Home विदेश coronavirus and hydroxychloroquine: करोना: ट्रम्प यांनी दावा केलेल्या 'संजीवनी' औषधामुळे मृतांच्या संख्येत...

coronavirus and hydroxychloroquine: करोना: ट्रम्प यांनी दावा केलेल्या ‘संजीवनी’ औषधामुळे मृतांच्या संख्येत वाढ – malaria drug taken by trump is tied to increased risk of heart problems and death in new study


वॉशिंग्टन: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी करोनाच्या आजाराविरोधात आग्रहाने वापरण्यास सांगितलेले हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन या मलेरिया प्रतिबंधक औषधामुळे करोनाबाधितांच्या मृत्यूत वाढ होत असल्याचे समोर आले आहे. अमेरिकेतील आरोग्य तज्ञांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन औषध वापरण्याचा आग्रह धरला होता.

विज्ञान विषयक नियतकालिक, ‘लॅसेंट’मध्ये प्रकाशित झालेल्या अहवालात ही बाब समोर आली आहे. लॅसेंटमधील संशोधनानुसार, हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन दिलेल्या करोनाबाधितांच्या मृत्यूंचे प्रमाण हे १८ टक्के आहे. तर, क्लोरोक्विन औषधे दिलेल्या रुग्णांचे प्रमाण १६.४ टक्के आहे. तर, ज्या रुग्णांना ही औषधे दिली नव्हती, त्यांच्यातील मृत्यूचे प्रमाण हे ९ टक्के होते. ज्या करोनाबाधितांवर हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन किंवा क्लोरोक्वीन अॅण्टीबायोटिकचा वापर करण्यात आला, त्यांच्यात मृत्यूंचे प्रमाण अधिक असल्याचे समोर आले आहे. हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन औषधाचा वापर क्लिनिकल चाचणीशिवाय करण्यास तज्ञांनी विरोध दर्शवला होता.

वाचा: ‘या’ महिन्यांमध्ये होणार करोना संसर्गाचा ‘दि एन्ड’!

हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन औषधाचा वापर मलेरियाच्या रुग्णांसाठी प्रभावी असल्याचे संशोधकांनी म्हटले आहे. मलेरियाशिवाय संधिवाताशी संबंधित काही आजारावर हे औषध परिणामकारक आहे. लॅसेंटमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनात जवळपास ९६ हजार करोनाबाधितांचा अभ्यास करण्यात आला. यामध्ये जवळपास १५ हजार रुग्णांना हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन किंवा त्याच्यासारखे औषध देण्यात आले होते. त्याशिवाय यातील काही रुग्णांना हायड्रॉक्सिक्लोरोक्वीनसह अॅण्टीबायोटिक किंवा फक्त अॅण्टी बायोटीक औषधही देण्यात आले होते.

वाचा: करोनाच्या लसीचा मानवावर यशस्वी प्रयोग!

उपचारासाठी क्लोरोक्विन औषधाचा वापर करण्यात आलेल्या रुग्णांचा मोठ्या प्रमाणावर रुग्णालयात मृत्यू झाला. या रुग्णांमध्ये हृदयाशी संबंधित आजारही झाला असल्याचे संशोधनात समोर आले. हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन औषध मलेरिया आजाराविरोधात वापरले जाते. या औषधाच्या सेवनामुळे रुग्णांच्या हृदयावर परिणाम होण्याची भीती हृदयरोग तज्ञांनी व्यक्त केली होती. त्याकडे ट्रम्प प्रशासनाने दुर्लक्ष केले असल्याची चर्चा आहे.

आणखी वाचा:
मस्तच! अवघ्या २० मिनिटांत करोनाबाधित ओळखता येणार
माकडांमधील प्रयोगातून सापडेल लशीचा मार्गSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

sushant singh rajput latest news: Sushant Singh Rajput: ‘भाजप सुशांतसिंहच्या आत्म्याला मोक्ष मिळू देत नाही’ – bjp does not allow sushant singhs soul to...

मुंबई: अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूचा राजकीय उपयोग करणाऱ्या भारतीय जनता पार्टीने अद्यापही त्याच्या आत्म्याला मुक्ती मिळू दिली नाही, असे म्हणत महाराष्ट्र प्रदेश...

Sambhaji Bidi: ७० वर्षांनंतर संभाजी बिडीचे नाव बदलले, आता या नावाने विक्री करणार – sambhaji bidi to be disappeared, company change product name

म.टा. प्रतिनिधी, नगर: विविध संघटनांनी वेगवेगळ्या माध्यामातून केलेल्या विरोधाची दखल घेत विडी उत्पादक साबळे वाघीरे आणि कंपनीने संभाजी विडीचे नामांतर साबळे विडी केले...

fire at serum institute: सीरमच्या आगीमागे घातपाताचा संशय; CM ठाकरे स्पष्टचं बोलले – the covid vaccine is safe. i have not spoken to adar...

पुणेः सीरम इन्स्टिट्यूटमध्ये लागलेली आगीमागे विरोधकांनी घातपाताची शक्यता वक्तव्य केली आहे. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना चांगलंच खडसावलं आहे. मुंबईत झालेल्या पत्रकार...

Recent Comments