Home मनोरंजन Coronavirus bollywood Loss: बॉलिवूडला जोर का झटका; लॉकडाउनमुळं तब्बल १४०० कोटींचा फटका...

Coronavirus bollywood Loss: बॉलिवूडला जोर का झटका; लॉकडाउनमुळं तब्बल १४०० कोटींचा फटका – coronavirus lockdown could mean losses of over rs 1400 cr for indian film industry


मुंबई :चित्रपट निर्मितीसाठी खर्च होणारे कोट्यवधी रुपये, त्यानंतर बॉक्स ऑफिसवर ५० कोटींपासून १०० ते १५० कोटींपर्यंत होणारं कलेक्शन बॉलिवूडसाठी नवीन नाही. पण, नेहमी कोट्यवधींच्या आकड्यांत खेळणारं बॉलिवूड लॉकडाउनमध्ये पार थंडावलं आहे. बॉलिवूडसाठी २०२० हे वर्ष २०१९ च्या पहिल्या सहामाहीच्या तुलनेनं प्रचंड नुकसानीचं ठरलं आहे. अंदाजे तब्बल १४६५ कोटी रुपयांच्या नुकसानाला बॉलिवूडला सामोरं जावं लागल्याचं सांगितलं जातंय.

गेल्या शंभर दिवसांहून अधिक काळ सिनेमागृहं बंद असल्यानं बॉलिवूडचं बॉक्स ऑफिस साफ उताणं पडलं आहे. सिनेमागृहं केव्हा सुरू होतील याबाबत अद्याप अनिश्चितता आहे. त्यामुळे पुढचे आणखी एक-दोन महिने बॉलिवूडसाठी कष्टदायी असणार असल्याचं बोललं जातंय.
करोनाचा बॉलिवूडला फटका, हजारो कोटींचं नुकसान
या सिनेमांनी तारलं…
२०२० च्या सुरुवातीला आलेल्या काही चित्रपटांनी बॉलिवूडला चांगली कमाई करून दिली. त्यात सर्वाधिक वाटा आहे तो, अजय देवगणच्या ‘तान्हाजी’ सिनेमाचा. ‘तान्हाजी: द अनसंग वॉरियर’ या सिनेमानं अंदाजे (२७९.५५ करोड़), ‘स्ट्रीट डान्सर थ्रीडी’ (६८.२८ करोड़), ‘शुभ मंगल ज्यादा सावधान’ (६०.७८ करोड़) आणि ‘बागी ३’ (९३.९७करोड़) इतकी कमाई पहिल्या सहामाहीत केली. परिणामी यंदाचं अर्ध वर्ष बॉलिवूडला अंदाजे ७७५ कोटी रुपयांची कमाई करून देऊ शकलं.
१७ वर्षांचा संसार; अमृता सुभाषच्या लग्नाचे फोटो पाहिलेत का?
२०१९ चा जोश!

गेल्या वर्षी अर्थात २०१९ चा पहिल्या सहामाहीमध्ये बॉलिवूडनं अंदाजे २ हजार ३४० कोटी रुपयांची घसघशीत कमाई केली होती. यात ‘अॅव्हेंजर्सः एंडगेम’ या हॉलिवूड सिनेमाच्या कमाईचा अंदाजे ३७३.२२ कोटी रुपये इतका सहभाग आहे. गेल्या वर्षी पहिल्या सहा महिन्यांत ‘उरीः द सर्जिकल स्ट्राइक’ (२४५.३६ कोटी), ‘मणिकर्णिकाः द क्वीन ऑफ झांसी’ (९२.१९कोटी), ‘गली बॉय’ (१४०.२५), ‘टोटल धमाल’ (१५४.२३ कोटी), ‘लुका छुपी’ (९४.७५ कोटी), ‘बदला’ (८७.९९ कोटी), ‘केसरी’ (१५४.४१ कोटी), ‘कलंक’ (८०.३५ कोटी), ‘स्टूडेंट ऑफ द इयर’ (६९.११ कोटी), ‘दे दे प्यार दे’ (१०३.६४ कोटी), ‘भारत’ (२११.०७ कोटी), ‘कबीर सिंह’ (२७८.२४ कोटी), आणि ‘आर्टिकल १५’ (६५.४५ कोटी) या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केली होती.

लॉकडाऊन झाले नसते तर…
लॉकडाउनमुळे ‘बागी ३’ आणि ‘इंग्लिश मीडियम’ या चित्रपटांना आर्थिक फटका सहन करावा लागला. हे दोन्ही १०० कोटी क्लबमधील चित्रपट मानले जात होते. त्यानंतर ‘ सूर्यवंशी ‘ आणि ’83’ या चित्रपटांच्या प्रदर्शनाची तारीख ही पुढे ढकलण्यात आलीये, या चित्रपटांना साधारण १५०-२०० कोटींची कमाई करता आली असती. आता परिस्थिती सुरळीत होण्यास ऑगस्ट किंवा सप्टेंबरपर्यंतचा वेळ जाईल आणि अशा परिस्थितीत या चित्रपटांच्या व्यवसायावरही परिणाम होईल. लॉकडाऊनमुळे सध्या मंदीच वातावरण आहे आणि बाजारातील मंदीचा थेट परिणाम बॉलिवूडच्या व्यवसायावर होईल.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

msedcl bill recovery latest news: MSEDCL Bill Recovery: लॉकडाऊन काळातील सहानुभूती संपली!; वीज ग्राहकांना महावितरण देणार ‘शॉक’ – msedcl will cut off power supply...

मुंबई:वीजबिल वसुलीची मोहीम राबवून थकबाकी वसूल करण्याचे व थकबाकीदार ग्राहकांचा वीज पुरवठा त्वरित खंडित करण्याचे आदेश महावितरणने सर्व क्षेत्रीय कार्यालयास आज दिले आहेत....

ncb arrest two drug peddler: NCB च्या जाळ्यात ‘हाय प्रोफाईल’ दलाल, सलग तिसऱ्या दिवशी कारवाई – ncb arrest two drug peddler in south mumbai

म. टा. प्रतिनिधी, मुंबई: नारकॉटिक्स कन्ट्रोल ब्युरोने (एनसीबी) अमली पदार्थविरोधी मोहिमेचा धडाका कायम ठेवला आहे. सलग तिसऱ्या दिवशी दोन दलालांना जेजे इस्पितळ परिसरातून...

Recent Comments