Home विदेश coronavirus and vaccine: 'हे' औषध ठरतेय करोनाच्या संसर्गावर परिणामकारक! - previously known...

coronavirus and vaccine: ‘हे’ औषध ठरतेय करोनाच्या संसर्गावर परिणामकारक! – previously known antiviral drug can speed up recovery of covid-19 patients


टोरंटो: सध्या अन्य विषाणू संसर्गावर उपचार म्हणून वापरले जात असलेले एक औषध करोनाच्या संसर्गावरही खूपच परिणामकारक ठरत आहे. यावर अधिक संशोधन करून करोनाच्या साथीला अटकाव करता येईल, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.

‘फ्रंटीअर्स इन इम्युनॉलॉजी’ या जर्नलमध्ये हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे. इंटेरफेरॉन (IFN)- a2b असे या औषधाचे नाव असून या औषधामुळे विषाणूच्या वाढीवर नियंत्रण येते. तसेच रुग्णांच्या शरीरावर सूज येण्यासाठी कारणीभूत असलेल्या प्रथिनांची पातळी कमी केली जाते. कॅनडातील टोरंटो विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी हे संशोधन केले असून हे औषध अन्य विषाणूजन्य आजारांमध्ये अनेक वर्षे वापरात आहे. या औषधाच्या वापराने सात दिवसांनंतर श्वसनमार्गातील संसर्ग कमी होतो. रोगप्रतिकार यंत्रणेतील इंटरल्युकिन आणि सी रिअॅक्टिव्ह या प्रथिनांची रक्तामधील पातळी कमी करण्यासही मदत होते.

वाचा: ‘करोना:रेड लाइट’ परिसर बंद ठेवल्यास नवीन रुग्ण संख्येत ७२ टक्क्यांनी घट!

प्रत्येकवेळी नव्या विषाणूसाठी नवे औषध शोधत बसण्यापेक्षा अशा प्रकारची इंटरफेरॉन प्रकारची औषधे विकसित केली पाहिजेत, असे या संशोधन पथकाच्या प्रमुख एलेनॉर फिश यांनी म्हटले आहे. विषाणू संसर्गाला प्रतिसाद म्हणून मानवी शरीरात इंटरफेरॉन प्रकारची प्रथिने तयार होतात, असे त्या म्हणाल्या.

आणखी वाचा:
चक्क पंतप्रधानांनाच रेस्टॉरंटमध्ये प्रवेश नाकारला!
करोना: ब्रिटनच्या ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या चाचणीला मोठं यश!Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

grant to marathwada farmers: बारा लाख शेतकऱ्यांना ५५३ कोटी वाटप – 553 crore rupees of grant distributed to farmers in mrathwada

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादजून ते ऑक्टोबर या कालावधीत राज्यभरात झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे बाधित शेतकऱ्यांना महाविकास आघाडी सरकारने मदतीच्या दुसऱ्या टप्प्याची घोषणा केली...

Maharashtra Gram Panchayat Nivadnuk Nikal 2021: गिरीश महाजनांनी गड राखला; ४५ ग्रामपंचायतींवर भाजपचा झेंडा – girish mahajan win in 45 seat gram panchayat elections

म. टा. प्रतिनिधी, जळगाव: जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात भाजप नेते व माजी मंत्री गिरीश महाजन यांचीच सरशी झाली आहे. तालुक्यातील ६८ पैकी तब्बल...

Tesla Motors Will Route Its India Investment Through Dutch Arm – टेस्ला भारतात; पण एलन मस्क यांनी टाकला हा मोठा डाव | Maharashtra Times

मुंबई : अमेरिकन ऑटोमोबाइल कंपनी टेस्लाने भारतात येण्यासाठी नेदरलँडचा कर सवलतीचा मार्ग शोधला आहे. टेस्ला अॅम्स्टरडॅम ही टेस्ला मोटर्स अँड एनर्जी इंडियाची मुख्य...

Recent Comments