Home विदेश coronavirus and prostitution: ‘रेड लाइट’ परिसर बंद ठेवल्यास नवीन ७२ टक्के रुग्ण...

coronavirus and prostitution: ‘रेड लाइट’ परिसर बंद ठेवल्यास नवीन ७२ टक्के रुग्ण संख्येत घट! – india can avoid 72 per cent of projected covid-19 cases by closing red light areas


वॉशिंग्टन: लॉकडाउन संपल्यानंतरही ‘कोव्हिड-१९’ विरोधी लस विकसित होईपर्यंत भारताने ‘रेड लाइट’ एरिया बंद ठेवणेच योग्य ठरणार असून, तसे केल्यासच करोना रुग्णांची संख्या १७ दिवस उशिराने वाढू शकेल आणि ७२ टक्के नवीन रुग्णही रोखले जाऊ शकतील, असा सल्ला काही संशोधकांनी भारताला दिला आहे.

अमेरिकेतील येल स्कूल ऑफ मेडिसीनमधील संशोधकांसह इतर अनेक संशोधकांनी एका अभ्यासावर आधारित भारताला हा सल्ला दिला आहे. लॉकडाउन संपल्यानंतरही भारताने ‘रेड लाइट’ भाग काही दिवसांसाठी बंद ठेवला तरच मृत्युंची संख्या ६३ टक्क्यांनी कमी होऊ शकते, असेही या संशोधकांनी म्हटले आहे. वैज्ञानिकांनी या सूचना भारत सरकारसह आणि विविध राज्यांना दिल्या आहेत.

‘कोविड-१९’ पासून नागरिकांचे रक्षण करण्यासाठी जर्मनी आणि नेदरलँड या देशांनी रेड लाइट एरिया बंद केले आहेत. मात्र, जपानने रेड-लाइट एरिया बंद न केल्यामुळे जपानमध्ये रुग्णांची संख्या एकदम वाढली, अशी माहिती जेएल स्कूल ऑफ मेडिसिनचे बायोस्टॅटिक्सचे प्राध्यापक जेफरी टाउनसेंड यांनी दिली.

वाचा: चक्क पंतप्रधानांनाच रेस्टॉरंटमध्ये प्रवेश नाकारला!
वाचा: करोना संसर्गाचा मानसिक आरोग्यावर होतोय परिणाम!

>> संशोधक काय म्हणाले ?

– सरकारला भविष्यातील सार्वजनिक आरोग्य व अर्थव्यवस्थेचे रक्षण करण्यासाठीच्या उपाययोजना तयार करण्याच्या व अंमलबजावणीसाठी लॉकडाउनमुळे अधिक वेळ मिळणार आहे.

– लॉकडाउनमुळे संपल्यानंतरही रेड लाइट एरिया बंद ठेवल्यास पहिल्या ६० दिवसांत करोनारुग्णांची संख्या ६३ टक्क्यांनी कमी होऊ शकते.

– तसेच, ४५ दिवसांच्या कालावधीत करोनाबाधितांची संख्या ७२ टक्क्यांनी कमी होईल. आणि करोना रुग्णांची संख्या १७ दिवस उशिरा होईल.

>> नॅशनल एड्स कंट्रोल ऑर्गनायझेशनचे (नॅको) काय म्हणते?

– भारतात सुमारे ६ लाख ३७ हजार ५०० देहविक्रेते आहेत. तर, पाच लाख ग्राहक दररोज रेड लाइट एरियाला भेट देतात.

– रेड लाइट एरिया सुरू झाल्यास करोना एकदम वेगात पसरेल आणि मोठ्या प्रमाणात देहविक्रेत्यांसह ग्राहकांना त्याची लागण होईल.

– करोना संक्रमित ग्राहक इतर लाखो नागरिकांमध्ये मिसळल्यास हा आजार पुन्हा वेगात पसरण्यीच मोठी शक्यता.

– रेड लाइट भाग लॉकडाउन संपल्यानंतरही एक प्रमुख हॉटस्पॉट तयार होऊ शकते.

‘भारतातील पाच शहरांना धोका’

रेड-लाइट क्षेत्राचा प्रभाव संपूर्ण भारतासह रेड-झोनमध्ये असलेल्या मुंबई, पुणे, कोलकाता, नागपूर आणि नवी दिल्ली या पाच शहरांमध्ये जास्त आहे. लॉकडाउन संपल्यानंतरही रेड लाइट एरिया बंद ठेवल्यास मुंबईतील मृत्यूची संख्या २८ टक्के, नवी दिल्लीत ३८ टक्के आणि पुण्यात ४३ टक्क्यांनी घटू शकते. तर, नागपूर आणि कोलकात्यात पहिल्या ६० दिवसांत मृत्यूची संख्या ६० टक्क्यांनी कमी होऊ शकते, असे जेएल स्कूल ऑफ मेडिसिनचे बायोस्टॅटिक्सचे प्राध्यापक जेफरी टाउनसेंड यांनी सांगितले.

आणखी वाचा:
अमेरिकेने चीनवर कारवाई करावी; १८ कलमी प्रस्ताव सादर!
करोनाचे थैमान सुरूच; मृतांची संख्या तीन लाखांवर
करोनापासून कायमस्वरूपी सुटका दुरापास्त; जागतिक आरोग्य संघटनेचा इशाराSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

निवडणुकीचे मानधन न मिळाल्यानं शिक्षक संतापले – teachers from niphad did not get paymet of work in gram panchayat election

म. टा. वृत्तसेवा, निफाडतालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रिया नुकतीच पार पडली, गावोगावचे कारभारी निवडले गेले, गुलाल उधळला गेला. मात्र या निवडणुकीच्या प्रशासकीय कामकाजासाठी झटणाऱ्या...

Rishabh Pant: ICC क्रमवारीत ऋषभ पंतने सर्वांना मागे टाकले; विराट कोहली चौथ्या क्रमांकावर घसरला – icc test ranking rishabh pant is the best wicket-keeper...

दुबई: icc test ranking ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या कसोटीत नाबाद ८९ धावांची खेळी करून संघाला विजय मिळवून देणाऱ्या ऋषभ पंत (rishabh pant)ला एक मोठे बक्षिस...

Recent Comments