Home शहरं औरंगाबाद Coronavirus aurangabad: करोनामुक्त रुग्णांची टक्केवारी चांगली : देसाई - percentage of coronary...

Coronavirus aurangabad: करोनामुक्त रुग्णांची टक्केवारी चांगली : देसाई – percentage of coronary free patients is good: desai


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जिल्ह्यात करोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत्या संसर्गातही चांगले आहे. या पद्धतीने संसर्गाला रोखण्यासाठी सर्व यंत्रणांनी तयारीनिशी सज्ज राहण्याचे निर्देश पालकमंत्री सुभाष देसाई यांनी दिले. ते आढावा बैठकीत बोलत होते.

जिल्हाधिकारी कार्यालयात करोना आढावा बैठक पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी राज्यमंत्री अब्दुल सत्तार, पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद, जिल्हाधिकारी उदय चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश गोंदावले, घाटी अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुदंर कुलकर्णी, महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडळकर, जिल्हा उपनिबंधक अनिल दाबशेडे, जिल्हा कृषी अधीक्षक तुकाराम मोटे, कृषी विकास अधिकारी आनंद गंजेवार उपस्थित होते.

जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण चांगले असून अनलॉकनंतर सध्या संसर्गाचे प्रमाण वाढत आहे. ते रोखण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्नशील असून आरोग्य यंत्रणांनी सुद्धा पूरेसा औषधसाठा, मनुष्यबळ, उपकरणे यासह सज्ज होऊन काम करावे. कोरोनाच्या लढाईत प्रत्येकाची भूमिका महत्वाची आहे, असे सांगूण पालकमंत्री यांनी ग्रामीण भागातील कोरोना संसर्ग रोखण्यासाठी तसेच वाढता संसर्ग लक्षात घेऊन पूरेशा प्रमाणात खाटांची, ऑक्सिजनची, डॉक्टर व इतर पूरक गोष्टींची तयारी ठेवण्याबाबत संबंधितांना निर्देश दिले.

तसेच आरोग्य सुविधा भक्कम करण्यास शासन प्राधान्य देत असून महिनाभरात जिल्ह्यात मेल्ट्रॉन येथे डेडिकेटेड कोविड रुग्णालय सुरू केले. त्यामुळे वाढीव आरोग्य सुविधा उपलब्ध झाली. कोविड रुग्णांसाठी विशेष उपचार प्रक्रिया राबवत असतानाच पावसाळ्यामधील साथरोगावर नियंत्रण ठेवण्याचे काम आरोग्य यंत्रणांनी करावे. घाटीमध्ये आवश्यक इंजेक्शनचा पुरेसा साठा उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा करू, असे देसाई यांनी सांगितले.

चिकलठाणा मेल्ट्रॉन येथे नवीन कोविड रुग्णालय २२ जूनपासून सुरू झाले. तेथे ७२ रुग्ण दाखल आहे अशी माहिती मनपाच्या आरोग्य अधिकारी डॉक्टर नीता पाडळकर यांनी दिली. संसर्ग रोखण्यासाठी पूर्ण संस्थात्मक क्वॉरंटाइन करण्यावर भर दिला जात असून, दिवसाला ४०० त ४५० लाळेचे नमुने तपासणी करण्यात येत आहेत. वाढता संसर्ग लक्षात घेऊन पूरेशा प्रमाणात खाटांची व्यवस्था ठेवण्यात आली असून, मेल्ट्रॉन येथील कोविड सेंटरमध्ये सर्व सुविधा उपलब्ध केल्या आहेत, अशी माहिती डॉ. पाडळकर यांनी दिली.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

cm uddhav thackeray: मुख्यमंत्र्यांच्या हाती ‘व्हिजन’पत्र – nashik shivsena party workers meet cm uddhav thackeray for godavari beautification project

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिकमहापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर नाशिक विकासाचे व्हिजन सादर करीत यासाठी निधीसह राज्य सरकारच्या...

Prakash Ambedkar: काँग्रेस, डाव्यांना लकवा मारला का ? – vanchit baujan aghadi president prakash ambedkar has criticized congress and leftists over farmers protest

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाददिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठबळ देण्यात काँग्रेस, डावे पक्ष पूर्णत: अपयशी ठरले आहेत. आंदोलनात न उतरण्यासाठी या पक्षांना लकवा मारला आहे...

Recent Comments