविड-१९ आणि सार्सविरोधात टी-सेल्स सक्रिय होत असल्याचेही संशोधकांना आढळले आहे. संशोधकांनी या संशोधनासाठी कोविड-१९ च्या आजारावर मात केलेल्या २४ रुग्णांच्या रक्ताचे नमुने घेतले. तर, सार्सच्या आजारातून बरे झालेल्या २३ आणि सार्स अथवा करोनाची बाधा न झालेल्या १९ रुग्णांच्या रक्ताचे नमुने घेतले होते.

आणखी वाचा:
‘या’ महिन्यात करोनावर लस?; चीन करणार मोठी घोषणा…
अॅण्टीबॉडी औषधाची मानवी चाचणी सुरू; ‘या’ महिन्यात येणार औषध!Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

IPL points table: IPL2020: सलग तीन विजयानंतर पंजाबने घेतली गुणतालिकेत मोठी झेप, पाहा काय झाला बदल – ipl2020: kings eleven punjab took 5th position...

दुबई : आज किंग्स इलेव्हन पंजाबच्या संघाने आयपीएलमधील विजयी हॅट्ट्रिक साजरी केली. आजच्या सामन्यात तर दिल्ली कॅपिटल्सला पंजाबच्या संघाने मोठा धक्का दिला. त्यामुळे...

Recent Comments