Home विदेश Coronavirus China: Coronavirus WHOशोधणार करोनाचे उगमस्थान! पुढील आठवड्यात चीनमध्ये जाणार - Coronavirus...

Coronavirus China: Coronavirus WHOशोधणार करोनाचे उगमस्थान! पुढील आठवड्यात चीनमध्ये जाणार – Coronavirus Updates Who Sending Team To China To Investigate Origins Of Coronavirus


जिनिव्हा:करोना विषाणूची निर्मिती चीनमध्ये झाली का, चीनमधूनच याचा प्रसार झाला का, आदी मुद्यांबाबत चौकशी करण्यासाठी आता जागतिक आरोग्य संघटनेचे एक पथक चीनमध्ये दाखल होणार आहे. मात्र, चौकशी पथकात नेमके कोणते सदस्य असणार आहेत, याबाबत काहीच माहिती समोर आली नाही. करोनाची निर्मिती चीनमध्ये झाली असल्याचा दावा याआधीच चीनने फेटाळून लावला आहे.

करोनाचा पहिला रुग्ण डिसेंबर २०१९ मध्ये चीनमधील वुहानमध्ये आढळला होता. त्यानंतर जगभरातील जवळपास २०० देशांमध्ये करोनाचा संसर्ग पसरला आहे. करोना संसर्गाच्या मुद्यावर अमेरिकेने सातत्याने चीनवर निशाणा साधला होता. जगभरात चीनभोवती संशयाचे वातावरण निर्माण झाल्यानंतर चीनने करोनाबाबतची चौकशी करू देण्यास सशर्त परवानगी दिली. चीनमध्ये जाऊन चौकशी पथक प्रयोगशाळांची तपासणी करण्याची दाट शक्यता आहे. करोनाचा विषाणू हा प्रयोगशाळेत निर्माण करण्यात आला की प्राण्यांमधून आला याचीही चौकशी पथकाकडून करण्यात येणार असल्याची शक्यता आहे.

वाचा: चीनमध्ये सापडला आणखी एक विषाणू, जगभरात खळबळ

वाचा:
करोना महासंकटाची टांगती तलवार; WHO ने दिला ‘हा’ इशारा

जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस घेब्रेयेसस यांनी सांगितले की, करोनाच्या विषाणूबाबत जेवढी अधिक माहिती मिळेल तेवढ्याच प्रभावीपणे त्याचा सामना करता येऊ शकतो. विषाणू निर्मिती नेमकी कशी झाली, याचा शोध घेणेही महत्त्वाचे आहे. आगामी काही दिवसांत जागतिक आरोग्य संघटनेचे पथक चौकशीसाठी चीनमध्ये जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. अमेरिकने करोनाच्या संसर्गाला चीन आणि जागतिक आरोग्य संघटनेला जवाबदार ठरवले होते. चीनच्या इशाऱ्यावरूनच जागतिक आरोग्य संघटनेने करोनाबाबतची माहिती वेळेवर दिली नसल्याचा आरोप केला होता. जागतिक आरोग्य संघटना चीनच्या हातातील बाहुले झाले असल्याचेही अमेरिकेने म्हटले होते. चीनला झुकतं माप दिले जात असल्याच्या मुद्यावरून अमेरिकेने जागतिक आरोग्य संघटनेचे सदस्यत्व सोडले होते.

वाचा: काळजी घ्या! ‘ही’ आहेत करोना संसर्गाची तीन नवीन लक्षणे

दरम्यान, जगभरातील अनेक देशांमध्ये करोना संसर्गाचा कहर सुरू आहे. काही मोजक्या देशांना करोनाच्या संसर्गावर नियंत्रण मिळवण्यास यश आले असले तरी अनेक देशांमध्ये करोनाचा संसर्ग फैलावला आहे. करोनाचा जोर ओसरणे तर दूर अद्याप संसर्गाने उच्चांक गाठला नसल्याचा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे. जगभरातील देशांनी निर्देशांचे योग्य पालन न केल्यास करोनाचे संकट अधिकच गडद होणार असल्याचा इशारा जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस घेब्रेयेसस यांनी दिला आहे. जगभरात करोनामुळे गंभीर परिस्थिती असताना जागतिक आरोग्य संघटनेने संसर्गाच्या मुद्यावर नेत्यांनी राजकारण न करण्याचे आवाहन त्यांनी केले होते.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

five trillion economy dream: ‘करोना’चा आघात; ‘पाच ट्रिलियन डॉलर’चे स्वप्न बिकटच – the dream of five trillion dollars economy having major challenges ahead

वृत्तसंस्था, मुंबई : देशाची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलरवर (५०० लाख कोटी रुपये) पोहोचवण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी आणखी काही वर्षे...

KEM Hospital: नायरमध्ये आणखी २५ जणांवर चाचणी – another 25 people will be tested at nair hospital mumbai

म. टा. प्रतिनिधी, मुंबईकरोनाला प्रतिबंध करणाऱ्या लसीवर मुंबईतील केईएम आणि नायर रुग्णालयात चाचणी करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात दोन्ही रुग्णालयांमध्ये प्रत्येकी १०० जणांना...

मराठवाड्याची रुग्णसंख्या पाचशेच्या खाली

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद मराठवाड्यात एका दिवसात आढळणाऱ्या बाधितांची संख्या सातत्याने घटत आहे. विभागात सोमवारी (२६ ऑक्टोबर) ४३३ नवीन बाधित आढळले. विविध रुग्णालया...

fine to covid norms beaker: ७१ दोषींना ३८ हजारांचा दंड – nashik district court recovered 38000 rupees fine from who break covid 19 norms

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिकलॉकडाऊन काळातील नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्या ७१ दोषी नागरिकांना सोमवारी (दि. २६) कोर्टाने शिक्षा ठोठावली. या नागरिकांकडून ३८ हजार रुपयांचा...

Recent Comments